1971 Bangladesh Hindu Genocide शेख हसीना यांनी देश सोडला आणि त्यानंतर संपूर्ण बांगलादेशमध्ये निर्माण झालेले अराजक आपण पाहत आहोत. इतकेच नाही तर बांगलादेशात असणाऱ्या अल्पसंख्याकांवर म्हणजेच हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराची दृश्ये, व्हिडीओ समोर येत आहेत. अनेक मंदिरांवर हल्ले करण्यात आले आहेत. प्रसारमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि मीडिया रिपोर्ट्सने बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडली आहे. ८ ऑगस्ट रोजी जिवाच्या भीतीने बांगलादेशी नागरिकांच्या मोठ्या गटाने आंतरराष्ट्रीय सीमेवरून पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्याचा जो प्रयत्न केला, तो भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (BSF) यशस्वी होऊ दिला नाही. बीएसएफने सांगितले की, बांगलादेशातील आंदोलकांकडून हल्ले होण्याच्या भीतीने हे नागरिक भारतात प्रवेश करू पाहत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बांगलादेशमधील हिंदू रस्त्यावर
बांगलादेशमध्ये शनिवारी हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ लाखो लोक रस्त्यावर उतरले. बांगलादेशची राजधानी ढाका आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या चितगावमध्ये लाखो लोक मोठ्या मोर्चात सहभागी झाले होते. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना ५२ जिल्ह्यांमध्ये हल्ल्याच्या २०५ हून अधिक घटनांचा सामना करावा लागला आहे. शेकडो हिंदू त्यांच्या घरांवर आणि व्यवसायांवर झालेल्या हल्ल्यात जखमी झाल्याचे वृत्त आहे. अल्पसंख्याकांचा छळ करणाऱ्यांवर विशेष न्यायाधिकरणाने खटला लवकर चालवावा, अल्पसंख्याकांसाठी संसदेच्या १० टक्के जागा द्याव्यात, अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करावा, या मागण्यांसाठी हिंदू निदर्शकांच्या मोर्चाने मध्यवर्ती शाहबाग येथे तब्बल तीन तास वाहतूक रोखून धरली. विद्यार्थ्यांसह हजारो मुस्लिम आंदोलकही अल्पसंख्याकांच्या हितासाठी त्यात सामील झाले. बांगलादेशचे अंतरिम नेते मुहम्मद युनूस यांनी शनिवारी हिंसाचारग्रस्त देशातील अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांचा निषेध करताना त्याचा उल्लेख घृणास्पद असा केला. नोबेल पारितोषिक विजेते युनूस यांनी सर्व हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध कुटुंबांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी आंदोलनात आघाडीवर असलेल्या विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.
हिंदूंच्या नरसंहाराचा पुरावा…
यासर्व घटनाक्रमानंतर, १९७१ साली बांगलादेश मध्ये झालेल्या रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बांगलादेशमध्ये १९७१ साली हिंदू आणि बिगर पाकिस्तानी (बांगलादेशचे मूळ नागरिक- मुस्लिम असले तरी) नागरिकांचे ‘ऑपरेशन सर्च लाईट’च्या नावाखाली पाकिस्ताने हत्याकांड घडवून आणले होते. यात हिंदूंची ठरवून हत्या करण्यात आली होती याचा संदर्भ ढाक्यातील अमेरिकेचे तत्कालीन कॉन्स्युल जनरल आर्चर ब्लड यांनी व्हाईट हाऊसला पाठवलेल्या तारांमधून दिला होता. किंबहुना आर्चर ब्लड यांनी व्हाईट हाऊसला हिंदूंच्या ‘निवडक नरसंहारा’बद्दल वारंवार इशारा देऊनही अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले. आर्चर ब्लड यांनी अमेरिकन सरकारला वेळोवेळी टेलिग्राम्स पाठवून मदतीसाठी गयावया केली होती. त्यांच्या त्या टेलिग्राम्सची माहिती, ‘द ब्लड टेलिग्राम: निक्सन, किसिंजर अॅण्ड फरगॉटन जिनोसाईड’ या पुस्तकात गॅरी बास यांनी दिली आहे.
