या वर्षाच्या सुरुवातीलाच धार्मिक पर्यटन जोर धरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. सीएनबीसीच्या सर्वेक्षणानुसार, जगातील पाच कोटी ते एक अब्ज पर्यटक राम मंदिरामुळे भारताला भेट देतील असा अंदाज होता. जानेवारीत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर या धार्मिक स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या या वर्षी ताजमहाल, रोमची व्हेटिकन सिटी, मक्का यांच्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक असण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला होता. याशिवाय भारतातील इतर तिरुपती बालाजी, वैष्णव देवी, जम्मू आणि काश्मीर येथील तीर्थक्षेत्रे या धार्मिक स्थळांना पर्यटकांची पसंती मिळणार हे निश्चित झाले होते. ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ने (पीआयबी) दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये कोविड महासाथपूर्व काळात १०.९३ दशलक्ष परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली होती आणि गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर याच दरम्यान ६.४३ दशलक्ष विदेशी पर्यटक भारतात येऊन गेले. त्यामुळेच या संपूर्ण वर्षभरात भारतीय पर्यटन क्षेत्र जोमात असण्याचीच शक्यता आहे. केवळ विदेशी पर्यटकच नाही तर भारतीय पर्यटकही यात मागे नाहीत. भारतीय पर्यटकांचा लेखाजोखा सांगणारा एक अहवाल नुकताच ‘मेक माय ट्रिप’ने प्रकाशित केला. त्याविषयी जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा