Tongue Scraping Benefits: गेल्या काही वर्षांत शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करूनही, लोक त्यांच्या मौखिक आरोग्याची काळजी घेण्यास अनेकदा चुकतात. नाही, नाही दररोज दात घासणे म्हणजे तुम्ही तोंडाची नीट काळजी घेताय असे नाही. दातांसह आपल्याला जीभ व हिरड्यांचीही नीट काळजी घेणे आवश्यक आहे. आजवर अनेक आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सकाळी चांदीच्या किंवा तांब्याच्या यू-आकाराच्या स्क्रॅपरने तुमची जीभ स्वच्छ करण्याचे फायदे सांगितले आहेत. आता याच संदर्भात आयुर्वेद तज्ज्ञ डॉ नितिका कोहली यांची एक इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ, नितिका सांगतात की तुम्ही दिवसभर जे काही खाता त्याचा पहिला थर हा तुमच्या जिभेवर जमा होतो. जर आपण हा थर स्वच्छ केला नाही तर काही कालावधीने तोंडाचे आरोग्य बिघडू लागते. यामुळे जीभ खरडवून स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर कर्मा आयुर्वेदचे संस्थापक डॉ. पुनीत सांगतात की जीभ खरवडणे ही तोंडाचे, शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी एक आवश्यक प्रक्रिया आहे. जीभेवरील लेप काढून तुम्हाला त्वरित एक फ्रेशनेस अनुभवता येऊ शकतो.

जिभेच्या विविध भागांचा शरीराच्या वेगवेगळ्या भागांशी संबंध असतो. जिभेमध्ये फायदेशीर आणि हानिकारक अशा दोन्ही प्रकारचे जीवाणू असतात. बॅक्टेरिया आणि अन्नाचे कण जिभेच्या पृष्ठभागावर जमा होतात. जर हे कण वेळेत स्वच्छ केले नाहीत तर ते आवरणाने झाकले जातात ज्यामुळे सतत श्वासाची दुर्गंधी येते. स्वच्छ जीभ तुम्हाला चव चांगल्या प्रकारे ओळखण्यात मदत करेल आणि त्यामुळे मीठ, साखर आणि मसाल्यांचा वापर कमी होईल. याचा एकूण फायदा तुमच्या आरोग्याला होऊ शकतो.

जीभ कशी स्वच्छ करावी?

  • ब्रश केल्यानंतर जीभ खरडवून स्वच्छ करा.
  • स्क्रॅपर जिभेच्या मागच्या बाजूला घट्ट ठेवा आणि हलक्या दाबाने पुढे खेचा.
  • स्क्रॅपर एकदा वापरल्यावर स्वच्छ धुवा.
  • ३-४ वेळा जिभ खरडवल्यावर तोंड स्वच्छ धुवा.
  • प्रत्येक वापरानंतर स्क्रॅपर गरम पाण्यात ठेवून मग पुन्हा धुवून काढा
  • आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार शक्य असल्यास सोने, चांदी, तांबे, कथील किंवा पितळेचे स्क्रॅपर वापरावे.

जीभ स्वच्छ करताना हे नियम विसरु नका

  • दिवसातून दोन वेळा, सकाळी उठल्यानंतर एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा करणे फायदेशीर आहे.
  • मऊ कडा असलेले चांगल्या दर्जाचे स्क्रॅपर खरेदी करा.
  • जीभ खरवडताना जास्त दबाव आणू नये. असे केल्याने तुमच्या जिभेच्या संवेदनशील पृष्ठभागाला हानी पोहोचू शकते
  • तुम्हाला जिभेवर पांढरे ठिपके किंवा व्रण दिसल्यास खरडणे सुरू ठेवू नका.
  • जीभ खरवडण्यासाठी टूथब्रश वापरू नका.

हे ही वाचा<< विश्लेषण: मेंदू खाणाऱ्या अमीबाने वाढवली जगाची चिंता; कशी होते लागण? लक्षणं व उपचार काय?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ही एक प्राचीन भारतीय परंपरा आहे ज्याचे अनेक फायदे आहेत. “जीभ आणि तोंड हे तुमच्या शरीराचे प्रवेशद्वार आहे; जीभ स्वच्छ न केल्यास तोंडात जंतू तयार होऊन श्वासाची दुर्गंधी येऊ शकते. पुढे यामुळेच असुरळीत पचनप्रक्रिया आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल प्रणालीचे असंतुलन अशा समस्या सुद्धा वाढू लागतात. चरक संहिता नावाच्या आयुर्वेदिक वैद्यकीय ग्रंथातही जीभ स्वच्छ करण्याची शिफारस केली आहे

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bad breath reduced with rules of tongue cleaning ayurvedic experts says avoid these mistakes while brushing teeth svs