जपानच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्याने महिलांना वयाच्या २५ वर्षांनंतर विवाह करण्यावर बंदी घालण्याची आणि वयाच्या ३० व्या वर्षी त्यांचे गर्भाशय काढून टाकण्याचा प्रस्ताव मांडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा प्रस्ताव देशातील वृद्ध लोकसंख्या आणि समस्यांवर सुरू असणाऱ्या एका चर्चेचा भाग म्हणून मांडण्यात आल्याचे नेत्याने सांगितले. घटत्या जन्मदराचा परिणाम म्हणून जपानला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्यासाठी सरकार विविध उपाय शोधत आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते नाओकी हयाकुटा यांना त्यांच्या वक्तव्यासाठी टीकांचा सामना करावा लागला, ज्यानंतर त्यांनी माफी मागितली. काय आहे हा वाद? मुलींना २५ वर्षे वयानंतर लग्न करण्यावर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? त्याविषयी जाणून घेऊ.

नेमका वाद काय?

८ नोव्हेंबरला एका यूट्यूब व्हिडीओमध्ये प्रख्यात लेखक आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते नाओकी हयाकुटा यांनी देशाचा जन्मदर वाढवण्याच्या मार्गांबद्दल बोलताना धक्कादायक टिप्पणी केली. महिलांना वयाच्या २५ वर्षांनंतर लग्न करण्यास प्रतिबंधित करण्यात यावे आणि ३० व्या वर्षी हिस्टरेक्टॉमी (गर्भाशय काढण्याची प्रक्रिया)करण्यात यावी असा प्रस्ताव मांडला. त्यांनी असा युक्तिवाद केला की, असे केल्याने घटणारा जन्मदर पूर्ववत होईल आणि त्यांना मुले होण्यास प्रोत्साहन मिळेल. अधिक मुले होण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी १८ वर्षांच्या वयानंतर महिलांना महाविद्यालयात जाण्यापासून प्रतिबंधित करण्यात यावे, असेदेखील त्यांनी उपाय म्हणून सुचवले. २०१२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी राष्ट्रीय प्रसारक एनएचकेच्या मंडळावर नाओकी हयाकुटा यांची नियुक्ती केली होती. या संस्थेच्या संपादकीय स्वातंत्र्य आणि धोरणांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्या वेळी त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती.

History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यांगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
donald trump latest marathi news
विश्लेषण: अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची अनपेक्षित मुसंडी कशी?
batenge toh katenge slogan by bjp in maharashtra assembly election
‘बटेंगे…’चा मुद्दा राज्यातील प्रचारात केंद्रस्थानी कसा आला? भाजप आक्रमक, विरोधक सावध?
८ नोव्हेंबरला एका यूट्यूब व्हिडीओमध्ये प्रख्यात लेखक आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते नाओकी हयाकुटा यांनी देशाचा जन्मदर वाढवण्याच्या मार्गांबद्दल बोलताना धक्कादायक टिप्पणी केली. (छायाचित्र-आरीन युमी /एक्स)

हेही वाचा : महाराष्ट्राची निर्मिती, काँग्रेसचे वर्चस्व, हिंदुत्वाचा उदय; महाराष्ट्र निवडणुकीचा इतिहास काय सांगतो?

प्रस्तावावर प्रतिक्रिया

अशा प्रस्तावांमुळे जपानमध्ये महिलांचे हक्क आणि पुनरुत्पादक स्वातंत्र्याबद्दल चिंता निर्माण झाली असल्याची टीका राजकारणी आणि इतरांकडून करण्यात आली. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार या प्रकरणावर संताप व्यक्त करताना अभिनेता चिझुरु हिगाशी म्हणाला, “तुम्हाला ३० वर्षांच्या वयापर्यंत मूल न झाल्यास प्रजनन क्षमता काढून टाकण्याची कल्पना भयंकर आहे. याशिवाय, घटता जन्मदर हा स्त्रियांचा दोष आहे असे तुम्हाला वाटते का? स्त्रिया स्वतःच गरोदर राहू शकत नाहीत आणि त्यांचा रोजगार आणि उत्पन्न स्थिर नसल्यामुळे त्यांना मुले जन्माला घालण्याबद्दल आणि वाढवण्याबद्दल आत्मविश्वास नसतो.” यामानाशी गाकुइन विद्यापीठातील प्राध्यापक आणि लिंग समस्यांवरील पुस्तकाच्या लेखिका सुमी कावाकामी ‘दिस वीक इन एशिया’ला म्हणाल्या, “मला विश्वास बसत नाही की, जपानी राजकारण्याने असे काही सांगितले आहे. मी या टिप्पण्यांना केवळ महिलांवरील हिंसाचार म्हणून पाहते.”

