Ayodhya Ram Mandir; Karbi Ramayana ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या जळगाव येथील भाषणात रामायण आणि प्रभू रामचंद्र यांच्या उल्लेखानंतर प्रसार माध्यमांवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. या भाषणात त्यांनी अनेक रामायणांच्या आवृत्यांचा संदर्भ दिला. त्यात त्यांनी कारबि रामायणाचाही उल्लेख केला आहे. हे रामायण ईशान्य भारतातील असून त्यातील वेगळेपण वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे रामायण छाबिन आलुन किंवा कारबि रामायण म्हणून प्रसिद्ध आहे. त्या रामायणाविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे. 

कोण आहेत कारबि?

कारबि म्हणजे आसाममधील डोंगराळ भागात राहणारी एक जमात. आंगलाँग जिल्हा हा या कारबि जनजातीचे मुख्य अधिवासाचे ठिकाण आहे. ते आसामच्या उत्तर काचर हिल्स, सिबसागर, नोगॉन्ग आणि दारंग जिल्ह्यातही आढळतात. कारबि जनजातीच्या लोककथांवरून असे लक्षात येते की, पूर्वी ही जमात कोलोंग, कोपिली नद्यांच्या काठावर आणि काझिरंगाच्या संपूर्ण परिसरात वसाहत करून होती. मेघालयातील जैंतिया राज्याला लागून कारबिंचे स्वतःचे राज्य होते. त्यांना आसामच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात प्रमुख स्थान आहे. कारबि यांचे मूळ तिबेटो- मंगोलियन असल्याचे आणि  ते दक्षिण पूर्व आशियामधून आसाममध्ये स्थलांतरित झाल्याचे एडवर्ड स्टॉक, गियरसन (मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ) यांसारखे काही अभ्यासक मानतात. तर पद्मश्री डॉ. व्ही. एस. वाकणकर यांनी या जमातीचे मूळ इंडो- तिबेटन असल्याचे नमूद केले आहे. 

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Mallikarjun kharge
Acharya Pramod Krishnam : “खरे हिंदू…”, मल्लिकार्जुन खरगेंवर काँग्रेसच्या माजी नेत्याचीच टीका!
Sharda Sinha, Chhath Puja songs, Bihar,
शारदा सिन्हा… छठ पूजा गीतांना अजरामर करणारी ‘बिहार कोकिळा’
Loksatta vyaktivedh Dairy personality Ravindra Pandurang Apte former president of Gokul passed away
व्यक्तिवेध: रवींद्र आपटे
Ekta kapoor on The Sabarmati Report release amid maharashtra assembly election
“मी हिंदू आहे, याचा अर्थ मी…”; एकता कपूर नेमकं काय म्हणाली?
Ashok MaMa Colors Marathi New Serial
मुहूर्त ठरला! ‘अशोक मा.मा.’ मालिकेत झळकणार प्रसिद्ध अभिनेत्याची लेक अन् ‘कलर्स मराठी’ची लोकप्रिय नायिका, पाहा प्रोमो

रामायणात आढळते कारबि जमातीचे मूळ  

स्थानिक दंतकथांनुसार श्रीरामाच्या रक्षणार्थ राक्षस राजा रावणाशी जे लढले त्यांना कारबि म्हणतात. या कथांनुसार कारबिंचे मूळ त्रेतायुगात आहे. प्रभू रामांना त्यांनी बाण चालविण्यासाठी मदत केली होती. प्रभू रामांचे बाण घेऊन कारबि जात असत म्हणून त्यांना करीकिरी म्हटले जात असे. करीकिरी या शब्दावरून वर्तमान कारबि हे त्याचे अपभ्रंश रूप प्रचलित झाले असे मानले जाते. कारबिंचे स्वतःचे रामायण आहे जे “साबिन अलुन” किंवा रामायणाचे गीत म्हणून ओळखले जाते. हे गीत तीन दिवस गायले जाते. त्यांच्या या स्थानिक रामायणात भिन्नता आढळते, असे असले तरी त्यांची मांडणी मूळ वाल्मिकी रामायणावरच आधारलेली आहे. 

अधिक वाचा: विश्लेषण: रामायण एक अन्वयार्थ अनेक!

राम गीत कोणी रचले?

