स्पेनमधील नवजात बालकांमध्ये विचित्र लक्षणे दिसून येत आहेत. त्यांच्या पाठ, पाय व चेहरा या अवयवांवर मोठ्या प्रमाणात केसांची वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्राण्यांच्या शरीरावर जसे केस येतात, तसेच केस या नवजात बालकांच्या शरीरावर उगवू लागले आहेत. या बालकांच्या पालकांनी टक्कल पडू नये यासाठीची औषधे घेतल्याने त्याचा दुष्परिणाम या बाळांवर झाल्याचे सांगितले जात आहे आणि त्यांच्यात ‘हायपरट्रिकोसिस’ विकसित होत आहे.

स्पॅनिश दैनिक ‘एल पेस’नुसार, स्पेनमधील नवारे (सीएफएन)च्या फार्माकोव्हिजिलन्स सेंटरला आढळून आले की, अलीकडेच ११ नवजात बालकांमध्ये ही असामान्य स्थिती विकसित झाली आहे, ज्याला वेअरवॉल्फ सिंड्रोम, असेदेखील म्हणतात. ही स्थिती मिनोक्सिडिल हा द्रव्य घटक असलेल्या औषधाच्या वापराशी संबंधित असल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे. ज्या मुलांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून आली, त्या मुलांच्या पालकांनी कमीत कमी पाच टक्के टोपिकल मिनोक्सिडिलचा वापर केला, असे डॉक्टरांच्या लक्षात आले. नेमके हे प्रकरण काय? ‘वेअरवॉल्फ सिंड्रोम’ म्हणजे नक्की काय? त्यावर उपचार आहेत का? त्याविषयी जाणून घेऊ.

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम

हेही वाचा : ‘कॉन्ट्रॅक्ट किलिंग’साठी लहान मुलांचा वापर; स्नॅपचॅट आणि टेलीग्रामच्या माध्यमातून फसवणूक, काय आहे प्रकरण?

‘वेअरवॉल्फ सिंड्रोम’ म्हणजे काय?

हायपरट्रिकोसिसला ‘वेअरवॉल्फ सिंड्रोम’ असेही म्हणतात. या आजाराने ग्रस्त असलेल्यांमध्ये अवांछित भागात जास्त प्रमाणात केस वाढतात. हा आजार काहींना जन्मापासून असतो, तर काहींमध्ये ही स्थिती नंतर उद्भवते. या आजारामुळे पाठ, पाय व चेहरा यांसारख्या भागात जास्त केस वाढतात, जे एंड्रोजनवर अवलंबून असतात. मध्ययुगीन काळापासून वैद्यकीय संग्रहांमध्ये ‘वेअरवोल्फ सिंड्रोम’ची १०० पेक्षा कमी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या आजारामुळे शरीराच्या काही भागांवर पाच सेंटिमीटर लांबीचे बारीक केस वाढतात. सध्या, हायपरट्रिकोसिसवर कोणताही इलाज नाही. ही लक्षणे नियंत्रित करण्यासाठी लोकांनी केस काढण्याचे तंत्र नियमितपणे वापरणे आवश्यक आहे, ज्यात शेविंग आणि वॅक्सिंगचा समावेश असतो.

हायपरट्रिकोसिसला ‘वेअरवॉल्फ सिंड्रोम’ असेही म्हणतात. या आजाराने ग्रस्त असलेल्यांमध्ये अवांछित भागात जास्त प्रमाणात केस वाढतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

