Rashtrapati Bhavan halls renamed राष्ट्रपती भवनामधील दरबार आणि अशोक हॉलचे नाव बदलण्यात आले आहे. २५ जुलै रोजी याची माहिती राष्ट्रपती सचिवालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. या दोन हॉलचे अनुक्रमे ‘गणतंत्र मंडप’ आणि ‘अशोक मंडप’ असे नामांतर करण्यात आले. “राष्ट्रपती भवनातील वातावरण हे भारतीय संस्कृती, मूल्ये आणि तत्त्वांचं प्रतिबिंब असावं, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत”, असं राष्ट्रपती भवनाकडून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. राष्ट्रपती भवनातील अशोक हॉल हा मुळात बॉलरूम म्हणून वापरला जात होता. अशोक हा शब्द सर्व प्रकारच्या वेदनांपासून मुक्त अशा अर्थाने वापरला जातो. त्याशिवाय, सम्राट अशोकाच्या नावानेही हे नाव जोडलं जातं.
त्याशिवाय, भारतीय रूढी-परंपरांमध्ये महत्त्वाचं स्थान असणाऱ्या अशोक वृक्षाशीही हे नाव जोडलं जातं. ‘अशोक हॉलचं नामकरण अशोक मंडप असं केल्यामुळे भाषेची एकता साधली जाते, नावांच्या इंग्रजीकरणापासून दूर राहता येतं आणि अशोक शब्दाशी निगडीत मुलभूत तत्त्वही त्यातून प्रतिबिंबित होतात’, असं राष्ट्रपती भवनाच्या निवेदनात म्हटलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीतील अशोकाच्या झाडाला महत्त्व का? आणि प्राचीन वाङ्मयातून या झाडाचे महत्त्व कसे प्रकट होते याचा घेतलेला हा आढावा.
लाल व हिरवा अशोक
अशोकाला वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये अनेक नावं आहेत. साधा अशोक, पानांचा अशोक आणि लाल-नारिंगी फुलांचा अशोक, सीतेचा अशोक, रक्ताशोक, रक्तपल्लव, ताम्रपल्लव, तपनीय अशोक, सुवर्णाशोक इत्यादी अनेक नावांचा यात समावेश होतो. मराठी विश्वकोशात म्हटल्याप्रमाणे, ‘अशोक’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतात दोन वेगवेगळ्या वनस्पती आहेत. त्यांना ‘लाल अशोक’ आणि ‘हिरवा अशोक’ असे म्हणतात. लाल अशोक हा फॅबॅसी कुलातील हा सदापर्णी आकर्षक असा वृक्ष असून याचे शास्त्रीय नाव सराका इंडिका आहे. हा वृक्ष श्रीलंका, म्यानमार, मलेशिया, बांगलादेश आणि भारतात आढळतो. भारतात तो सदाहरित वनात आणि लागवडीखाली आढळतो. याला ‘सीतेचा अशोक’ असेही म्हणतात.
पुराणकाळापासून महत्त्व
पुराणकाळापासून या अशोक वृक्षाला महत्त्व मिळाले आहे. ताप, त्वचेचा दाह, पुटकुळ्या इत्यादींवर या वृक्षाची साल उगाळून लावतात. गर्भाशयाच्या तक्रारींवर या वृक्षाची साल दुधात उकळून घेतात. फुले मुळव्याध, आमांश, लहान मुलांना होणारी खरूज इत्यादींवर गुणकारी असतात. मधुमेहावर सुकलेली पाने तर मूत्रविकारांवर बिया उपयुक्त ठरतात, झाडाच्या वाळलेल्या सालीत औषधी गुणधर्म आहेत. साल स्त्रियांच्या मासिक पाळीत होणाऱ्या अतिरक्तस्रावासाठी गुणकारी असते असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. अशोकाचे फुल हे ओडिशा राज्याचे राष्ट्रीय फुल आहे. चारुशीला जुईकर यांनी ‘लोकसत्ता’च्या कुतूहल सदरात (२०१६) या फुलांची वैशिष्ट्य दिली आहेत. त्या म्हणतात, ‘या फुलांचा बहर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात येतो. हा बहर विशेषच असतो. मंद सुगंधी फूल चार गोलाकार पाकळ्यांचे असून लांब-लांब पुंकेसर फुलाच्या बाहेर आलेले असतात. फुले उमलताना पिवळ्या रंगाची, मग केशरी आणि शेवटी गडद नारंगी-लाल रंगाची होतात. एकाच गुच्छात या सर्व छटांची फुले दिसतात. झाडाच्या खोडाला अगदी जमिनीलगतच्या बुंध्यापासून ते फांद्यांवर, शेंडय़ापर्यंत हळदीकुंकवाच्या रंगाच्या फुलांचे गुच्छ लगडतात. ते पाहणं म्हणजे विलक्षण नेत्रसुखच.’