कारबि परंपरेनुसार कारबि जमातीत पूर्वी गाणे अस्तित्त्वात नव्हते. म्हणून हेम्फूने  (परमेश्वराने) संगीतकार रंगसेनाला एक गाणे तयार करण्यास सांगितले. “तू पृथ्वीवर जाऊन कारबिंमध्ये संगीत सुरू कर”, असे हेम्फू रंगसेनाला म्हणाले. यानंतर रंगसेनाने मिरिजांग बंधूंच्या रूपात जन्म घेतला आणि कारबि श्रद्धेनुसार साबिन अलूनची रचना केली अशी मान्यता आहे. 

प्रसिद्ध आसामी कवी माधव कंदली यांनी १४ व्या शतकात कचारी किंवा बाराही राजा महामानिक्य यांच्या आश्रयाखाली वाल्मिकी रामायणाचे प्रथम आसामी भाषेत भाषांतर केले. ‘छाबिन/साबिन आलून’ म्हणजे ‘छाबिनचे/साबिनचे गाणे’. पारंपारिक श्रद्धेनुसार माधव कंदली हे साबिन कांडली या गावातील होते, हे ठिकाण आसामच्या नागाव जिल्ह्यात कारबि आंगलाँगच्या सीमेला लागून आहे. हे ठिकाण राजा महामानिक्यची राजधानी असलेल्या डोबोका नावाच्या ठिकाणाला लागून आहे. अभ्यासकांच्या मते ‘साबिन अलून’ रचणारा साबिन हा माधव कंदलींच्या  समकालीन होता. 

कारबि रामायण आणि भिन्नता 

कारबि रामायण हे वाल्मिकी ऋषींच्या मूळ कथेपेक्षा स्थानिक भिन्नता दर्शविणारे आहे. हे कथानक कारबिंच्या परंपरा आणि चालीरीतींशी जुळणारे आहे. उदाहरणार्थ, मिथिलाचा राजा जनक हा एक शेतकरी आहे, जो ‘टोंगी’ वर बसतो, (शेतात लागवडीवर लक्ष ठेवण्यासाठी झाडाच्या वर (मचाण) बांधलेली तात्पुरती झोपडी.) भगवान विष्णूच्या आज्ञेनुसार त्यांची पत्नी लक्ष्मी राजा जनकाच्या घरी जन्म घेते. ती मोराच्या अंड्याच्या रूपात शेतात दिसते. काही गुराखी हे असामान्य दिसणारे अंडे पाहतात आणि राजाकडे घेऊन जातात. मोराची अंडी खाण्यायोग्य नसल्यामुळे ती राणी हेम्फीच्या ताब्यात ठेवावी असा राजा नियम करतो. काही दिवसांनी, राणी हेम्फीला मोराच्या अंड्याच्या जागी एक सुंदर मुलगी दिसली जी तिने आपली मुलगी म्हणून दत्तक घेतली आणि तिचे नाव ‘सीता’ ठेवले.

कसा ठरला सीता स्वयंवराचा ‘पण’

कारबि रामायणानुसार, राक्षस राजा रावण आणि त्याचा भाऊ (पुत्र नव्हे) मेघनाद यांच्या अत्याचारांपासून विष्णू देवतांची सुटका करण्याचे आश्वासन देतात. एकदा राजा जनक काही कामासाठी बाहेर गेला असताना, त्याच्या अनुपस्थितीत शाही परिसर घनदाट वनस्पतींनी झाकोळला गेला, जो सीतेने एका दिवसात स्वच्छ केला आणि असे करताना तिला एक लोखंडी धनुष्य सापडले. धनुष्य पिढ्यानपिढ्या एका झाडाखाली लपवलेले होते. सीतेने एका हातात धनुष्य उचलले आणि दुसऱ्या हाताने ते त्याच्या मूळ जागेवर नेले. राजा जनक परत आले तेव्हा अंगण साफ केलेले आणि धनुष्य त्याच्या मूळ जागी ठेवलेले पाहून त्यांना आश्चर्य वाटले. हे सर्व तरुण सीतेने केले हे जाणून त्यांना आनंद झाला. त्याच दिवशी त्यांनी आपल्या राणीशी सल्लामसलत करून ठरवले, ‘जो कोणी हे धनुष्य उचलेल तो सीतेशी लग्न करेल’, असा ‘पण’ जाहीर केला. 

अधिक वाचा: अयोध्येतील राम मंदिराची नागर शैली नेमकी आहे तरी काय?

