कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येत्या १० मे रोजी येथे मतदान होणार आहे. याच कारणामुळे काँग्रेस-भाजपाकडून टोकाचे आरोप-प्रत्यारोप केले जातात. काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात पीएफआय, बजरंग दल या संघटनांवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. हाच मुद्दा सध्या येथे केंद्रस्थानी आहे. बजरंग दल या संघटनेवर बंदी घालण्याची काँग्रेसमध्ये हिंमत नाही, असे भाजपाकडून म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील याच मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर बजरंग दल या संघटनेची स्थापना कधी झाली? या संघटनेचा उद्देश काय आहे? या संघटनेवर आतापर्यंत किती वेळा बंदी घालण्यात आली? हे जाणून घेऊ या.

नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेसवर टीका

काँग्रेसने आम्ही सत्तेत आल्यास ‘बजरंग दल’ या संघटनेवर बंदी घालू, असे कर्नाटकच्या जनतेला आश्वासन दिले आहे. काँग्रेसच्या या भूमिकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर कठोर शब्दांत टीका केली आहे. मोदी यांनी कर्नाटकमध्ये बुधवारी (४ मे) एकूण तीन सार्वजनिक सभांना संबोधित केले. या तिन्ही सभांमध्ये मोदी यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. तसेच ‘जय बजरंग बली’ म्हणत त्यांनी एक प्रकारे बजरंग दल या संघटनेच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. याआधी “जे भगवान हनुमानाची भक्ती करतात, त्यांना काँग्रेस तुरुंगात टाकू पाहात आहे. त्यांनी प्रभू रामाला बंद (बाबरी मशिदीचा संदर्भ) करून ठेवले होते,” असा आरोपही मोदी यांनी काँग्रेसवर केला.

accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू

हेही वाचा >>> विश्लेषण: बुद्ध पौर्णिमा २०२३- बुद्धमूर्तीमुळे प्रकाशात आले पहिल्या शतकातील प्राचीन जागतिकीकरण !

‘बेकायदेशीर धर्मपरिवर्तन’ आणि ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावरून बजरंग दलाचे आंदोलन

बजरंग दल ही आक्रमक संघटना आहे. अनेक वेळा आपल्या आंदोलनांमध्ये या संघटनेने हिंसेचा वापर केलेला आहे. या संघटनेने अनेक वेळा ‘बेकायदेशीर धर्मपरिवर्तन’ आणि ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावरून मुस्लीम आणि ख्रिश्नन लोकांना लक्ष्य केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. मागील ४० वर्षांच्या काळात या संघटनेवर असे अनेक आरोप झालेले आहेत. या संघटनेला भाजपाने नेहमीच पूर्ण पाठिंबा दिलेला आहे असे नाही. भाजपाच्या अनेक मोठ्या नेत्यांनी बजरंग दल संघटनेला त्यांच्या कारवाया कमी करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी विनंती संघ परिवाराला केलेली आहे.

बजरंग दल संघटना कशी अस्तित्वात आली?

बजरंग दल या संघटनेतील बहुतांश पदाधिकारी हे तरुण आहेत. ही संघटना उजव्या विचारसरणीच्या विश्व हिंदू परिषद या संघटनेची शाखा आहे. १९८४ साली या संघटनेची स्थापना झाली होती. राम जन्मभूमी आंदोलनाला चालना मिळावी म्हणून या १९८४ साली या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. या संघटनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार अयोध्येपासून काही संतांनी ‘राम जानकी रथ यात्रा’ काढली होती. या यात्रेला संरक्षण पुरवण्यास उत्तर प्रदेश सरकारने नकार दिला होता. त्यानंतर विश्व हिंदू परिषद संघटनेने तेथील युवकांना या यात्रेला संरक्षण पुरविण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे या आवाहनानंतर उत्तर प्रदेशमधील अनेक तरुणांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. उत्तर प्रदेशमधील युवकांना एकत्र करून राम जन्मभूमी आंदोलनाला चालना देण्याचा उद्देश समोर ठेवूनच ८ ऑक्टोबर १९८४ रोजी या संघटनेची स्थापना करण्यात आली होती.

हेही वाचा >>> विश्लेषण : बुद्ध पौर्णिमा २०२३ : गौतम बुद्धांच्या हस्तमुद्रा काय सूचित करतात ?

राम जन्मभूमी आंदोलनात बजरंग दल संघटनेचा सक्रिय सहभाग

ही संघटना प्रत्यक्षात येण्याआधी १९८४ च्या ऑक्टोबर महिन्यात लखनौ येथे एक बैठक पार पडली होती. या बैठकीत तत्कालीन वाराणसी महानगर प्रचारक विनय कटियार यांनी विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन प्रमुख अशोक सिंघल यांना एक संघटना स्थापन करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर बजरंग दल या संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या नावात राम जन्मभूमीचा संदर्भ असावा म्हणून तिचे नाव भगवान हनुमान यांच्यावरून ठेवण्यात आले. डिसेंबर १९९२ पर्यंत बजरंग दल या संघटनेने राम जन्मभूमी आंदोलनात सक्रियपणे सहभाग नोंदवला. बाबरी मशीद पाडणे तसेच राम मंदिर उभारण्याच्या आंदोलनात या संघटनेने अनेकांना सामील करून घेतले.

