संजय जाधव

देशातील आघाडीच्या खासगी बँकांतून कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत तब्बल ३४ ते ४६ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक ठरलेल्या ‘एचडीएफसी’त गेल्या आर्थिक वर्षांत (२०२२-२३) कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण ३४.१५ टक्के होते. कोटक बँकेत हे प्रमाण तब्बल ४६ टक्के होते, तर त्याआधीच्या आर्थिक वर्षांत (२०२०-२१) हे प्रमाण २९ टक्के होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये हे प्रमाण ५ टक्क्यांहूनही कमी आहे. खासगी बँकांपुढेच हा प्रश्न का?

Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mohandas Pai
“सीईओंना ५० कोटी रुपये पगार देता पण…”, इन्फोसिसचे माजी अधिकारी म्हणाले, “आयटी इंडस्ट्रीमध्ये फ्रेशर्सचे शोषण”
Chandrapur District Bank Recruitment , AAP ,
चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरणाची ‘ईडी’कडे तक्रार
IT Company, IT , IT Company Jobs,
‘आयटी’तील बेरोजगारांचे लोंढे अन् त्यामागील अमानवीय चेहरा…
indian banks facing various challenges amid high interest rate
भारतीय बँकांना नफ्याला कोरड; जगातिक संस्थेचा इशारा नेमका काय?
Liquidity deficit in indian banking system hits lowest level in nearly 15 years
भारतीय बँकिंग व्यवस्थेची तरलता १५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर… खडखडाटामुळे कर्जे आणखी महागणार?
Life in an IIT | Accessible buildings, transformative experience: Here’s journey of Pune boy to IIT Bombay
‘हारा वही, जो लड़ा नही’ पुण्याच्या दिव्यांग तरुणाचा आयआयटी बॉम्बेपर्यंतचा प्रवास ऐकून थक्क व्हाल

कारणे कोणती आहेत?

बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, बँकांमध्ये कार्यरत तरुण वर्ग हा एकाच बँकेत राहून भवितव्य घडविण्याऐवजी वाढीव वेतनाला महत्त्व देतो. यामुळे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. आणखी एक कारण म्हणजे तरुण वर्ग हा नवनवीन कौशल्ये आत्मसात करून एकाच ठिकाणी थांबण्यापेक्षा नवनवीन संधी शोधण्यावर भर देत आहे. मागील १२ महिन्यांत बँकिंग क्षेत्रातून बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ३७ हजार आहे. बँकिंग क्षेत्रातील नोकरी सोडलेले ६५ हजार कर्मचारी पुन्हा याच क्षेत्रात सामावून घेतले गेले आहेत.

हेही वाचा >>> तुर्कस्तानातील नव्याने सापडलेले एपचे अवशेष मानवी उत्क्रांतीच्या कथेला कोणते आव्हान देतात?

पुन्हा सर्वच जण बँकांत काम करतात?

नाही. बँकिंग क्षेत्रात मागील काही काळात स्पर्धा मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्याच वेळी बँकिंग क्षेत्राची स्पर्धा ‘फिनटेक’सारख्या इतर निगडित क्षेत्रांशीही वाढली आहे. फिनटेक क्षेत्रातील कंपन्यांकडूनही भरती केली जात असून, त्यांच्याकडून मिळणारे वेतन बँकांपेक्षा अधिक आहे. उदाहरणार्थ अ‍ॅक्सिस बँकेतून नोकरी सोडलेल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ६० ते ७० टक्के बँकिंग यंत्रणेत दुसरीकडे रुजू झाले, २० टक्के जण इतर उद्योगांत तर ५ टक्के व्यक्तिगत कारणास्तव बाहेर पडले आहेत. अ‍ॅक्सिस बँकेतून कर्मचारी सोडून जाण्याचा दर आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ३१.६ टक्के होता. तो मागील आर्थिक वर्षांत ३४.८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

नवीन भरतीमुळे किती सुधारणा?

बँकिंग क्षेत्रातील रिक्त पदांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ४० ते ४५ टक्के वाढ झाली, तर नवीन भरतीत मागील वर्षीच्या तुलनेत १० ते १२ टक्के वाढ झाली आहे. भारतीय बँकांच्या एकूण मनुष्यबळात एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस, कोटक, आयसीआयसीआय या खासगी बँकांचा वाटा सुमारे ३० टक्के आहे. या बँकांतील कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचा दर सुमारे २६ टक्के आहे. यामुळे त्यांनी मनुष्यबळात १६ टक्के वाढ केली असली तरी, कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे प्रत्यक्षात मनुष्यबळातील वाढ केवळ २ टक्केच झाली आहे. एचडीएफसी बँकेचे मनुष्यबळ मागील आर्थिक वर्षांत २२.३५ टक्क्यांनी वाढले. त्याच वेळी ५३ हजार ६७० कर्मचारी बँकेतून बाहेर पडले.

हेही वाचा >>> मणिपूर भारतात कसे विलीन झाले?

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांत प्रमाण कमी?

स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक यांसारख्या सार्वजनिक बँकांमध्ये कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण ५ टक्क्यांहूनही कमी आहे. स्टेट बँकेत हे प्रमाण ३ टक्के, कॅनरा बँकेत ४.२६ टक्के आणि पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदामध्ये केवळ एक टक्का आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे, सार्वजनिक बँकांमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. अभ्यास करून ही कठीण परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बँकांमध्ये नोकरीस लागलेले कर्मचारी सोडण्याचा विचार करीत नाहीत. सार्वजनिक बँकांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यापासून चांगले वेतन असते. खासगी बँकांमध्ये मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात कमी वेतन आणि मधल्या फळीपासून जास्त वेतन असा फरक असतो. त्याचाही परिणाम कर्मचाऱ्यांवर होतो.

परिस्थिती कधी सुधारणार?

बँकांतील कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचा दर तातडीने कमी होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. ही परिस्थिती पुढील काही काळापर्यंत दिसून येईल. यावर मात करण्यासाठी बँकांकडून प्रयत्न सुरू आहेत. अनेक बँकांनी नवीन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलली आहेत. काही बँका कर्मचाऱ्यांशी संवाद वाढवून त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यावर भर देत आहेत. बँकांनी असे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवल्यास किमान दोन तिमाहीनंतर परिस्थितीत सुधारणा झालेली दिसेल, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.sanjay.jadhav@expressindia.com

Story img Loader