सध्या आशिया चषक स्पर्धेचा थरार रंगला आहे. या सामन्यात २८ ऑगस्ट रोजी भारत-पाक यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी रखून दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा भारत-पाक आमनेसामने येणार आहेत. हा सामना दुबईमधील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. आशिया चषक स्पर्धेतील काही सामने शारजाह स्टेडियममध्येही होत आहेत. या पार्श्वभूमीवर शारजाह स्टेडियमचा इतिहास, यूएईमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील लढती आणि भारताची कामगिरी याचा आढावा घेऊया.
हेही वाचा >>> आधीच्या सामन्यात धावांचा पाऊस पाडला, आता स्पर्धेबाहेर; भारत-पाक सामन्यात जडेजा नसणार, टीम इंडियाला फटका बसणार?
यूएई येथील जमीन क्रिकेटचे मैदान तयार करण्यासाठी योग्य नाही. येथील जमिनीत जास्त प्रमाणात वाळू आहे. तसेच येथील वातावरणात मोठ्या प्रमाणात गर्मी आहे. याच कारणामुळे शारजाहसारखे भव्य स्टेडियम तयार करण्यासाठी पाकिस्तानमधून माती आणण्यात आली. शारजाह हे यूएईमध्ये बनवण्यात आलेले पहिले स्टेडियम असून त्याची निर्मिती १९८२ साली करण्यात आली. येथे पहिला आंतरराष्ट्रीय सामना एक दिवसीय सामन्याच्या स्वरुपात पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळवला गेला.
हेही वाचा >>> Asia Cup 2022 : भारत-पाक महामुकाबल्याआधी पाकिस्तानी खेळाडूचं महत्त्वाचं विधान, म्हणतो ‘कोणत्याही संघाला…’
स्टेडियम उभारण्याआधी बराच अभ्यास करण्यात आला. येथे स्टेडियम उभारण्यासाठी पाकिस्तामधील पंजाब प्रांतातील चिनाब आणि रावी नदीच्या परिसरातील नंदीपूर येथील मातीची आयात करण्यात आली. या मातीची ऑस्ट्रेलियाच्या एका लॅबमध्ये चाचणी करण्यात आली. त्यानंतर ही माती ऑस्ट्रेलियाच्या मातीशी मिळतीजुळती असल्याचे समोर आले. या मातीपासून शारहाज मैदानावरील खेळपट्टी उभारण्यात आली. येथे २०० मीमीचे मातीचे थर तयार करून त्यावर हिरवी झाडे लावण्यात आले होते.
हेही वाचा >>> IPLमधील आघाडीच्या संघाने बदलला ‘हेड कोच’, आता ब्रायन लारा देणार खेळाडूंना प्रशिक्षण
पहिला सामना पाकिस्तान-श्रीलंका यांच्यात खेळवला गेला
१९८२ साली हे स्टेडियम बांधून पूर्ण झाले. येथे एकदिवसीय सामन्याच्या रुपात पहिला आंतरराष्ट्रीय सामना पाकिस्तान-श्रीलंका यांच्यात खेळवला गेला. तर पहिला कसोटी सामना ३१ जानेवारी २००२ ते ४ फेब्रुवारी २००२ या कालावधित खेळवला गेला. पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना अफगाणिस्तान आणि स्कॉटलँड यांच्यात खेळवला गेला. या स्टेडियममध्ये एकाच वेळी २७ हजार प्रेक्षक बसू शकतात.
हेही वाचा >>> Asia Cup: ‘जागतिक क्रिकेटमध्ये भारत लाडका कारण…’ मोहम्मद हाफीज स्पष्टच बोलला
यूएईमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील लढतीचे काय परिणाम?
यूएईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण २९ लढती झालेल्या आहेत. यापैकी यातील ९ लढती भारताने जिंकलेल्या आहेत, तर २० लढतींमध्ये पाकिस्तानचा विजय झालेला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात १४ लढती झालेल्या आहेत. यातील आठ लढतींमध्ये भारताचा तर ५ लढतींमध्ये पाकिस्तानचा विजय झालेला आहे. यातील एक लढत अनिर्णित राहिली होती.