पाकिस्तानशी अमेरिकेची जवळीक
शीतयुद्धाच्या काळात पाकिस्तान हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा मित्र देश होता, यामागील मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानचे भारताशी असलेले ताणलेले संबंध आणि पाकिस्तानचे भौगोलिक स्थान. त्यावेळी भारताने सोव्हिएत युनियनशी मैत्री केली होती. त्याच पार्श्वभूमीवर सोव्हिएत प्रभावाचा सामना करण्यासाठी चीनशी संबंध प्रस्थापित करणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. म्हणूनच त्यांनी पाकिस्तानला जवळ केले, हा त्यांच्या भू-राजकीय खेळीचा भाग होता. असे असले तरी अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानला बांगलादेशमध्ये अत्याचार करण्याची अधिकृत परवानगीच मिळाल्यासारखी स्थिती होती.
(१९७१ नेमकं काय झालं होत?..इंदिरा गांधी यांनी बांगलादेश विरुद्ध पुकारलेल्या युद्धानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांनी इंदिराजींना कुत्री का म्हटलं? आणि त्याविषयीचे पुरावे काय सांगतात? अमेरिकेने पाकिस्तानला का मदत केली? याविषयी सविस्तर वाचा>>हेन्री किसिंजर जेव्हा तिरस्कार व्यक्त करताना इंदिरा गांधींना b**ch म्हणाले!)
चार लाख महिलांवर बलात्कार
त्यावेळी ढाक्यात हिंदूंना लक्ष्य करण्यात आले होते, हे सत्य उघडकीस येण्यास यूएस कॉन्स्युल जनरल आर्चर ब्लड यांच्या प्रयत्नांमुळे आणि विवेकामुळेच शक्य झाले. बांगलादेशमध्ये ज्यावेळेस नरसंहार वाढत जाऊ लागला, त्यावेळेस आर्चर ब्लड आणि इतर कॉन्स्युलच्या कर्मचाऱ्यांची मदत करण्यास कुठलीही कसर शिल्लक ठेवली नाही. पाकिस्तानचे सर्च लाईट ऑपरेशन हे टिक्का खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी सैन्याने केले होते. टिक्का खान हा आधी ‘बलुचिस्तानचा कसाई’ आणि नंतर ‘ढाक्याचा कसाई’ म्हणून ओळखला गेला. या सैन्याने अंदाजे ३० लाख लोकांचे बळी घेतले. १ कोटी बंगाली निर्वासित भारतात पळून गेले. सुमारे चार लाख महिला आणि मुलींवर बलात्कार झाले. पाकिस्तानी सैन्याच्या पद्धतशीर संहाराने हिंदू पुरुष, विचारवंत आणि व्यावसायिकांवर लक्ष केंद्रित केले होते. गॅरी जे बास यांनी पुस्तकात म्हटले आहे की, बांगलादेशमधील अत्याचार पाहून आर्चर ब्लड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जबर धक्का बसला. त्यांना अमेरिकन शस्त्र आणि दारुगोळा या नरसंहारासाठी वापरला जात आहे याची माहिती मिळाली होती. त्यांनी वॉशिंग्टनला केबल्सची (तारांची) मालिका पाठवली. त्यात नरसंहाराचा तपशील दिला आणि हस्तक्षेप करण्याची विनंती केली. आर्चर ब्लड यांनी स्वतःच्या स्त्रोतांकडून आणि वाणिज्य दूतावासाच्या कर्मचाऱ्यांकडून हत्या, जाळपोळ, बलात्कार आणि लूटमारीचे अहवाल गोळा केले होते.
२५ मार्च १९७१ रोजी नि:शस्त्र बंगाली लोकांच्या निर्घृण हत्येने स्तब्ध झालेल्या ढाक्यातील ब्लड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिकन सरकारला माहिती देण्याकरिता शक्य तितके अहवाल देण्याचा निर्णय घेतला. ढाका येथील या चमूने अमेरिकन प्रशासनाला पूर्व पाकिस्तानमधील घडामोडींची वास्तविक माहिती दिली, जी पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या वाहिन्यांकडून मिळणाऱ्या अहवालांपेक्षा वेगळी होती.
