बांगलादेशने अल कायदाशी संलग्न असलेल्या अन्सारुल्ला बांग्ला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख जशिमुद्दीन रहमानी याची तुरुंगातून सुटका केली आहे. रहमानी याला २०१३ मध्ये ब्लॉगर अहमद राजीव हैदरच्या हत्येला प्रोत्साहन दिल्याबद्दल दोषी ठरवले होते. एबीटी हा बांगलादेशमधील एक स्वदेशी अतिरेकी गट आहे, बांगलादेशातील अनेक ब्लॉगर, लेखक आणि समलिंगी अधिकार कार्यकर्त्यांच्या हत्येमागे या गटाचा हात असल्याचे मानले जाते. कोण आहे जशिमुद्दीन रहमानी? त्याच्या सुटकेने भारताला धोका का निर्माण झाला आहे? याविषयी जाणून घेऊ.

कोण आहे जशिमुद्दीन रहमानी?

जशिमुद्दीन रहमानी हा एबीटीचा तथाकथित आध्यात्मिक गुरू आहे. ‘द प्रिंट’नुसार, एबीटीच्या सुरुवातीच्या सदस्यांनी अल कायदाच्या अन्वर अल-अव्लाकीकडून प्रेरणा घेतली होती. २०१० साली येमेनमध्ये इस्लामी धर्मोपदेशक अल-अव्लाकी मारला गेला. २०१२ मध्ये या संघटनेने आपल्या गटात मुख्यतः तरुण-तरुणींना भरती करण्यास सुरुवात केली. एबीटी या संघटनेचे सदस्य तंत्रज्ञान जाणकार आहेत. या संघटनेची विचारधारा पुढे नेण्यासाठी आणि दहशतवादी हल्ले कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यासाठी ते तंत्रज्ञानाचा वापर करतात. रहमानी अल-कायदाचा उघड समर्थक आहे. रहमानीची या आठवड्यात बांगलादेशच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली.

Bollywood film stars in grip of mafia extortion
चित्रपटसृष्टीतील कलाकार हल्लेखोर, खंडणीखोरांच्या निशाण्यावर?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
Taimur and jeh were where while attacking saif ali khan
Saif Ali Khan : हल्ल्यादरम्यान तैमूर आणि जेह कुठे होते? मदतनीसाने पोलिसांना सांगितला घटनाक्रम!
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
police reaction on saif ali khan attack
“त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया

हेही वाचा : जगातून पुरुष कायमचे नष्ट होणार? Y गुणसूत्र नामशेष होण्याच्या मार्गावर; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा

२०१३ पासून तो गाजीपूरच्या काशिमपूर उच्च सुरक्षा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होता. हैदरच्या हत्येसाठी २०१५ साली रहमानीला दोषी ठरवण्यात आले होते. आपल्या प्रवचनातून दहशतवादाला चिथावणी दिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. देशाच्या १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात पाकिस्तानी सैन्याची बाजू घेऊन मानवतेविरुद्ध गुन्हे केल्याचा आरोप असलेल्या इस्लामी नेत्यांविरुद्ध अहमद राजीव हैदरने मोहीम सुरू करण्यात मदत केली होती. २०१३ साली ढाका येथे त्याच्या घराजवळ त्याची हत्या करण्यात आली होती. ‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार पोलिसांनी रहमानी आणि नॉर्थ साउथ युनिव्हर्सिटीच्या सात विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला होता. रहमानी याची पुस्तके वाचून आणि त्याचे प्रवचन ऐकून विद्यार्थ्यांनी नास्तिक असलेल्या हैदरला मारण्याची शपथ घेतली होती, असे तपास अधिकाऱ्याने आरोपपत्रात म्हटले आहे.

रहमानीवर कोणकोणते आरोप?

