आंतरराष्ट्रीय दहशतवादी व मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम कासकरच्या दोन मालमत्तांची नुकतीच लिलावात विक्री झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील दाऊदच्या चार मालमत्तांचा या लिलावत समावेश होता. त्यापैकी दोन मालमत्तांसाठी सुमारे दोन कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. उर्वरित दोन मालमत्तांच्या लिलावात कोणीही सहभागी झाले नाही. ही कारवाई का आणि कशी झाली?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दाऊदच्या कोणत्या मालमत्तांचा लिलाव झाला?
रत्नागिरीतील खेड तालुक्यातील मुम्बाके येथील चारही मालमत्ता दाऊदची आई अमिना बी हिच्या नावावर असून जवळपास चार वर्षांपूर्वी `साफेमाʼ कायद्याअंतर्गत या जमिनी जप्त करण्यात आल्या होत्या. त्या मालमत्तेची रक्कम १९ लाख रुपये होती. या चार मालमत्तांपैकी एक व दोन क्रमांकाच्या मालमत्तेसाठी कोणीही बोली लावली नाही. उर्वरित दोन मालमत्तांसाठी सात जण लिलावात सहभागी झाले होते. तिसऱ्या क्रमांकाच्या मालमत्तेवर सर्वाधिक म्हणजे दोन कोटी एक हजार रुपयांची बोली लावण्यात आली. ही मालमत्ता म्हणजे १७०. ९८ चौ.मी. क्षेत्रफळाची शेतजमीन आहे. तिची मूळ किंमत केवळ १५ हजार ४४० रुपये ठेवण्यात आली होती. याशिवाय चौथ्या क्रमांकाच्या मालमत्तेवर तीन लाख २८ हजार रुपयांची बोली लावण्यात आली. ती मालमत्ता १७३० चौ.मी जमीन असून त्याची मूळ किंमत एक लाख ५६ हजार २७० रुपये ठेवण्यात आली होती. दोन्ही मालमत्तांसाठी अजय श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीने सर्वाधिक बोली लावली.
हेही वाचा – लक्षद्वीपच्या मुस्लिमांनी जपलंय वेगळेपण, अजूनही करतात मातृवंशीय परंपरेचं अनुसरण
साफेमा कायदा काय आहे?
स्मगलर्स आणि फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर अॅक्ट (साफेमा) या कायद्याअंतर्गत तस्करी व गैर कृत्यातून जमा केलेल्या मालमत्तांचा लिलाव करता येतो. या कायद्यातील कलम ६८ फ अंतर्गत तस्कर आरोपीच्या नातेवाईकांच्या मालमत्ताही जप्त करण्याची तरतूद आहे. त्या अंतर्गत अमली पदार्थ तस्कर, कुख्यात गुंडाच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे. साफेमा ही यंत्रणा थेट केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. या कायद्याअंतर्गत मालमत्तेवर टाच आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या मालमत्तांचा लिलाव करण्यात येतो. त्या विरोधात न्यायालयात दाद मागता येते. दाऊद कुटुंबीयही या कारवाईबाबत न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रक्रियाला सुरुवात झाली.
यापूर्वी दाऊदच्या कोणत्या मालमत्तांचा लिलाव झाला?
यापूर्वी दाऊद इब्राहिमच्या कुटुंबियांच्या मालकीच्या अनेक मालमत्तांची ओळख पटवून त्यांचा लिलाव करण्यात आला आहे. त्यात ४.५३ कोटी रुपयांना विकलेले रेस्टॉरंट, ३.५३ कोटी रुपयांना विकलेल्या सहा सदनिका आणि ३.५२ कोटी रुपयांना विकलेल्या विश्रामगृहाचा समावेश आहे. डिसेंबर २०२० मध्ये दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील मालमत्तेचा लिलाव सुमारे सव्वा कोटी रुपयांना करण्यात आला होता, त्यात दोन भूखंड आणि बंद पडलेल्या पेट्रोल पंपाचा समावेश होता. खेड तालुक्यातील लोटे गावातील ही मालमत्ता दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकरच्या नावावर नोंदणीकृत होती. नागपाडा येथील ६०० चौरस फुटांच्या सदनिकेचा एप्रिल २०१९ मध्ये १ कोटी ८० लाख रुपयांना लिलाव करण्यात आला होता. तर २०१८ मध्ये साफेमा अधिकाऱ्यांनी दाऊदच्या पाकमोडिया स्ट्रीट येथील मालमत्तेचा लिलाव ७९ लाख ४३ हजार रुपयांच्या राखीव किमतीत केला होता. सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने (एसबीयूटी) ती ३.५१ कोटी रुपयांना खरेदी केली होती.
हेही वाचा – विश्लेषण: कापूस पणन महासंघ अडचणीत कशामुळे?
आणखी कोणत्या गुन्हेगारांच्या मालमत्तांचा लिलाव झाला होता?
साफेमा या केंद्रीय यंत्रणेद्वारे इकबाल मिर्चीच्या मुंबईतील दोन सदनिकांचा लिलावही १० नोव्हेंबर, २०२० ला झाला होता. पण त्यावेळीही या मालमत्तेसाठी कोणीही बोली लावली नाही. त्यापूर्वीही साफेमामार्फत या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. पण ती खरेदी करण्यासाठी त्यावेळी कोणीही उत्सुकता दाखवली नाही. साफेमाने या मालमत्तेची मूळ किंमत तीन कोटी ४५ लाख रुपये निश्चित केली होती. ही किंमत अधिक वाटल्यामुळे कोणीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी बोली लावली नाही. सांताक्रुझ येथील उच्चभ्रू जुहू तारा रस्त्यावर ही मालमत्ता आहे. तेथील मिल्टन सहकारी सोसायटीत ५०१ व ५०२ या दोन सदनिका आहेत. त्यांचे क्षेत्रफळ १२०० चौ.फूट आहे. मिर्चीची पत्नी हाजरा मेमन, दोन मुले असिफ व जुनैद यांच्यासह १३ जणांवर ईडीने डिसेंबर २०१९ मध्ये गुन्हा दाखल केला होता. आतापर्यंत मिर्चीच्या सुमारे ८०० कोटींच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.