टेलिग्राम..
१ ….”पाकिस्तानी सैन्याच्या पाठिंब्याने बिगर बंगाली मुस्लिम गरीब लोकांच्या निवासस्थानावर पद्धतशीरपणे हल्ले केले जात आहेत. बंगाली आणि हिंदूंची हत्या करत आहेत.” २७ मार्च १९७१ रोजी ढाका येथील अमेरिकन वकील आर्चर ब्लड यांनी पाठवलेल्या अनेक तारांपैकी ही एक तार होती, ज्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्तक्षेपाची थेट मागणी करण्यात आली होती.
२ …”उध्वस्त झालेल्या [ढाका युनिव्हर्सिटी] कॅम्पसमध्ये, प्रोफेसर्सना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. हिंदू वसतिगृहाचे प्रोव्होस्ट, इंग्रजीचे एक आदरणीय विद्वान यांना त्यांच्या निवासस्थानातून ओढून नेण्यात आले आणि त्यांच्या मानेवर गोळी घालण्यात आली,”…(संदर्भ: द ब्लड टेलिग्राम)..
बंगाली लोकांवर होणाऱ्या अत्याचारात पाकिस्तानकडून अमेरिकन शस्त्रे आणि दारूगोळा वापरला जात आहे, असेही एका तारेत म्हटले होते. ब्लड आणि त्याच्या सहकाऱ्यांना रात्री बंदुकीच्या गोळ्या ऐकू येत होत्या आणि ते ढाक्यामध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हिंसाचाराचे साक्षीदार होते. “ढाक्यामध्ये लष्कराकडून हिंसक कृत्ये सुरूच आहेत.”..अशी तार ब्लड यांनी राहत्या घरातून केली होती. ते यात म्हणतात, ‘हिंदूंना यात निर्विवादपणे लक्ष केले जात आहे.’
हिंदू प्राध्यापकांची ठरवून हत्या
काही पळून जाणाऱ्या बंगाली हिंदूंना त्यांनी आपल्या घरात आश्रय दिला होता. ब्लड यांनी १९८९ साली हेन्री प्रीचला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आम्ही देखील आश्रय देत होतो, आम्ही सर्वजण आश्रय देत होतो, बंगाली, बहुतेक हिंदू बंगाली, जे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, बहुतेक आमच्याच नोकरांकडे आश्रय घेत होते. आमचे सेवक त्यांना आश्रय देत होते. ते फक्त गरीब होते, बहुतेक हिंदू होते, ज्यांना खूप भीती वाटत होती की फक्त ते हिंदू आहेत म्हणून मारले जातील.” ढाक्याच्या बाहेरही परिस्थिती तितकीच गंभीर होती, ज्याची आर्चर ब्लड यांनी यथायोग्य माहिती दिली होती.
याच मुलाखतीत आर्चर ब्लड यांनी एका रक्तरंजित रात्रीची आठवण सांगितली, ती कत्तलीची रात्र होती. त्या रात्री कदाचित ५,००० लोकांची कत्तल झाली, असे ते म्हणतात. अर्थात मी ते स्वतः पहिले असे मला म्हणायचे नाही. आमच्याकडे ग्रामीण भागात कॅथलिक धर्मगुरू होते. हिंदू गावांमध्ये पाकिस्तानी सैन्य मशीनगन घेऊन उतरले. गावातील लोक आश्रयासाठी कॅथोलिक मिशनमध्ये आले होते, असा उल्लेख त्यांनी केला आहे.
