या वर्षाच्या सुरुवातीलाच धार्मिक पर्यटन जोर धरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. सीएनबीसीच्या सर्वेक्षणानुसार, जगातील पाच कोटी ते एक अब्ज पर्यटक राम मंदिरामुळे भारताला भेट देतील असा अंदाज होता. जानेवारीत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर या धार्मिक स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या या वर्षी ताजमहाल, रोमची व्हेटिकन सिटी, मक्का यांच्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक असण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला होता. याशिवाय भारतातील इतर तिरुपती बालाजी, वैष्णव देवी, जम्मू आणि काश्मीर येथील तीर्थक्षेत्रे या धार्मिक स्थळांना पर्यटकांची पसंती मिळणार हे निश्चित झाले होते. ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ने (पीआयबी) दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये कोविड महासाथपूर्व काळात १०.९३ दशलक्ष परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली होती आणि गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर याच दरम्यान ६.४३ दशलक्ष विदेशी पर्यटक भारतात येऊन गेले. त्यामुळेच या संपूर्ण वर्षभरात भारतीय पर्यटन क्षेत्र जोमात असण्याचीच शक्यता आहे. केवळ विदेशी पर्यटकच नाही तर भारतीय पर्यटकही यात मागे नाहीत. भारतीय पर्यटकांचा लेखाजोखा सांगणारा एक अहवाल नुकताच ‘मेक माय ट्रिप’ने प्रकाशित केला. त्याविषयी जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.

अधिक वाचा: अयोध्येतील राम मंदिराची नागर शैली नेमकी आहे तरी काय?

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
guru and shukra yuti | Gaj Lakshmi Rajyog
Gaj Lakshmi Rajyog : मिथुन राशीमध्ये १२ वर्षानंतर निर्माण होणार गजलक्ष्मी राजयोग, या तीन राशींचे नशीब चमकणार, होणार आकस्मिक धनलाभ
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
Canada Khalistani
Canada : कॅनडाच्या ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिराचा कार्यक्रम रद्द; खलिस्तानी धमकीमुळे हिंसाचाराची भीती
singles day in china
11/11: याच दिवशी का साजरा केला जातो ‘सिंगल्स डे’?
Dance Viral Video
‘डान्स असावा तर असा…’; ‘चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी’ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
Canada News
Canada : चिथावणीखोर वक्तव्याबद्दल कॅनडातील ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिराच्या पुजाऱ्याची हकालपट्टी

अहवाल काय सांगतो?

ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी ‘मेक माय ट्रिप’च्या ट्रॅव्हल ट्रेण्ड्स या अहवालात काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदविण्यात आलेली आहेत. २०१९ पासून भारतीय पर्यटकांच्या संख्येत अनेक पटींनी वाढ झाली आहे. २०१९ च्या तुलनेत २०२३ मध्ये सुमारे २५ टक्के वाढ झाल्याचे चित्र आहे. शिवाय भारतीय प्रवाशांचा विमानाने प्रवास करण्याकडेही कल वाढल्याचे आणि हा कल बदलत्या जीवनशैलीचे द्योतक असल्याचे म्हटले आहे. भारतीय पर्यटक नवनवीन स्थळांना अधिकाधिक प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटनात वाढ झाली आहे. याच धार्मिक आणि अध्यात्मिक टुरिस्ट डेस्टिनेशनमध्ये अयोध्येतील रामाचे मंदिर मुख्य स्थळ आहे. ‘इंडिया ट्रॅव्हल ट्रेण्ड्स’ हा अहवाल देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय पर्यटकांच्या प्रवासाविषयी माहिती पुरवतो. हा अहवाल लक्षावधी पर्यटकांच्या भ्रमंतीवर आधारित आहे.

भारतीय कुठे प्रवास करतात?

भारतात गेल्या दोन वर्षांमध्ये धार्मिक स्थळांच्या पर्यटनात ९७ टक्के वाढ झाली आहे. दुसऱ्या (टीयर- टू) आणि तिसऱ्या स्तरातील- (टीअर थ्री) शहरांमधून येणारे पर्यटक वाढत्या प्रमाणात आध्यात्मिक स्थळांची निवड करत आहेत. समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा बदल मानला जात आहे. आधुनिक लाईफस्टाइलच्या काळात आध्यात्मिक अनुभव घेण्याच्या दिशेने होणारा हा प्रवास सांस्कृतिक बदलाचा निदर्शक आहे. धार्मिक स्थळांचा जास्तीतजास्त शोध घेतला जात आहे. या शोधात अयोध्या अग्रेसर आहे २०२२ च्या तुलनेत, २०२३ मध्ये राम मंदिरामुळे अयोध्या या धार्मिक स्थळाच्या शोधात ५८५ टक्क्यांनी वाढ झाली. तर त्याच बरोबरीने उज्जैनच्या शोधात ३६९ टक्के आणि बद्रीनाथच्या शोधात ३४३ टक्के वाढ झाली आहे. यातूनच भारतीयांमध्ये नवीन तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची आणि अनुभवण्याची आवड वाढत असल्याचे दिसते. जिम कॉर्बेट (१३१ टक्के वाढ), उटी आणि मुन्नार यांसारख्या शोधांसह, लोकप्रिय वीकेण्ड गेटवेजनादेखील भारतीय पर्यटकांची पसंती लाभते आहे.

अधिक वाचा: विश्लेषण: रामायण एक अन्वयार्थ अनेक!

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय प्रवासी दुबई, बँकॉक आणि सिंगापूर यांसारख्या लोकप्रिय स्थळांना पसंती देत आहेत, या स्थळांच्या शोधाचे प्रमाण ३० टक्के इतके आहे. तर लंडन, टोरंटो आणि न्यूयॉर्क ही लांब पल्ल्याची सर्वाधिक शोधली जाणारी ठिकाणे आहेत. भारतीय पर्यटकांमध्ये या स्थळांविषयीचे आकर्षण दिसून येते. शिवाय हाँगकाँग, अल्माटी, पारो, बाकू, दा नांग आणि तिबिलिसी यासह उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय गंतव्ये शोधांमध्येही लक्षणीय वाढ झाली.

भारतीयांचे आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियोजन

कुटुंबाबरोबर प्रवास करण्याला भारतीय अधिक पसंती देत आहेत. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये कुटुंबासह केलेले प्रवास बुकिंग ६४ टक्क्यांनी वाढले आहे. तसेच सोलो ट्रीपलाही भारतीयांचा हिरवा कंदील आहे. २०२२-२०२३ याच कालखंडात सोलो ट्रीपसाठी २३ टक्के विमानाचे बुकिंग झाले. एक महत्त्वाची बाब म्हणजे यातील ४६ टक्के बुकिंग उत्स्फूर्त म्हणजे आयत्यावेळेस होतात. म्हणजेच प्रवासाला सुरुवात करण्याच्या एका आठवाड्यापेक्षाही कमी कालखंडात बुकिंग केले जाते. याउलट, सर्व आंतरराष्ट्रीय बुकिंग्जपैकी निम्मी बुकिंग किमान दोन आठवडे अगोदर करण्यात येतात. तर फक्त एक तृतीयांश आंतरराष्ट्रीय बुकिंग प्रवासाच्या तारखेच्या एक महिन्यापूर्वी केली जातात, ही सजगता भारतीय प्रवाशांमधील आंतरराष्ट्रीय प्रवास नियोजनाविषयीचा लवचिक दृष्टिकोन दर्शवते.