राम-लक्ष्मण 

या रामायणानुसार राजा दशरथाला दोन पत्नी  होत्या, एक मानव जातीची आणि दुसरी राक्षस वंशातील. संतती होण्यासाठी राजा यमाची प्रार्थना करतो, यम त्याला एका जंगलात जाण्याचा सल्ला देतो, जेथे फळांनी भरलेले संत्र्याचे झाड आहे. राजाने एकाच निशाण्यात जे काही फळ पडेल ते घ्यावे. दशरथाने यमाच्या सांगण्याप्रमाणे केले आणि त्याला एक संत्र मिळाले. राक्षस वंशातून आलेली त्याची धाकटी राणी हियपी हिने संपूर्ण फळ खाऊन टाकले. या वागण्याने मोठी राणी चकरबी दुखावली गेली पण तिने साल खाल्ली. कालांतराने दोन्ही राण्या गरोदर राहिल्या आणि त्यांना प्रत्येकी एक मुलगा झाला. त्यांना राम आणि लक्ष्मण अशी नावे देण्यात आली. त्यांच्या जन्माच्या वेळी, रावणाचा मुकुट पडला होता, जो तो पृथ्वीवरील एखाद्या बलवान व्यक्तीच्या जन्माचे संकेत मानत होता. आपल्या संशयाची खातरजमा करण्यासाठी त्याने आपल्या मंत्र्यांना पाठवले. त्यांना राम, लक्ष्मणाबद्दल कळले, परंतु ते त्यांचे काहीही नुकसान करू शकले नाहीत. 

येथे राजा जनकाने सीतेचा विवाह करण्याचे ठरवले आणि सर्व राजांना सूचित केले. या लग्नात रावणालाही आमंत्रित करण्यात आले होते. तो आल्यावर राजा जनकाने त्याचा सन्मान केला आणि कार्यक्रमात स्वागत केले. त्याने धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण सर्व शक्ती लावूनही ते तो उचलू शकला नाही. जनकाने राम आणि लक्ष्मण यांनाही विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित केले. राम आपल्या आई-वडिलांच्या परवानगीने जनकाच्या दूतांसह समारंभात सहभागी होण्यासाठी निघाला. वाटेत दूत दोन्ही राजपुत्रांना जनकाच्या राज्यात जाण्याचा छोटा रस्ता घनदाट जंगलातून जातो जो एका भयंकर राक्षसाच्या ताब्यात आहे असे सांगतात. राम आणि लक्ष्मण वाटेतल्या राक्षसाचा नाश करतात.

सीता स्वयंवर 

अयोध्येचे राजपुत्र जनकाच्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांचे यथोचित आदराने स्वागत करण्यात येते. रामाने सहजच धनुष्य उचलले, आणि भंगही केले. राजा जनकाने आपली कन्या सीता हीचा विवाह रामाशी केला. विवाहानंतर सीता राजा जनकाच्या घरीच राहते आणि रामही आपल्या पत्नीसोबत ‘घरजावई’ म्हणून राहतो. लक्ष्मणही रामाबरोबरच जनकनगरीत राहतो आणि दोन्ही भाऊ जनकाला त्याच्या झुम लागवडीत मदत करतात, असे कारबि रामायणात म्हटले आहे. 

या रामायणात परशुराम कथा देखील येथे समाविष्ट आहे. फक्त परशुरामांचे नाव बोंगपन काथार (कुऱ्हाडीधारक माणूस) असे आहे आणि त्यांना आव्हान देणारा लक्ष्मण आहे, राम नाही. काही दिवस अयोध्येत राहिल्यानंतर राजा दशरथाने अचानक राम, लक्ष्मण आणि सीता यांना १२ वर्षांसाठी नारायण टेकडीवर निर्वासित केले. कारबि रामायणानुसार रामाला नाराजोन (नारायण) हिल्समध्ये वनवासात पाठवण्यात आले होते. 

साबिन अलूनच्या सादरीकरणाचा मंच 

‘साबिन अलून’ हे मंचावर सादर केले जाते.  यासाठी एक मातीचा मंच तयार केला जातो आणि त्यावर त्रिशूळ ठेवला जातो. दोन विभाजित बांबूचे तुकडे एकमेकांवर मंचावर ठेवले जातात. त्यानंतर व्यासपीठाभोवती बांबूचे नऊ तुकडे जोडले जातात. मंचाभोवती केळीच्या पाने पसरवली जातात आणि नंतर ज्या तीन कोपऱ्यात जिथे कोंबडीचा बळी दिला जातो तेथे तांदळाचे पीठ ठेवले जाते. कोंबडीची पिसे तांब्याच्या रिंगसह रंगमंचावर ठेवली जातात. हे कारबि रामायण ईशान्य भारतात लोकप्रिय आहे. एकूणच राम कथेत कितीही भिन्नत्त्व असले तरी राम नामाचे गारुड मात्र सारखेच आहे.