चीन हा देश वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतो. या देशातील नेते किंवा बड्या व्यक्ती काही महिन्यांसाठी अचानक गायब झाल्याचे वृत्त यापूर्वी अनेकवेळा आलेले आहे. आता चीनमध्ये जन्मलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला पत्रकारावर केलेल्या कारवाईमुळे हा देश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चीन सरकारने या महिला पत्रकाराला तब्बल तीन वर्षे तुरुंगात डांबले होते. चीनने हे पाऊल का उचलले होते? आता या महिला पत्रकाराची सुटका का करण्यात आली? हे सर्व जाणून घेऊ या…

तब्बल तीन वर्षांनी केली सुटका

चेंग लेई असे चीनने तीन वर्षे तुरुंगात डांबलेल्या ऑस्ट्रेलियन महिला पत्रकाराचे नाव आहे. चीनची गुपिते बेकायदेशीरपणे अन्य देशांना पुरविल्याचा आरोप लेई यांच्यावर करण्यात आला होता. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी ही गुपिते अन्य देशांना पुरविल्याचा दावा चीन सरकारने केला होता. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी दिलेल्या माहितीनुसार लेई यांची ११ ऑक्टोबर रोजी सुटका करण्यात आली आहे. लेई यांच्या सुटकेनंतर अल्बानीज यांनी समाधान व्यक्त केले. “लेई यांची सुटका व्हावी अशी आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करत होतो. फक्त त्यांचे कुटुंबीयच नव्हे तर संपूर्ण ऑस्ट्रेलिया देशातर्फे लेई यांचे स्वागत केले जाईल,” अशी प्रतिक्रिया अल्बानीज यांनी व्यक्त केली.     

semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
The monkey pulled the girl's hair
‘त्याने तिचे केस ओढले आणि…’ माकडाबरोबर मस्ती करणं पडलं महागात; VIDEO पाहून बसेल शॉक
person in jail to contest polls candidates win polls from prison prison contest polls
एक काळ असा होता…
Mumbai woman lost rupees 6 lakhs
मुंबई : ऑनलाईन वस्तू विकणे महागात, महिलेला लाखोंचा गंडा
genelia deshmukh impress after seeing beautiful bond between her two sons
Video : रियान अन् राहिलचं बॉण्डिंग पाहून आई जिनिलीया भारावली! देशमुखांच्या सुनेने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
father held for molesting 14 year old girl in nagpur
जन्मदात्याकडून किळसवाणा प्रकार

हेही वाचा >>> गाझापट्टीला जगातील सर्वात मोठे ‘खुले कारागृह’ का म्हणतात?

चेंग लेई कोण आहेत?

चेंग लेई यांचा जन्म १९७५ साली चीनमधील हुनान प्रांतातील युयांगमध्ये झाला. लेई १० वर्षांच्या असताना त्यांच्या पालकांनी मेलबर्न येथे स्थलांतर केले. पुढे १९९५ साली त्यांनी क्वीन्सलँड विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आणि लेखापाल म्हणून नोकरी करू लागल्या. २००१ साली चीन आणि ऑस्ट्रेलियाच्या एका संयुक्त उपक्रमासाठी चेंग बिझनेस अॅनालिस्ट म्हणून चीनमध्ये गेल्या. त्यानंतर २०२२ साली चेंग यांनी पत्रकारिता क्षेत्रात पाऊल ठेवले. त्या चीन सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही या इंग्रजी टीव्ही चॅनेलमध्ये कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर आर्थिक घडामोडींची माहिती देणाऱ्या सीएनबीसी आशिया या टीव्ही चॅनेलमध्ये त्यांनी पत्रकार म्हणून एकूण ९ वर्षे काम केले. या काळात त्यांनी चीन आणि सिंगापूर येथे नोकरी केली. त्या सिंगल मदर असून त्यांना दोन अपत्य आहेत.

चेंग लेई यांना ताब्यात का घेण्यात आले होते?

चेंग लेई ऑगस्ट २०२० मध्ये सीजीटीएम या चीनच्या टीव्ही चॅनेलवर दिसेनाशा झाल्या. सीजीटीएन या टीव्ही चॅनेलवरून त्यांची संपूर्ण माहिती अचानकपणे हटवण्यात आली. चेंग लेई यांचे मित्र आणि कुटुंबीय त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ते शक्य होत नव्हते. त्यानंतर देशाची राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता चेंग लेई यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे चीनने जाहीर केले. लेई यांना नेमके कोणत्या ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, याची चीनने कोणतीही माहिती दिली नव्हती. विशेष म्हणजे त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तसेच त्यांना कायदेशीर मदतीसाठी वकील देण्यास नकार देण्यात आला होता.

हेही वाचा >>> चीनने पाकिस्तानमधील गुंतवणूक का थांबवली?

नजरकैदेत असताना लेई यांची अनेकवेळा चौकशी

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्ट कॉर्पोरेशनने (एबीसी) ऑगस्ट २०२१ मध्ये एक वृत्त दिले होते. या वृत्तानुसार चेंग यांना एका खोलीत डांबण्यात आले होते. या खोलीत शुद्ध हवा नव्हती. नैसर्गिक प्रकाश येण्यास वाव नव्हता. नजरकैदेत असताना लेई यांची अनेकवेळा चौकशी करण्यात आली. याच काळात त्यांच्यावर पत्र लिहिण्यावर, व्यायाम करण्यावर बंधनं लादण्यात आली, असे या वृत्तात सांगण्यात आले होते.

मार्च २०२२ मध्ये सुनावणीला सुरुवात  

चेंग लेई यांना ताब्यात घेतल्यानंतर साधारण सहा महिन्यांनी चीन पोलिसांनी त्यांना अधिकृतरित्या अटक केली होती. चीनची गुप्त माहिती इतर राज्यांना दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मार्च २०२२ मध्ये या खटल्यावर प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. ही सर्व सुनावणी बंद दाराआड घेण्यात आली. या काळात ऑस्ट्रेलियाच्या राजनयिक अधिकाऱ्यांना यावेळी हस्तक्षेप करण्यास मनाई करण्यात आल्याचे वृत्त तेव्हा द वॉशिंग्टन पोस्टने दिले होते. या प्रकरणातील निकालही नंतर सार्वजनिक करण्यात आला नव्हता.

चेंग लेई यांची सुटका का करण्यात आली?

चीन आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांतील संबंध ताणलेले असताना चेंग लेई यांना ताब्यात घेण्यात आले होते. करोना महासाथीच्या काळात ऑस्ट्रेलियाने करोना विषाणूचा उगम कोठून झाला, हे शोधण्यासाठी जागतिक पातळीवर स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या या मागणीमुळे या दोन्ही देशांतील संबंध आणखी ताणले होते. या काळात चीनने ऑस्ट्रेलियावर अनेक निर्बंध लादले होते. ऑस्ट्रेलियाकडून आयात होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंवर चीनने आयातकर वाढवला होता.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान लवकरच चीनच्या दौऱ्यावर   

या दोन्ही देशांतील तणाव सध्या निवळला आहे. चीनने ऑस्ट्रेलियाविरोधातील सर्व निर्बंध सध्या हटवले आहेत. मंत्रीस्तरावरील नेते एकमेकांच्या देशांना भेट देत आहेत. सिडनी येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक जेम्स लॉरेन्सन यांनी चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बदललेल्या संबंधांबाबत सांगितले आहे. “ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान चीनला भेट देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ही भेट यशस्वी व्हावी, अशी चीनची इच्छा आहे हा संदेश जाण्यासाठी चीनने चेंग लेई यांची सुटका केली आहे,” असे जेम्स म्हणाले.