स्पॅनिश बालकांमध्ये वेअरवॉल्फ सिंड्रोमची प्रकरणे

‘एल एकोनोमिस्ट’ने नोंदवले की, स्पेनमध्ये ११ लहान मुलांमध्ये वेअरवॉल्फ सिंड्रोमचा आजार आढळला आहे. २०२३ मधील अहवालानुसार, केवळ दोन महिन्यांत नवजात बालकांच्या शरीरावर केस दिसू लागल्यानंतर वैद्यकीय संशोधकांना हा ‘वेअरवोल्फ सिंड्रोम’असल्याचे आढळून आले. कुटुंबाची मुलाखत घेतल्यानंतर, आरोग्य अधिकाऱ्यांना कळले की, मुलाच्या वडिलांनी पाच टक्के मिनोक्सिडिलचा वापर केला होता. एप्रिल २०२३ च्या प्रकरणाच्या विश्लेषणानंतर, ‘सीएफएन’ने युरोपियन मेडिसिन एजन्सी व स्पॅनिश फार्माकोव्हिजिलन्स सिस्टीमच्या EudraVigilance डेटाबेसमधून पाहिले आणि युरोपमधील आणखी १० वेअरवॉल्फ सिंड्रोमची प्रकरणे शोधून काढली, जी मिनोक्सिडिलशी जोडलेली होती. त्यांच्या पालकांनी याचा वापर थांबवल्यास मुलांमध्ये या सिंड्रोमची लक्षणे दिसणेही बंद होऊ लागले.

आजारावरील औषधोपचार

यूएस फूड अॅण्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (एफडीए)ने प्रिस्क्रिप्शनशिवाय केस गळणाऱ्या व्यक्तींना विक्रीसाठी मिनोक्सिडिलला मान्यता दिली आहे. गेल्या काही काळापासून केसगळतीवर अनेक उपाय आले आहेत, ज्यात अरोगेन, हिम्स, कीप्स, इक्वेट आणि इतर जेनेरिक औषधांमध्ये सक्रिय घटकांपैकी एक म्हणून मिनोक्सिडिल असते. मिनोक्सिडिल हे द्रव्य किंवा फेस स्वरूपात येते आणि ते थेट त्वचेवर लावले जाते. त्यामुळे रक्तवाहिन्या शिथिल आणि विस्तारित करून रक्तप्रवाह वाढवला जातो; ज्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते. या प्रकारातील औषध रक्तदाब कमी करते आणि त्यामुळे सुरुवातीला ते उच्च रक्तदाबावरील उपचारासाठी तयार केले गेले होते. ‘सीएफएन’च्या सूचनेनुसार, मुलाच्या शरीरात मिनॉक्सिडिलच्या प्रवेशाचे तोंड किंवा त्वचा हे दोन संभाव्य मार्ग आहेत.

मिनॉक्सिडिल बाळाच्या संपर्कात आल्याने वेअरवॉल्फ सिंड्रोमची) लागण होऊ शकते. जर बाळाने पालकांचे हात किंवा डोके चोखण्याचा किंवा चघळण्याचा प्रयत्न केला, तर मिनॉक्सिडिल बाळाच्या त्वचेच्या संपर्कात येते. बाळाच्या त्वचेचा बाह्य स्तर वृद्ध व्यक्तीपेक्षा पातळ असतो, ज्यामुळे त्यांची त्वचा पर्यावरणीय रसायने शोषण्यास अधिक सक्षम होते. वेगळ्या प्रकरणात, मलेशियातील दोन वर्षांच्या मुलीमध्ये हायपरट्रिकोसिसचा दुर्मीळ जन्मजात प्रकार ओळखला गेला. मात्र, स्पेनमधील वेअरवॉल्फ सिंड्रोमची लक्षणे फार वेगळी आहेत.

हेही वाचा : सुखबीर बादल यांना सुवर्ण मंदिरात शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश; कारण काय?

तज्ज्ञांनी दिला इशारा

वैद्यकीय तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की, ही औषधे बाळांसाठी घातक आहेत. बाळ त्यांच्यासाठी नसलेल्या औषधांच्या संपर्कात आल्याने केसांची जास्त वाढ होत असल्याचे आढळून आले. या विकारांची तपासणी केल्यामुळे कुटुंबांना गंभीर तणावाचा अनुभव आला आहे. ‘न्यूजवीक’च्या मते, लहान मुले मिनोक्सिडिलच्या संपर्कात आल्याने मिनोक्सिडिलच्या पॅकेजवर नवजात मुलांमध्ये हायपरट्रिकोसिसच्या धोक्याबद्दल इशारा देण्याची गरज निर्माण झाली आहे. वापरकर्त्यांना लहान मुलांपासून त्यांचे हात दूर ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. मिनॉक्सिडिलच्या विक्रीला परवानगी देणारे इतर देशदेखील या चिंतेबद्दल जागरूक असावेत, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Story img Loader