शनिवारी (६ जुलै) बार्सिलोनामधील शेकडो स्थानिकांनी आंदोलन करत अतिपर्यटनाच्या विरोधात मोर्चा काढला. ‘घरी जा’ असे लिहिलेले फलक घेऊन हे आंदोलक पर्यटकांना घरी जाण्यासाठी सांगत होते. तसेच त्यांच्या अंगावर पिचकारीच्या माध्यमातून पाण्याचे फवारेही उडवत होते. खरे तर पर्यटनामुळेच स्पेन देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे; मात्र याच गोष्टीची एक दुसरी बाजूही आहे. त्या ठिकाणी राहण्याच्या खर्चात इतकी वाढ झाली आहे, की स्थानिक लोकांसाठी जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.

हेही वाचा : विश्लेषण : फ्रान्समध्ये डाव्यांची मुसंडी, उजव्यांची घसरगुंडी… मतदारांचा अनपेक्षित कौल अस्थैर्य वाढवणारा?

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता
Revanth Reddy Express Adda
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह

वाढत्या महागाईविरोधात आंदोलन

जवळपास १५० हून अधिक संघटनांद्वारे करण्यात आलेल्या या वाढत्या महागाईविरोधातील आंदोलनामध्ये हजारो लोक सामील झाले होते. गेल्या शनिवारी बार्सिलोनामध्ये आंदोलन करून या लोकांनी देशातील अतिपर्यटनाच्या विरोधात निषेध नोंदवला. स्थानिक माध्यमांनी याबाबतचे वृत्तांकन केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास २,८०० लोकांनी बार्सिलोनामधून घोषणाबाजी करून आपला मुद्दा मांडला. “पुरे! आता पर्यटनावर मर्यादा आणा” अशा आशयाच्या घोषणा आंदोलकांनी दिल्या. डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, हे आंदोलक देशामध्ये असे एक आर्थिक प्रारूप लागू करण्याची मागणी करीत आहेत की, ज्यामुळे दरवर्षी देशात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होईल. “बार्सिलोना विकायला काढला नाही”, “पर्यटकांनो घरी जा” असे वाक्यांश लिहिलेले फलक पर्यटकांनी हातात धरले होते. ते सुप्रसिद्ध पर्यटनस्थळी फिरायला आलेल्या पर्यटकांच्या अंगावर पाण्याचे फवारे उडवीत होते. काही आंदोलकांनी हॉटेलबाहेर उभे राहून पर्यटकांनी आमचा परिसर रिकामा करावा, अशा आशयाच्या घोषणाही दिल्या. इसा मिरालेस (वय ३५) या संगीतकार बार्सिलोनेटा जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. त्या म्हणाल्या, “एकीकडे स्थानिक दुकाने बंद पडत आहेत; तर दुसरीकडे आमच्या परिसरातील लोकांच्या गरजा न भागविणारी दुकाने उभी राहत आहेत. खरे तर या दुकानांसाठी म्हणून या स्थानिक दुकानांच्या जागा रिकाम्या केल्या जात आहेत. त्यांचे भाडेदेखील आम्हा स्थानिकांना परवडत नाही.”

“बार्सिलोनामधील अतिपर्यटनाच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही जमलो आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये हे शहर पूर्णपणे पर्यटकांचे शहर झाले आहे. आम्हाला या देशाच्या रहिवाशांचे शहर हवे आहे; पर्यटकांची सेवा करणारे शहर नको”, अशा भावना एका आंदोलकाने रॉयटर्सशी बोलताना व्यक्त केल्या. “माझा पर्यटनाला विरोध नाही; मात्र अतिपर्यटनाचा आम्हाला आता त्रास होत आहे. या अतिपर्यटनामुळे आमचे शहर आमच्यासाठीच राहण्यायोग्य उरलेले नाही”, असे समाजशास्त्र अभ्यासक जॉर्डी गोइयो यांनी सांगितले. दुसऱ्या एका आंदोलकाने म्हटले, “एकीकडे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवाले पर्यटकांमुळे भरपूर कमाई करीत आहेत; तर दुसरीकडे इथल्या स्थानिकांना राहण्यासाठी पुरेसे पैसेही नाहीत. ही खरी समस्या आहे.”

