पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात ९२.९७ मीटर अंतरावर भाला फेकून ऑलिम्पिक विक्रम नोंदवला आणि दिमाखात सुवर्णपदक पटकावले. हे करताना त्याने भारताचा टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला मात दिली. नीरजने ८९.४५ मीटर अंतरावर भाला फेकला आणि तो दुसरा आला. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरजने सुवर्णपदक जिंकले होते, त्यावेळी अर्शद सातवा आला होता. पण प्रत्येक स्पर्धेमध्ये अर्शद नदीम हा नीरजसाठी नेहमीच आव्हान ठरत आला आहे. यावेळी त्याने बाजी मारली.

विक्रमी फेक

अर्शद नदीमची पॅरिसमधील कामगिरी थक्क करणारी होती. त्याने दोन वेळा ९० मीटरपलीकडे भाला फेकून दाखवला. अशी कामगिरी ऑलिम्पिक अंतिम फेरीत करणारा तो पहिलाच खेळाडू. सुरुवातीच्या प्रयत्नातच त्याने ९२.९७ मीटरवर भाला फेकून ऑलिम्पिक विक्रमाची नोंद केली. त्यानंतर शेवटच्या प्रयत्नातही ९१.७९ मीटरवर भाला फेकला. तो दिवस नीरज चोप्राचा नव्हताच. सहापैकी त्याचे पाच प्रयत्न ‘स्टेपिंग मार्क’ ओलांडल्यामुळे फाऊल ठरवण्यात आले. त्यामुळे नदीमसमोर जिंकण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणेच आवश्यक होते आणि ते नीरजला जमले नाही. संपूर्ण अंतिम फेरीत एकट्या नदीमलाच ९० मीटरपलीकडे भाला पोहोचवणे जमले. ऑलिम्पिकमध्ये याआधीचा विक्रम नॉर्वेच्या आंद्रेआस थॉरकिल्डसेनने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नोंदवला होता. त्याने ९०.५७ मीटर अंतर नोंदवले होते.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ICC test Rankings Harry Brook Becomes No 1 Ranked Test Batter Virat Rohit Suffer Massive Dip
ICC Test Rankings: विराट-रोहितला कसोटी क्रमवारीत धक्का, जो रूटला मागे टाकत ‘हा’ खेळाडू पहिल्या स्थानी, टॉप-१० मध्ये भारताचे किती खेळाडू?
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता

हे ही वाचा… Arshad Nadeem: पाकिस्तानच्या सुवर्णपदक विजेत्या अर्शद नदीमचा संघर्ष; बांधकाम मजूराचा मुलगा, एकेकाळी जेवणही मिळत नव्हतं

पहिले वैयक्तिक सुवर्णपदक

अर्शद नदीम हा पाकिस्तानच्या वतीने वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला अॅथलीट ठरला. पाकिस्तानला यापूर्वीची सर्व ऑलिम्पिक सुवर्णपदके हॉकीमध्ये मिळालेली आहेत. १९९२नंतर पाकिस्तानला ऑलिम्पिकमध्ये पदकप्राप्ती झालेली नव्हती. १९६० रोम ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानला हॉकीत सुवर्ण आणि कुस्तीमध्ये कांस्य अशी दोन पदके मिळाली. ते पाकिस्तानसाठीचे आजवरचे सर्वांत यशस्वी ऑलिम्पिक.