जन्मभूमी आंदोलनानंतर बजरंग दल संघटना पडद्याआड

राम जन्मभूमी आंदोलनानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले. तर दुसरीकडे भाजपा पक्ष आपला विस्तार राष्ट्रीय पातळीवर करू पाहात होता. त्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल अशा संघटनांचा प्रभाव कमी झाला. या संघटना पडद्यामागे गेल्या. याच कारणामुळे या दोन्ही संघटनांच्या नेत्यांनी भाजपाविषयी अनेक वेळा राग व्यक्त केलेला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘एआय’चा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होण्याची भीती? मायक्रोसॉफ्ट, गुगल उच्चाधिकाऱ्यांनी का व्यक्त केली चिंता?

बजरंग दल संघटनेवर याआधी बंदी घातलेली आहे का?

बजरंग दल या संघटनेवर याआधी एकदा बंदी घालण्यात आलेली आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर नरसिंह राव सरकारने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर साधारण वर्षभरानंतर ही बंदी उठवण्यात आली होती. बजरंग दल संघटनेबाबत लंडनमधील किंग्स इंडिया इन्स्टिट्यूट येथील राजकारण आणि समाजशास्त्राचे प्राध्यापक ख्रिस्तोफ जाफ्रेलोट यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या आघाडीच्या दैनिकात सविस्तर लिहिलेले आहे, “बजरंग दल या संघटनेत शिस्तीचा अभाव होता. १९९३ पर्यंत या संघटनेला स्वत:चा असा गणवेश नव्हता. बजरंग दलातील कार्यकर्ते कपाळावर भगव्या रंगाचा रुमाल बांधायचे. या रुमालावर ‘राम’ असे लिहिलेले असायचे. हीच त्यांची ओळख होती,” असे जाफ्रेलोट यांनी म्हटले आहे.

१९९३ मध्ये बजरंग दल संघटनेच्या कार्यकर्त्यांना गणवेश

१९९३ साली या संघटनेवरील बंदी हटवण्यात आली. त्यानंतर या संघटनेमध्ये शिस्त असणे गरजेचे आहे, असे संघ परिवाराला वाटले. याबाबतही जाफ्रेलोट यांनी लिहिलेले आहे, “११ जुलै १९९३ रोजी बजरंग दल संघटनेतील कार्यकर्त्यांना गणवेश लागू करण्यात आला. निळी पॅन्ट, पांढरा शर्ट आणि भगवा रुमाल असा हा गणवेश होता. सोबतच कार्यकर्त्यांना एक माहितीपुस्तिकादेखील देण्यात आली. या माहितीपुस्तिकेत कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाबद्दल सविस्तर सांगण्यात आले होते,” असे जाफ्रेलोट यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: बुद्ध पौर्णिमा २०२३- भारतात सर्वाधिक बौद्ध लेणी का आढळतात?

बजरंग दल संघटनेच्या कार्यकर्त्यांवर खुनाचे आरोप

मात्र या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. कारण पुढच्या काळात बजरंग दल ही संघटना अनेक कारणांनी चर्चेत राहिली. या संघटनेकडून ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी तरुणांना मारहाण केली जायची. पब्समध्ये गोंधळ निर्माण करणे, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा दावा करीत कलाकारांविरोधात आंदोलन करणे अशा प्रकरणांमुळे ही संघटना चर्चेत राहिली. या संघटनेतील काही कार्यकर्त्यांवर खुनाचा गुन्हादेखील दाखल आहे. १९९९ साली ओदिशा येथे ऑस्ट्रेलियन मिशनरीच्या ग्रॅहम स्टेईनेस यांची हत्या, मागील वर्षाच्या जुलैमध्ये कर्नाटकमधील सुल्लिया येथे १९ वर्षीय मसूद या तरुणाची हत्या अशा गुन्ह्यांमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते आरोपी आहेत.

अनेक राजकीय पक्षांकडून संघटनेवर बंदी घालण्याची मागणी

या कारवायांमुळे बजरंग दल या संघटनेवर एकदा बंदी घालण्यात आली होती. २०१३ साली बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी आणि २००८ साली लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांनी या संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. २००८ साली काँग्रेसनेदेखील बजरंग दल संघटनेवर बंदी घालावी, अशी थेट मागणी केली होती.

हेही वाचा >>> विश्लेषण: अमेरिकेतील आणखी एक बँक का बुडाली? ही संकटमालिका सुरूच राहणार?

बजरंग दल नेमके काय करते?

‘आमच्या संघटनेकडून रचनात्मक काम केले जाते. यामध्ये धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार, गोरक्षण, धार्मिक परिषदा, कार्यक्रमांत शिस्तीचे पालन होईल याची काळजी घेणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात बचावकार्य करणे अशी कामे केली जातात,’ असे या संघटनेच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आलेले आहे. तसेच हुंडाबंदी, अस्पृश्यता निवारणासाठी काम केले जाते. हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा, हिंदूंच्या श्रद्धा याचा अपमान केल्यास आंदोलन करणे, सौंदर्य स्पर्धा आणि जाहिरातींच्या माध्यमातून टीव्हीवर घाणेरडे आणि आक्षेपार्ह कार्यक्रम दाखवण्याला विरोध करणे, अशी कामे या संघटनेकडून केली जातात.

Story img Loader