अझरबैजान एअरलाइन्सचे एक विमान २५ डिसेंबर रोजी कझाकस्तानमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. हे विमान रशियातील ग्रॉझ्नी येथे निघाले होते. रशियातर्फे सुरुवातीस या दुर्घटनेमागे पक्ष्यांची धडक हे कारण दिले गेले. पण अधिक तपशील हाती येऊ लागला, त्यानुसार हे विमान रशियाच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने चुकून पाडले, ही बाब स्पष्ट होत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अझरबैजानची माफी मागितली, तरी जबाबदारी स्वीकारण्याचे टाळले. आता अझरबैजानचे अध्यक्ष इलहॅम अलीयेव्ह यांनी रशियाला थेट जबाबदार धरले आहे. शत्रूपक्षाचे समजून प्रवासी विमान पाडण्याचे प्रकार रशियाकडून यापूर्वीही घडले आहेत. त्याविषयी…

अझरबैजान एअरलाइन्सची दुर्घटना की…?

अझरबैजान एअरलाइन्सचे एम्ब्रेअर १९० प्रकारातील विमान सकाळी साडेसात वाजता अझरबैजानची राजधानी बाकू येथून उडाले. ते रशियातील ग्रॉझ्नी येथे उतरणार होते. पण तेथे उतरण्यापूर्वीच विमानाला दुसरीकडे वळवण्यात आले. इलेक्ट्रॉनिक बिघाड आणि ‘बाह्य आघाता’मुळे विमान भरकटले आणि कॅस्पियन समुद्र ओलांडून कझाकस्तानला गेले. तेथे ते कोसळले. अपघातात विमानातील ६७पैकी ३८ जणांचा मृत्यू झाला. त्यांतील बहुतेक अझरबैजानचे नागरिक होते.

central minister nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर माफी, म्हणाले…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
BJP MLA opposes Congress , Nagpur winter session,
शहांच्या समर्थनार्थ आता भाजप मैदानात, काँग्रेसचे विरोधात…
volodymyr zelensky
Russia Vs Ukraine War : ‘युद्धात मेलेल्या कोरियन सैनिकांचे रशिया जाळतोय चेहरे’; Video शेअर करत झेलेन्स्की यांचा गंभीर आरोप
Ukraine spy agency Sluzhba bezpeky Ukrainy SBU
विश्लेषण : युक्रेनची गुप्तचर संघटना इस्रायलच्या ‘मोसाद’पेक्षा धोकादायक? रशियाचा काटा काढणाऱ्या ‘एसबीयू’चा इतिहास काय?
russia cancer vaccine
आता कॅन्सरवरील उपचार शक्य? रशियाचा दावा काय? नवीन लस कसे कार्य करते?
loksatta editorial on igor Kirillov
अग्रलेख : रसायनांची सूडयात्रा!
Girish Mahajan On Chhagan Bhujbal
Girish Mahajan : “छगन भुजबळांची नाराजी आम्हाला परवडणारी नाही”, गिरीश महाजनांचं मोठं विधान

हेही वाचा : विश्लेषण : मुंबई महापालिकेचा भूखंड लिलाव योग्य की अयोग्य?

‘युक्रेनचे ड्रोन’ समजून?

हे विमान दाट धुक्यामुळे दुसरीकडे वळवले गेले. पक्ष्यांची धडक बसून ते दुर्घटनाग्रस्त झाले असावे, असा दावा सुरुवातीस रशियाच्या हवाई सुरक्षा आणि तपास यंत्रणांनी केला. खरे कारण नंतर स्पष्ट होऊ लागले. ग्रॉझ्नी या रशियन शहरावर अलीकडच्या काळात युक्रेनकडून ड्रोन हल्ले सुरू होते. त्यामुळे त्यांचा वेध घेण्यासाठी रशियाची हवाई सुरक्षा यंत्रणा सतर्क होती. अझरबैजान एअरलाइन्सला युक्रेनचे ड्रोन समजून रशियाच्या पँतसीर – एस यंत्रणेने या विमानाचा वेध घेतला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विमानाच्या शेपटीच्या अवशेषांवर मध्यम पल्ल्याच्या बंदुकीच्या गोळ्यांच्या आघाताने होऊ शकतात अशी छिद्रे आढळली. पक्ष्यांच्या धडकेने अशी छिद्रे होत नाहीत, असे बहुतेक हवाई वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनीही त्यांच्या निवेदनात ग्रॉझ्नी आणि युक्रेनियन ड्रोन्सचा उल्लेख केला होता.