पाकिस्तानकडून अमेरिकन शस्त्रास्त्रांचा वापर
ढाका कौन्स्युलेटच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार…”हिंदू प्राध्यापकांना निवडून मारण्यात आले, ढाक्यातील हिंदू मंदिराभोवती असलेल्या गावांना जाळण्यात आलं, तसेच, २६ मार्चच्या रात्री हल्ला झाला. ढाका विद्यापीठातील एका हिंदू वसतिगृहात किमान २ मृत्यू झाले. पाकिस्तानी सैन्याने मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीगच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली असली तरी, “हिंदूंना दहशतवादाच्या सामान्य राजवटीचा फटका सहन करावा लागत आहे”, असे ढाका येथील तत्कालीन अमेरिकन कौन्सुलेटने लिहिले होत. (संदर्भ- द ब्लड टेलीग्राम). प्रसिद्ध लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ गोविंदा चंद्र देव याना केवळ हिंदू असल्यामुळे मारण्यात आले. देव यांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले, विद्यापीठातील हिंदू वसतिगृहासमोरील एका शेतात नेण्यात आले आणि त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. निक्सन आणि किसिंजर यांच्या अमेरिकन प्रशासनाला भीती वाटली नाही. अमेरिकेने काहीही केलं नाही. पाकिस्तानकडून अमेरिकेच्या शस्त्रसामग्रीचा वापर सुरूच होता. या निराशाजनक परिस्थितीत निक्सन प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र निषेध करणारा शेवटचा टेलिग्राम ब्लड यांच्याकडून पाठवण्यात आला.
अधिक वाचा: Victory Day 1971: …अखेर पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली, १९७१- विजय दिवसाचे महत्त्व काय?
शेवटचा टेलिग्राम
२६ मार्च रोजी पाकिस्तानी लष्कराच्या टिक्का खानने कुप्रसिद्ध ऑपरेशन सर्चलाइट सुरू केल्यानंतर सुमारे १० दिवसांनी ६ एप्रिल १९७१ रोजी ही प्रसिद्ध तार पाठवण्यात आली. आर्चर ब्लड यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन कॉन्स्युलेटमधील २० कर्मचाऱ्यांनी त्याखाली स्वाक्षरी केली होती. अमेरिकेच्या परराष्ट्र सेवेच्या इतिहासात अशाप्रकारे असंतोष व्यक्त करणारी ती महत्त्वाची तार ठरली.
“Our government has failed to denounce the suppression of democracy. Our government has failed to denounce atrocities. Our government has failed to take forceful measures to protect its citizens while at the same time bending over backwards to placate the West Pakistan-dominated government and to lessen any deservedly negative international public relations impact against them. Our government has evidenced what many will consider moral bankruptcy…”
“But we have chosen not to intervene, even morally, on the grounds that the Awami conflict, in which unfortunately the overworked term genocide is applicable, is purely an internal matter of a sovereign state. Private Americans have expressed disgust.
We, as professional civil servants, express our dissent against current policy and fervently hope that our true and lasting interests here can be defined, and our policies redirected in order to salvage our nation’s position as a moral leader of the free world,”
ढाका येथून ब्लड यांची शेवटची तार मुत्सद्दी म्हणून त्यांची कारकीर्द नष्ट करणारी होती. ते कधीच परत दूत होऊ शकले नाही. त्यांच्या या धाडसी निर्णयानंतरही अमेरिकेने पश्चिम पाकिस्तानकडे झुकणारे आपले माप आवरते घेतले नाही.
भारताची भूमिका
पूर्व पाकिस्तान (आता बांगलादेश) मध्ये बंगाली लोकांना लक्ष्य करण्यासाठी अमेरिकन शस्त्रे वापरली गेल्याचे अमेरिकेने कधीच स्वीकारले नाही. १९७१ च्या मे महिन्यापर्यंत पर्यंत २० लाख निर्वासित भारतात आले होते, त्यापैकी बहुतेक हिंदू होते. पाकिस्तानी लष्कराचा अत्याचार एवढा वाढला की, भारत संपूर्णतः हादरून गेला होता. त्यानंतर मात्र तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना कठोर लष्करी कारवाईचा निर्णय घ्यावा लागला. सध्याही अशाच प्रकारचे अत्याचार बांगलादेशात हिंदूंवर सुरू असून या घटनांमुळेच १९७१ च्या आठवणींवर धरलेली खपली पुन्हा निघाली आहे!