खोटा अशोक
तर दुसरा अशोक म्हणजेच हिरवा अशोक हा अॅनोनेसी कुलातील वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव पॉलिअॅल्थिया लाँजिफोलिया आहे. याचेही मूळ भारतात आणि श्रीलंकेत आढळते. हा वृक्ष प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लावला जातो. या वृक्षाची लागवड ताज्या बियांपासून होते. हिरव्या अशोकाची साल कठिण, शीतल व कडू असून ताप, त्वचेचे रोग, मधुमेह इत्यादींवर गुणकारी ठरते, असा आयुर्वेदात उल्लेख आहे. या वृक्षाची साल पेन्सिली, पिपे व ढोलकी तयार करण्यासाठी वापरतात. आगकाड्या तयार करण्यासाठी याचे लाकूड वापरतात.’ या अशोकाला खोटा अशोक असेही म्हटले जाते. भारतीय प्राचीन वाङ्मयात तसेच राष्ट्रपती भवनातील उल्लेख केलेला अशोक हा लाल अशोक होय.
‘या’ पर्वताने खरंच घेतला होता का हिंदूंचा बळी? त्याच्या नावामागचा नेमका अर्थ काय?
भारतीयांचा लाडका ‘अशोक’
संस्कृत वाङ्मयात अशोकाचा उल्लेख अशोकः, वञ्जुलः, कान्ताङ्घ्रिः, नारीपाद्स्पर्शः, दोहदम्, पुष्पोद्गमौषधम् इत्यादी वेगवेगळ्या नावांनी करण्यात आला आहे. कालिदासाने ऋतुसंहार या काव्यात अशोकाचे आमूलतो विद्रुमरागताम्रं सपल्लवं पुष्पचयं दधानः (ऋतुसंहार ६-१७) असे वर्णन केले आहे. याचा अर्थ आरंभापासून पोवळ्यासारखा तांबडा रंग असणारे फुलांचे झुपके असणारा भरपूर पाने असलेला वृक्ष असा होय. तर ‘गाथा सप्तशती’सारख्या प्राकृत ग्रंथात अशोकाचा उल्लेख असोअ, कङ्केल्लि, वञ्जुल इत्यादी नावांनी करण्यात आलेला आहे. एकूणच भारतीय प्राचीन वाङ्मयात या झाडाला विशेष महत्त्व असल्याचे दिसते.
हिंदुस्थानचे भूषण
अशोकाच्या पानांचे सौंदर्य अद्वितीय असते, म्हणूनच सुंदरीच्या बोटांना कङ्केल्लि पल्लवांची म्हणजेच अशोकाच्या पानांची उपमा प्राचीन वाङ्मयात देण्यात आली आहे. प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास सांगणाऱ्या गाथा सप्तशतीत अशोकाचा वारंवार उल्लेख आलेला आहे. गाथा सप्तशतीतील अशोकाच्या उल्लेखाविषयी डॉ. सदाशिव जोगळेकर यांनी सविस्तर विश्लेषण केले आहे. ते म्हणतात, ‘अशोकाचा बांधा उंच, रेखीव व ढबदार असतो. तो सर्व ऋतूंत भरदार व हिरवागार असतो. त्याची छाया गर्द असते. उन्हाळ्यात त्याला भगवी, नारिंगी, पिवळी व लाल फुले येतात. मोसमाच्या भरात तो बुडख्यापासून शेंड्यापर्यंत फुलांनी डंवरलेला असतो. अशोक हे हिंदुस्थानचे वैशिष्ट्य व वनस्पतींचे भूषण आहे.’ तर सर विल्यम जोन्स या झाडाविषयी म्हणतात, ‘फुललेल्या अशोकाचे मनोहारित्त्व वनस्पतीसृष्टींत अद्वितीय आहे. याच्या फुलांच्या दर्शनाने स्त्रिया उत्तेजित होतात असे अशोककल्पात सांगितलेले आहे.’ फुले येण्याच्या बाबतीत हा वृक्ष फार लहरी आहे. फुलण्याचा काळ शरद ऋतूपासून ग्रीष्म ऋतूपर्यंत मागेपुढे होऊ शकतो. म्हणूनच बहुधा सुंदर स्त्रियांच्या लत्ताप्रहारांनी हा फुलतो अशी कविकल्पना केल्याचे प्राचीन वाङ्मयात आढळते.
मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख कोणता? तो कुठे आहे? काय लिहिले आहे त्यात?
स्त्रियांचा सखा
एकूणच स्त्रियांचे आणि या अशोकाचे नाते जवळचे असल्याचा संदर्भ प्राचीन वाङ्मयात आढळतात. किंबहुना स्त्री भावना आणि अशोकाच्या फुलण्याचा संबंध अनेक ठिकाणी प्रस्थापित करण्यात आलेला आहे. या संदर्भात डॉ. सदाशिव जोगळेकर म्हणतात, ‘या स्वरूपसुंदराला (अशोकाला) दोहद संकेतानुसार तरुणींचे लत्ताप्रहार सहन करावे लागतात. किंबहुना, अशा पाद्यपूजेशिवाय हा शुंभ फुलतच नाही! अशोक एवढा विदग्ध व समयज्ञ की, अशा प्रहारांनी चिडण्याऐवजी तो बहरून येतो; कारण या तरुणी त्याला पीडा द्यावयास उद्युक्त झालेल्या नसतात, त्या क्रीडेच्या भरांत उत्तेजित झालेल्या असतात! किंबहुना स्त्रिया आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अशोकापाशी जातात, त्या त्याला आपला सखा मानतात. अनेक वेळा नायकाला ही अशोक वृक्षाची उपमा दिली जाते, इतके अशोक वृक्षाचे आणि स्त्रियांचे घट्ट नातं आहे.
रसिक विदग्ध विलसिन्समयज्ञ सत्यमशोकोSसि ।
वरयुवतिचरणकमला हतोSपि यद्विकसि सतृष्णम् ।।
ही गाथा सप्तशतीतील अशोकाचा संदर्भ देणारी गाथा आहे. या गाथेचा अर्थ, ‘हे अशोक, तू रसिक, विदग्ध, विलासी व समयज्ञ आहेस; तू खरोखरीच अशोक आहेस. सुंदर स्त्रियांनी चरणकमलांनी लाथ मारली असता तू दुःखित होत नाहीस; उलट विकसित होतोस आणि आपल्याला आणखी अशाच प्रहरी अपेक्षा आहे, असे व्यक्त करतोस. (मूलतः हे प्रणयकुपिकेच्या कटू वचनांमुळे उद्दिग्न झालेल्या नायकाप्रत दुतीचे उद्गार आहेत. ती त्याला अशोकाचे उदाहरण देते. नायिकेने कितीही झिडकारले तरी तिची मनधरणी करण्यातच खरी रसिकता आहे. ती म्हणते, परस्त्रीच्या पदाघाताने अशोक अपमानित होत नाही तर पुष्पित होतो. त्यामुळे वृथाभिमानाच्या आहारी जाऊन नायिकेचा पदघात हा अपमानाचा द्योतक आहे असे समजू नकोस. दोहद आहे असे मान. थोडया अनुनयानंतर सुख तुझ्या हाती लाभेल.)
प्राचीन व मध्ययुगीन वाङ्मयात व जीवनांत अशोकाला महत्त्वाचे स्थान होते. त्याच्या मोहिनीचा प्रत्यय ऋग्वेदांतील ऋचांमध्येही आढळतो. अशोकांचे फूल शंकराचे विशेष आवडते आहे. अशोकाच्या नावांशी संबंध असलेले अनेक उत्सव हिंदू समाज पाळतो.
समृद्धी आणि सृजनता
गौतमबुद्धाचा जन्म अशोक वृक्षाखाली झाला अशी आख्यायिका असल्यामुळे बौद्धही या वृक्षाला पवित्र मानतात. अशोकवनात रावणाच्या बंदिवासात असलेली सीता याच वृक्षाखाली बसली होती. भारतीय शिल्पकलेत या वृक्षाने अंकन आढळते, अनेकदा शिल्पांमध्ये यक्षिणी-सुरसुंदरी या अशोक वृक्षाचा आधार किंवा फांदी घेऊन उभ्या असल्याचे शिल्प कोरले जाते. काही अभ्यासकांचे असे मत आहे की या झाडाच्या पायथ्याशी असलेली तरुण मुलगी प्रजनन क्षमतेशी संबंधित प्राचीन वृक्षदेवतेचा संदर्भ देते. अशोकाच्या झाडाखालील यक्षिणी सुरुवातीच्या बौद्ध स्मारकांमधील शिल्पांमध्ये प्रामुख्याने आढळतात. अनेक प्राचीन बौद्ध पुरातत्त्व स्थळांवर अशी शिल्प आढळली आहेत. हिंदू धर्मात अशोकाला पवित्र वृक्ष मानले जाते. अशोक वृक्षाची पूजा चैत्र महिन्यात केली जाते. तसेच अशोक वृक्ष कामदेवाशी देखील संबंधित आहे, कामदेवाला आवडणाऱ्या पाच फुलांमध्ये अशोक फुलांचा समावेश केला होतो. त्यामुळेच अशोकाचा संबंध हा समृद्धी आणि सृजनाशी जोडला जातो.
संदर्भ/ Reference
Heinrich Zimmer, Myths and Symbols in Indian Art and Civilization, 1946.
जोगळेकर स. आ. हाल सातवाहनाची गाथा सप्तशती, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९५६.