मलेशिया एअरलाइन्स – २०१४

दहा वर्षांपूर्वी मलेशिया एअरलाइन्सचे एक विमान (फ्लाइट १७) अॅमस्टरडॅमहून क्वालालुंपूर येथे निघाले होते. पूर्व युक्रेनच्या हद्दीत शिरल्यानंतर विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमानातील सर्व २८३ प्रवासी आणि १५ कर्मचारी मृत्युमुखी पडले. हे विमान पाडले गेले असे स्पष्ट झाल्यानंतर सुरुवातीस रशियाने या घटनेचे खापर युक्रेनवर फोडले. युक्रेनच्या लढाऊ विमानांच्या हल्ल्यात विमान सापडले, अशी एक थिअरी मांडली गेली. काहींनी मग सीआयए या अमेरिकी गुप्तचर संघटेस जबाबदार धरले. पण डच गुन्हेवैद्यक यंत्रणेने सखोल तपास करून, हे विमान रशियन बंडखोरांनी डागलेल्या बक क्षेपणास्त्रामुळे दुर्घटनाग्रस्त झाले असा निष्कर्ष काढला. युक्रेनच्या पूर्व भागावर त्यावेळी रशियन बंडखोरांचा ताबा होता. या निष्कर्षाला जगभर मान्यता मिळाली.

हेही वाचा : २०२५ मध्ये मोठ्या धोक्याची चिंता? बर्ड फ्लू म्यूटेशनने जगभरात संकटाची स्थिती? वैज्ञानिकांनी वर्तवली भीती

कोरियन एअरलाइन्स – १९८३

अझरबैजान एअरलाइन्स आणि मलेशिया एअरलाइन्स दुर्घटनांना रशिया-युक्रेन संघर्षाची पार्श्वभूमी होती. पण १९८३मध्ये झालेल्या कोरियन एअरलाइन्स फ्लाइट ००७ विमान दुर्घटनेस शीतयुद्धाची पार्श्वभूमी होती. कोरियन एअरलाइन्सचे ते विमान अमेरिकेच्या अलास्काहून सोलकडे निघाले होते. सुरुवातीस ते भरकटले. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून ते सोव्हिएत रशियाच्या हवाई हद्दीत शिरले. साखालीन बेटांवर विमान आढळल्यानंतर सोव्हिएत यंत्रणा सतर्क झाली. दोन लढाऊ विमानांनी या विमानाचा पाठलाग केला. तोपर्यंत हे विमान आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत शिरले. पण काही वेळाने पुन्हा सोव्हिएत हवाई हद्दीत दिसू लागले. त्या दिवसांमध्ये रशियाच्या कामचात्का बेटांवर क्षेपणास्त्र चाचणी होणार होती. तिच्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी अमेरिकेने बोइंग – ७०७ प्रकारातील टेहळणी विमान त्या भागात धाडले होते. त्याची खबर सोव्हिएत यंत्रणेला मिळाली होती. कोरियन एअरलाइन्सचे विमान बोइंग – ७४७ प्रकारातील होते. पण त्याचा उड्डाणमार्ग सोव्हिएत यंत्रणेस संशयास्पद वाटला. दुसऱ्यांदा जेव्हा विमान सोव्हिएत हद्दीत शिरले, त्यावेळी हे विमान म्हणजे अमेरिकेचे टेहळणी विमान असावे, असा संशय बळावला. दोन सोव्हिएत लढाऊ विमानांनी पुन्हा उड्डाण केले आणि हवेतून हवेत मारा करणारी दोन क्षेपणास्त्रे कोरियन विमानाच्या दिशेने डागली. त्यातील एकाने विमानाचा वेध घेतला. हे विमान १ सप्टेंबर १९८३ रोजी जपानच्या समुद्रात कोसळले. सर्व २६९ प्रवासी व कर्मचारी मृत्युमुखी पडले.

Story img Loader