गेल्या दीड वर्षाच्या काळात भारताच्या पूर्वेकडे एकापाठोपाठ आलेल्या तीन चक्रीवादळांमुळे त्याचा स्थानिक जनजीवनावर मोठा परिणाम झाला. जवद, गुलाब आणि नुकतंच पूर्व किनारपट्टीवर आलेल्या असनी चक्रीवादळामुळे स्थानिक जनजीवनावर मोठा परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय व्यवस्थेवर ताण पडू लागला असताना बंगालच्या उपसागरात इतकी चक्रीवादळं का निर्माण होतात? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जगभरात उठलेल्या १० अतीभयंकर चक्रीवादळांपैकी ८ चक्रीवादळं ही बंगालच्या उपसागरात निर्माण झाली आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून पूर्व किनारपट्टीच्या दिशेनं येत असलेलं असनी चक्रीवादळ बऱ्याच अंशी कमकुवत झालं आहे. मात्र त्यामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांतील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडे वळले असल्याने या राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीवरील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पण चक्रीवादळांचा इतिहास असलेल्या या भूभागासाठी आता चक्रीवादळ हा प्रकारच फारसा नवीन राहिला नसल्याचंच आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
Easy fight for Vijay Wadettiwar in Bramhapuri assembly election 2024
ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार यांच्यासाठी सोपी लढत!
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

१० पैकी ८ वादळं बंगालच्या उपसागरात

बंगालचा उपसागर नेहमीच चक्रीवादळांचं केंद्र ठरला आहे. ग्रेट भोला चक्रीवादळ-बांग्लादेश (१९७०) ३ लाखाहून अधिक मृत्यू, हुगळी नदीतील चक्रीवादळ-बांग्लादेश (१७३७), हैपाँग चक्रीवादळ-व्हिएतनाम (१८८१), कोरिंगा चक्रीवादळ-भारत (१८३९), बकरगंज चक्रीवादळ-बांग्लादेश (१५८४), ग्रेट बकरगंज चक्रीवादळ-बांग्लादेश (१८७६), चितगाँग चक्रीवादळ-बांग्लादेश (१८९७) २ लाख मृत्यू, निना चक्रीवादळ-चीन (१९७५), ओटूबी चक्रीवादळ-बांग्लादेश (१९९१), नर्गिस चक्रीवादळ-म्यानमार (२००८) ही आत्तापर्यंत जगभरात आलेल्या १० सर्वात भीषण चक्रीवादळांची आकडेवारी आहे. यातली ८ चक्रीवादळं बंगालच्या उपसागरात निर्माण झाली आहेत.

याआधी १९९९मध्ये ओडिशामध्ये अतीतीव्र चक्रीवादळ निर्माण झालं होतं. २९ ऑक्टोबर १९९९ रोजी निर्माण झालेल्या या चक्रीवादळानं तब्बल १० हजार लोकांचे प्राण घेतले. मात्र, तेव्हापासून भारतानं अशा परिस्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजना आणि बचावकार्य यामध्ये केलेल्या प्रगतीमुळे मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर कमी करण्यासाठी मदत झाली आहे.

इतिहास काय सांगतो?

गेल्या ५० वर्षांची आकडेवारी पाहाता भारताला १९७० ते २०१९ या कालावधीमध्ये तब्बल ११७ चक्रीवादळांचा तडाखा बसला आहे. या घटनांमध्ये आत्तापर्यंत ४ लाख लोकांचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे.

Explained : दरवर्षी महाराष्ट्राला वादळाचा तडाखा बसणार का?; अरबी समुद्रात नक्की काय घडतंय?

अवघ्या ०.६ टक्के समुद्रात उठतात अतीभयंकर चक्रीवादळं!

जागतिक सागरी भागाचा विचार केला, तर जगभरातील जेवढा भूभाग समुद्रानं व्यापलेला आहे, त्यातील बंगालच्या उपसागराचं प्रमाण अवघं ०.६ टक्के इतकाच आहे. पण जगात चक्रीवादळामुळे होणाऱ्या दर ५ मृत्यूंपैकी ४ मृत्यू हे या भागातल्या चक्रीवादळांमुळे होत असल्याचं एका आकडेवारीतून समोर आलं आहे. गेल्या दोन शतकांमध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या २० लाख मृत्यूंपैकी तब्बल ४२ टक्के मृत्यू एकट्या बांगलादेशमध्ये झाले असल्याची आकडेवारी व्हेदर डॉट कॉमनं दिली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार सुंदरबन हे नेहमीच चक्रीवादळाच्या निशाण्यावर राहिलं आहे. त्यासोबत पश्चिम बंगालमधील साऊथ २४ परगणा भागाला चक्रीवादळांचा सर्वाधिक तडाखा बसल्याचं डाऊन टू अर्थ मॅगझिननं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

बंगालच्या उपसागरातच हे का घडतंय?

बंगालच्या उपसागरातच वारंवार चक्रीवादळ निर्माण होण्यामागे इथल्या भूभागाची रचना महत्त्वाची भूमिका पार पडते. डावीकडे भारतीय किनारपट्टी आणि उजवीकडे भारताच्याच पूर्वेकडच्या राज्यांसोबत म्यानमार आदी इतर देशांमुळे या समुद्राचा आकार त्रिकोणी झाला आहे. त्यामुळेच या भागात चक्रीवादळं निर्माण होण्याची शक्यता अधिकाधिक वाढते. बंगालच्या दिशेचा समुद्राचा निमुळता होत गेलेला भाग या वादळांना अधिकतच तीव्रता देतो. त्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका हा या भागातील किनारी प्रदेशांना बसतो.