भारतात पहिल्यांदाच ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच५एन१) मुळे तीन वाघ आणि एक बिबट मृत्युमुखी पडले. पक्ष्यांतून पसरणाऱ्या या विषाणूची लागण माणसांनंतर प्राण्यांतही झाली…

गोरेवाडा बचाव केंद्रात काय घडले?

why donald trump want greenland who owns the island what is the role of the greenlanders
डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँड का हवे आहे? बेट कोणाच्या मालकीचे? ग्रीनलँडवासियांची भूमिका काय?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी दररोज किती तास व्‍यायाम करावा? (फोटो सौजन्य @Freepik)
Heart Attack Exercise : हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी दररोज किती तास व्‍यायाम करावा?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
taliban rules against afghan women
अफगाणिस्तानातील महिलांना एकमेकींचा आवाज ऐकण्यावर बंदी, कुराण पठणासही मनाई; तालिबानच्या नव्या फतव्यात काय?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!

नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रात ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच५एन१) विषाणूच्या बाधेमुळे तीन वाघ आणि एक बिबट्याचा मृत्यू झाला. चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी प्रकल्पातून ११ डिसेंबरला दोन वाघ तर १६ डिसेंबरला एक वाघ गोरेवाड्यातील बचाव केंद्रात स्थलांतरित करण्यात आले. वाघांना स्थलांतरित केल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी केली असता त्यांना कोणताही आजार नव्हता. त्यांच्यात ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ची लक्षणे देखील नव्हती. मात्र, ते थोडेफार लंगडत होते. जेवण कमी घेत होते. यांपैकी दोन वाघ व एका बिबट्याचा २० डिसेंबरला तर एका वाघाचा २३ डिसेंबरला मृत्यू झाला. गोरेवाड्यातील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’मुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. नमुने भोपाळ येथील ‘आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीज’येथे पाठविण्यात आले; त्यांनीही गोरेवाडा येथील निष्कर्षांना दुजोरा दिला.

हेही वाचा >>> Heart Attack Exercise : हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी दररोज किती तास व्‍यायाम करावा?

भारताबाहेरही वाघ, प्राणी दगावले का?

गेल्या काही वर्षांमध्ये ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ हा विषाणू जंगली पक्ष्यांपासून कोल्हे, अस्वल आणि सील यासह विविध मांसाहारी सस्तन प्राण्यांमध्ये पसरला आहे. या विषाणूने दक्षिण व्हिएतनाममधील दोन प्राणिसंग्रहालयांना प्रभावित केले आहे. २०२४ मध्ये सुमारे ४७ वाघ एच५एन१मुळे मृत्युमुखी पडले आहेत. लाँग एन प्रांतातील माय क्विन्ह सफारी पार्कमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ मध्ये २७ वाघ, तीन सिंह आणि एका बिबट्याचा विषाणूमुळे मृत्यू झाला. तर डोंग नाय प्रांतातील मँगो गार्डन रिसॉर्टमध्ये या विषाणूमुळे २० वाघ मृत्युमुखी पडले. या विषाणूची लागण झालेल्या प्राण्यांमध्ये भूक न लागणे, ताप येणे आणि हालचाल करण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसून आली. मँगो गार्डन रिसॉर्टमधील वाघांना मृत्युपूर्वी कोंबडी खायला देण्यात आली होती. त्यामुळे विषाणू दूषित कोंबडीतून पसरला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. डिसेंबर २०२३च्या अखेरीस संपूर्ण व्हिएतनाममध्ये ३८५ वाघ बंदिवासात होते. यापैकी सुमारे ३१० वाघ १६ खासगी मालकीच्या फार्ममध्ये आणि प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आले. तर उर्वरित सरकारी सुविधांमध्ये आहेत. अमेरिकेतील डुकरांमध्ये पहिल्यांदाच एच५एन१ची लागण झाल्याचे अमेरिकेच्या कृषी विभागाने अलीकडेच स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?

एच५एन१ काय आहे?

‘एव्हियन फ्लू’ किंवा ‘एव्हियन इनफ्लूएन्झा’ ‘एच५एन१’ या विषाणूमुळे होतो. यालाच ‘बर्ड फ्लू’ असेही म्हणतात. हा संसर्गजन्य हा विषाणू साधारणपणे बदक, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो. अनेकदा स्थलांतरित पक्ष्यांमुळे संसर्ग इतर प्राणी व माणसांतही पसरू शकतो. ‘एच५एन१’ हा असा एकटाच एक विषाणू नाही. त्याचे सोळा प्रकार आहेत. यातलाच एक प्रकार गेल्या काही वर्षांत जगभरातल्या प्राण्यांमध्ये पसरतो आहे. १९९७ मध्ये ‘बर्ड फ्लू’चे माणसांतल्या संसर्गाचे पहिले प्रकरण आढळले होते. हाँगकाँगमधल्या पक्षी बाजारापासून याची सुरुवात झाली आणि ६० टक्के बाधितांचा तेव्हा मृत्यू झाला होता. मात्र, हा आजार माणसांमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे सहजासहजी पसरू शकत नाही.

प्राण्यांमधून मानवालाही लागण होते का?

एच५एन१ आजारी जनावरांच्या कच्च्या दुधात मोठ्या प्रमाणात आढळला आहे. मात्र, तो दुधात किती काळ जगू शकतो हे स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेतील टेक्सासमध्ये गायींना ‘बर्ड फ्लू’ची लागण झाली होती. तिथल्या डेअरी फार्ममधील व्यक्तीलाही हा आजार झाला. ही चिंतेची बाब असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. पहिल्यांदाच ‘बर्ड फ्लू’ गायीच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरला आहे. काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ‘बर्ड फ्लू’चा विषाणू बदलत आहे. पूर्वी हा आजार फक्त पक्ष्यांकडून गायींमध्ये पसरत होता, आता हा आजार गायींपासून पक्ष्यांमध्येही पसरत आहे. चिंतेची बाब म्हणजे आजारी गायींच्या दुधातही हा विषाणू आढळून आला आहे.

rakhi.chavhan @expressindia.com

Story img Loader