‘द प्रिंट’नुसार, रहमानी शुक्रवारी आपल्या प्रवचनामध्ये नास्तिक, इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात असलेल्यांना मारणे कायदेशीर असल्याचा दावा करू शकतो. रहमानी आणि विद्यार्थ्यांनी आपण दोषी नसल्याची कबुली दिली होती. मात्र, न्यायालयाने पुराव्याच्या आधारे रहमानी याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. ‘आउटलेट’नुसार, दहशतवादाशी संबंधित इतर पाच प्रकरणांमध्ये प्रलंबित खटल्यांमध्ये तो तुरुंगात होता. १ जुलै २०१६ रोजी ढाका कॅफेवर झालेल्या हल्ल्याचाही या खटल्यांमध्ये समावेश आहे; ज्यात एका भारतीय मुलीसह २२ लोकांचा मृत्यू झाला होता. परंतु, ‘ढाका ट्रिब्यून’नुसार रहमानीला एका प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे, तर त्याच्यावरील इतर सर्व खटले मागे घेण्यात आले आहेत. रहमानीची पुस्तके काही वर्षांपूर्वीपर्यंत इंटरनेटवर सहज उपलब्ध होती.

‘द प्रिंट’नुसार, रहमानी याच्या नेतृत्वाखालील एबीटीवर २०१३ ते २०१६ दरम्यान अविजित रॉय, ओयासिकुर रहमान बाबू, अनंता बिजॉय दास आणि राजशाही विद्यापीठाचे प्राध्यापक एकेएम शफीउल इस्लाम यांच्यासह अनेक ब्लॉगर आणि लेखकांच्या हत्येचा आरोप आहे. २०१६ मध्ये तत्कालीन शेख हसीना सरकारने दहशतवादी आणि राज्यविरोधी कारवायांमुळे एबीटीवर बंदी घातली होती. ‘इंडिया टुडे’नुसार, या गटाने अन्सार अल-इस्लाम या नवीन नावाने आपली संघटना पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला. परंतु, २०१७ मध्ये त्यावर पुन्हा बंदी घालण्यात आली.

बांगलादेशी वंशाचा अकायेद उल्लाह हा रहमानी याच्यापासून प्रेरित असल्याचे सांगण्यात आले. त्याने न्यूयॉर्क शहरात बॉम्ब हल्ला घडवून आणला होता. उल्लाहच्या पत्नीने तपासकर्त्यांना सांगितले की, उल्लाह तिला दोषी ठरलेल्या इस्लामी संघटनेच्या प्रमुखाची पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करत असे आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तो इंटरनेटवर कट्टरपंथी झाल्याचे दिसून आले. “ती म्हणाली की, तो तिला धर्म किंवा इस्लामबद्दल जाणून घेण्यासाठी रहमानीची पुस्तके वाचण्यास सांगत असे. आम्ही त्याची पत्नी आणि इतर नातेवाईकांनी दिलेल्या माहितीचे पुनरावलोकन करत आहोत,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

त्याच्या सुटकेचा भारताला धोका आहे का?

तज्ज्ञ सांगतात की, ही भारताने काळजी करावी अशी बाब आहे. ‘इंडिया टुडे’नुसार, एबीटी भारतात जिहादी नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने अनेक एबीटी दहशतवाद्यांनाही अटक केली आहे. मे मध्ये, आसाम पोलिसांनी गुवाहाटी रेल्वेस्थानकावर एबीटीशी संबंध असलेल्या बहर मिया आणि क्वचित मिया अशा दोन दहशतवाद्यांना अटक केली. सूत्रांनी ‘आउटलेट’ला सांगितले की, एबीटीने भारताच्या ईशान्य भागात दहशतवादी हल्ले करण्यासाठी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) शी संबंध जोडला होता.

हेही वाचा : पॅरासिटामॉलसह १५६ धोकादायक औषधांवर केंद्र सरकारची बंदी; ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ औषधे म्हणजे काय?

पाकिस्तान-आधारित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा २०२२ मध्ये एबीटीच्या संपर्कात आला, जेव्हा त्यांनी भारतात हल्ले सुरू करण्याच्या उद्देशाने बंगालमध्ये आपले केंद्र स्थापन करण्यास सुरुवात केली, असे सूत्रांनी सांगितले. ‘आउटलेट’ने २०२२ मधील इंटेलिजन्स इनपुट्सची माहिती देत म्हटले होते की, सुमारे ५० ते १०० एबीटी अतिरेकी त्रिपुरामध्ये घुसखोरीची योजना आखत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दावा केला आहे की, एबीटी सदस्य अधिका-यांची दिशाभूल करण्यासाठी हायटेक तंत्रज्ञानाची उपकरणे वापरत आहे.

Story img Loader