राहण्याचा खर्च

अशा प्रकारचे आंदोलन करण्याची वेळ स्थानिकांवर येण्यामागे अनेक कारणे कारणीभूत आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचे कारण म्हणजे बार्सिलोनामध्ये घरांच्या किमती प्रचंड वाढत आहेत. गेल्या दशकभरात या किमती ६८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसेच पर्यटनामुळे स्थानिक व्यवसायांवरही प्रचंड परिणाम झाला आहे. आयडियलिस्टा या रिअल इस्टेट वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, बार्सिलोना व माद्रिद यांसारख्या शहरांमधील घरांचे भाडे मागील वर्षीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी वाढले आहे. अशा प्रकारचा निषेध पहिल्यांदाच व्यक्त केला जात आहे, असे नाही. याआधीही पर्यटकांविरोधात आवाज उठवला गेला आहे. संपूर्ण शहरभर ‘tourists go home’ अशा आशयाचे वाक्यांश ठिकठिकाणी चित्रित केले गेले आहेत. पर्यटकांमुळेच इथे जगणे प्रचंड महाग झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. बार्सिलोनाचे महापौर जौमे कोलबोनी यांनी जूनमध्ये एक योजना जाहीर केली होती. त्यानुसार त्यांनी २०२८ पर्यंत सर्व अल्प-मुदतीची भाडेपट्टी समाप्त करण्याची तरतूद केली. मात्र, घरांच्या वाढत्या किमती नियंत्रित करून, त्या कायमस्वरूपी राहाव्यात यासाठी हे शहर सुधारावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जात नाहीत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पर्यटक आणि स्थानिक दोहोंच्याही गरजांचा समतोल साधण्याची गरज आहे. दरवर्षी लाखो पर्यटक बार्सिलोनाला भेट देतात. त्याचा स्थानिकांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे, असे वृत्त डेली मेलने दिले आहे.

हेही वाचा : अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला अडचणीत आणणारी ‘हायड्रोजन पेरोक्साइड नेब्युलायझेशन’ उपचार पद्धती नेमकी आहे तरी काय?

बार्सिलोनामधील पर्यटन

स्थानिकांनी डेली मेलला दिलेल्या माहितीनुसार, समुद्रकिनारी वसलेल्या या शहराला गेल्या वर्षी १२ दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली होती. नॅशनल स्टॅटिस्टिक्स इन्स्टिट्यूटने दिलेल्या आकडेवारीनुसार, फ्रान्सनंतर स्पेन हा असा देश आहे की, जिथे सर्वाधिक पर्यटक भेट देतात. २०२३ मध्ये स्पेनला ८५ दशलक्ष परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. या आकडेवारीवरून दिसून येते की, २०२२ च्या तुलनेत तब्बल १८.७ टक्के अधिक पर्यटकांनी स्पेनला भेट दिली आहे. त्यातही बार्सिलोनामध्ये दरवर्षी १८ दशलक्ष पर्यटक भेट देतात. या अतिपर्यटनाला आळा घालण्यासाठी गेल्या काही महिन्यांमध्ये प्रशासनाकडूनही प्रयत्न केले जात आहेत. यूएसए टुडेनुसार, शहरामध्ये एप्रिल महिन्यापासून पर्यटन कर अधिक वाढवण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त बार्सिलोनाने २०२२ मध्ये काही नियमही लागू केले आहेत. या नियमांमुळे आता काही समुद्रकिनाऱ्यांवर धूम्रपान करणेही बेकायदा बनले आहे. मालागा, पाल्मा डी मॅलोर्का व कॅनरी बेट यांसारख्या लोकप्रिय पर्यटनस्थळांवरही अशीच निदर्शने झाली आहेत.