सजीव सृष्टी ही अनेक अद्भुत गोष्टींचा मेळ आहे. मानवी उत्क्रांती हा तर अनेकांचा आवडता विषय आहे. माणूस बुद्धिमान म्हणून त्याचे वेगळे महत्त्व असले, तरी या सृष्टीचा पसारा वाढत असताना अनेक जीव जगण्याच्या स्पर्धेत तग धरण्याचा प्रयत्न करत होते. मानवी संस्कृती अस्तित्त्वात येण्यापूर्वी कित्येक लक्ष वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर अजस्त्र प्राणी अस्तित्त्वात होते. त्याच प्राण्यांमधील लोकप्रिय प्राणी म्हणजे डायनासोर. खरंतर डायनासोर हा प्राणी अस्तित्त्वात होते हे दर्शविण्यात आंतराष्ट्रीय चित्रपटसृष्टीचा बराच हात आहे. किंबहुना त्यांच्यामुळेच जगाच्या कानाकोपऱ्यात हा प्राणी अस्तित्त्वात होता, हे सत्य पोहोचले आणि डायनासोर नावाच्या प्राण्याचे नेमके काय झाले असावे अशी जिज्ञासा जनमानसात निर्माण झाली. डायनासोर लाखो वर्षांपूर्वी नामशेष झालेले असले तरी ते कसे नामशेष झाले याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे.

अधिक वाचा: Indian Air Force Day 2024: ती काळरात्र, १२१ नागरिक ..हातात फक्त दीड तास आणि भारतीय हवाईदलाचे शौर्य; काय घडलं होतं नेमकं?

Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यांगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
History of Geographyn History of the Earth Geological timescale
भूगोलाचा इतिहास: खडकातील पाऊलखुणा!

डायनासोर नेमके कसे नामशेष झाले?

सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी सहा मैल लांबीची उल्का पृथ्वीवर आदळली आणि त्यातच डायनासोरांसह सुमारे ७५ टक्के प्रजाती नष्ट झाल्या असे प्रचलित सिद्धांत सांगतो. परंतु नवीन संशोधन एका वेगळ्याच घटनेवर प्रकाश टाकत आहे. एकच उल्का आदळून डायनासोर नष्ट झाले, ही ते नामशेष होण्यासाठी महत्त्वाची ठरलेली स्वतंत्र घटना नव्हती. अलीकडेच गिनीच्या किनाऱ्यावर पाण्याखाली सापडलेल्या एका खड्ड्यावरील संशोधनातून शास्त्रज्ञ एका निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, त्याकाळी पृथ्वीवर उल्का आदळली ही स्वतंत्र घटना नव्हती. नेचर या संशोधनपत्रिकेत प्रकाशित शोधनिबंधात त्यांनी म्हटले आहे की, आणखी एक मोठी उल्का पृथ्वीवर आदळली असावी, त्यामुळे डायनासोर नामशेष होण्यास हातभार लागला असेल.

नवीन उल्कापाताचे संदर्भ काय सांगतात?

स्कॉटलंडमधील हेरियट-वॉट विद्यापीठाने नादर नावाच्या दुसऱ्या खड्ड्याच्या 3D प्रतिमा प्रसिद्ध केल्या आहेत, हा खड्डा एका उल्कापातामुळे तयार झाला आहे. या स्फोटाने साडेपाच मैलापेक्षा मोठा खड्डा तयार केला आहे. संशोधकांचा असा अंदाज आहे की, ही उल्का सुमारे १/४ मैल लांबीची होती आणि पृथ्वीवर आदळताना तिचा वेग ताशी ४५ हजार किमीपेक्षा जास्त होता. ही उल्का डायनासोरच्या सामूहिक नाशासाठी जबाबदार असलेल्या उल्केपेक्षा आकाराने लहान असली तरीही यामुळे एकत्रितपणे अधिक मोठा परिणाम निर्माण झाल्याचे दिसते. डॉ. उइस्डियन निकोलसन, हेरीयट-वॉट विद्यापीठातील मरीन जिओलॉजिस्ट आहेत. त्यांनी २०२२ साली नादर खड्ड्याची प्रथम ओळख पटवली. परंतु या घटनेमुळे नेमके काय परिणाम झाले याची कल्पना नव्हती. याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “नवीन संशोधन हे या विनाशकारी घटनेचे नेमके चित्र उभे करते.” डॉ. निकोलसन यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या टीमला खात्री आहे की, समुद्रतळावर झालेल्या उल्कापातामुळे ९ किलोमीटरचा खोलगट भाग तयार झाला आहे. परंतु, या घटनेचा नेमका काळ कोणता म्हणजे मेक्सिकोमधील १६० किमी आकाराचा खड्डा निर्माण करणाऱ्या उल्कापातापूर्वी किंवा नंतर ही घटना घडली, याबाबत त्यांना अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही.

अधिक वाचा: Mumbai’s first encounter: मुंबईतील पहिलं एन्काऊंटर मन्या सुर्वे, नेमकं काय घडलं होतं?

प्रभावाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, शास्त्रज्ञांनी 3D भूकंप इमेजिंगचा अवलंब करून या विवराचा आणि समुद्राच्या तळाच्या ३०० मीटर खाली आढळणाऱ्या इतर विविध भूभौतिकीय प्रभावांचा नकाशा तयार केला. “जगभरात सुमारे २० समुद्री खड्डे निश्चित केले गेले आहेत आणि त्यापैकी कोणत्याही खड्ड्याचे इतक्या तपशीलात चित्रण झालेले नाही. हे चित्रण अतिशय उत्कृष्ट आहे,” असे निकोलसन यांनी सांगितले. खड्ड्यांचा तळ हा छिन्न-विछिन्न किंवा घासला गेलेला आहे, विशेषतः हा खड्डा हजारो वर्षे जुना असल्यामुळे तळाचा शोध लावणे कठीण जाते. ग्लोबल जिओफिजिकल कंपनी TGS ने निकोलसन यांच्या टीमला दिलेल्या डेटामध्ये खड्ड्याची सर्व वैशिष्ट्ये पाहण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध होती.

या उल्केच्या धडकेमुळे नेमके काय परिणाम झाले?

संशोधनानुसार, या उल्केच्या धडकेमुळे जोरदार भूकंप झाले, त्यामुळे महासागराच्या तळाखाली मऊ आणि ओलसर भूमी तयार झाली. या धडकेमुळे भूस्खलन झाले आणि ८०० मीटरपेक्षा उंच प्रचंड लाट तयार झाली, जी अटलांटिक महासागरभर पसरली असावी असे अभ्यासक सांगतात