इतर तज्ज्ञ आणि राजकारण्यांप्रमाणे हयाकुटाच्या पक्षानेही त्यांच्या प्रस्तावाचा निषेध केला. ‘फुजी टेलिव्हिजन’ला दिलेल्या मुलाखतीत संयुक्त अध्यक्ष ताकाशी कावामुरा म्हणाले की, त्यांनी हयाकुटा यांना त्यांचे वक्तव्य मागे घेण्यास सांगितले आहे. “मी त्यांच्या वतीने कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या समर्थकांची आणि जपानी लोकांची माफी मागतो,” असेही ते पुढे म्हणाले. रविवारी नागोया येथे एका भाषणादरम्यान, हयाकुटा यांनी नंतर माफी मागितली आणि सांगितले की, त्यांची टिप्पणी पूर्णपणे काल्पनिक होती आणि हे त्यांचे स्वतःचे मत असल्याचेही त्यांनी नोंदवले. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या या संकल्पनांना अगदी शब्दशः घेण्यात आले. त्यांनी ‘एक्स’वर सांगितले की, ते महिलांवरील अशा टोकाच्या कृतींचे समर्थन करत नाहीत आणि त्यांची टिप्पणी अत्यंत चुकीची असल्याचेही त्यांनी मान्य केले.

त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ सदस्य काओरी अरिमोटो या कार्यक्रमात त्यांच्याबरोबर होते. त्यांनी टीका केली की, हे विधान काल्पनिक म्हणूनही अस्वीकार्य आहे. यावर उत्तर देताना हयाकुटा म्हणाले, “मी स्त्रियांना बाळंतपणातील वेळेच्या मर्यादांबद्दल सांगत होतो. अरिमोटो यांच्या मते देशात सामाजिक मूल्ये झपाट्याने विकसित होत आहेत आणि अनेक व्यक्ती असे आहेत, जे त्यांचा आनंद पालकत्वाशी जोडत नाहीत. हयाकुटा यांनी यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, या विचारसरणीला मागे टाकण्यासाठी सामाजिक संरचनेत बदल करणे आवश्यक आहे आणि सांगितले की, स्त्रियांना जर बाळंतपणासाठी वेळेची मर्यादा आहे हे लक्षात आले, तर ते आधी मुले जन्माला घालण्याचा निर्णय घेतील. हयाकुटा यांनी आपल्या व्यक्तव्याचे वर्णन विज्ञान कल्पित म्हणून केले होते, मात्र लेखक इसुई ओगावा यांनी ते फेटाळले. “मी एक विज्ञान कथा लेखक आहे आणि मुलीचे गर्भाशय काढून टाकण्याच्या विचित्र कल्पनेचे वर्णन विज्ञान कल्पित म्हणून केले गेले आहे, जे चुकीचे आहे. मी लग्न करण्यास आणि जन्म देण्यास भाग पाडण्याच्या त्यांच्या कल्पनेनेदेखील नाखूष आहे,” असे ते म्हणाले.

हेही वाचा : युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?

जपानमध्ये प्रजनन संकट

जपानमध्ये वृद्ध नागरिकांची संख्या वाढत आहे आणि कर्मचारी वर्गाची संख्या कमी होत आहे. या समस्यांशी संघर्ष करत असताना जपानला प्रजनन क्षमतेच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. सप्टेंबरमध्ये जाहीर झालेल्या प्राथमिक अधिकृत आकडेवारीनुसार, २०२४ च्या पहिल्या सहामाहीत देशाचा जन्मदर १९६९ नंतरच्या सर्वात कमी पातळीवर घसरला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, देशात जानेवारी ते जून दरम्यान ३,५०,०७४ जन्मांची नोंद झाली आहे, जी ५.७ टक्के आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही आकडेवारी कमी आहे.