अर्शदची आजवरची कामगिरी

अर्शद लहानपणी अनेक खेळांमध्ये पारंगत होता. क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल आणि अॅथलेटिक्समध्ये सहभागी व्हायचा. पण सुरुवातीस त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. जिल्हा पातळीवर हौशी क्रिकेट स्पर्धांमध्ये तो खेळू लागला. मात्र सातवीत असताना त्याच्या शाळेतील क्रीडा प्रशिक्षकांचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला अॅथलेटिक्सकडे वळवले. ताकद भरपूर असल्यामुळे सुरुवातीस गोळाफेक आणि थाळीफेक या प्रकारांत तो सहभागी व्हायचा. पण भालाफेकमध्ये तो स्पर्धा जिंकू लागला आणि अखेरीस याच प्रकारावर त्याने लक्ष केंद्रित केले. २०१६मध्ये गुवाहाटीमध्ये झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याला कांस्यपदक मिळाले. २०१८मध्ये जकार्तामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये त्याने कांस्यपदक जिंकले. २०१९मध्ये नेपाळमध्ये झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याला अखेर सुवर्णपदक मिळाले. दोहामध्ये २०१९मध्ये झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत तो खेळला. २०२० टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अर्शद उतरला आणि भालाफेक प्रकारात अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. जागतिक स्पर्धेत उतरणारा आणि ऑलिम्पिक अंतिम फेरी गाठणारा तो पहिला पाकिस्तानी अॅथलीट ठरला. त्या स्पर्धेत तो सातवा आला. पण या काळात ७५ मीटर ते ८० मीटरपर्यंत आणि त्यापलीकडे भाला फेकण्याची त्याची क्षमता सिद्ध झाली होती. अमेरिकेत युजीन येथे २०२२मध्ये झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत तो पाचवा आला. २०२२मधील राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले. हे करताना त्याची मजल प्रथमच ९० मीटरपलीकडे पोहोचली. २०२३मधील जागतिक स्पर्धेत नदीमने रौप्यपदक पटकावले होते.

हे ही वाचा… Neeraj Chopra Mother: सुवर्णपदक हुकल्यानंतर नीरज चोप्राच्या आईचं पाकिस्तानच्या अर्शद नदीमबद्दल मोठं विधान; म्हणाल्या…

अर्शद आणि नीरज… स्पर्धा आणि मैत्री

पॅरिस ऑलिम्पिकच्या निमित्ताने अर्शद नदीमने नीरज चोप्राला पहिल्यांदाच हरवले. यापूर्वी दोघांमध्ये झालेल्या द्वंद्वामध्ये नीरजच सरस ठरला होता. दोघे पॅरिसपूर्वी नऊ वेळा आमने-सामने आले आणि प्रत्येक वेळी नीरज जिंकला. यांतील आठ स्पर्धा सीनियर स्तरावर तर एक ज्युनियर स्तरावरील होती. मात्र नीरजच्या तुलनेत अर्शदने अधिक सातत्याने ९० मीटरपलीकडे भाला फेकलेला आहे, हेही नोंदणीय ठरते. पॅरिसमध्ये तीच क्षमता निर्णायक ठरली. नीरज चोप्रा हा तंत्रावर अधिक विसंबून असतो. थोडासा खाली झुकून धाव घेत, विद्युत चपळाईने अखेरच्या टप्प्यात भाला फेकणे ही नीरजची खासियत आहे. त्या तुलनेत अर्शद नदीम ताकदीवर अधिक भर देतो. तो धीम्या पावलाने धाव घेत अखेरीस खांद्यामधील अफाट ताकदीच्या जोरावर भाला फेकतो. या तंत्रात सातत्य नसले, तरी ताकदीमुळे पल्ला अधिक गाठता येतो. अर्शद नदीमपेक्षा एक वर्ष मोठा आहे. हॉकी आणि क्रिकेटप्रमाणे याही खेळात आता येथून पुढे भारत-पाकिस्तान द्वंद्व सातत्याने रंगेल. अर्थात दोघांनाही परस्परांविषयी आदर आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरजचा भाला अर्शदने ‘चोरला’ अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगली, त्यावेळी नारजने हस्तक्षेप करून अर्शदविषयी आदर आणि स्नेह व्यक्त केला होता. या वर्षी अर्शदला नवीन भाला हवा होता. त्याने समाजमाध्यमांवर तशी विनंती केल्यानंतर नीरजने त्याला पाठिंबा व्यक्त केला होता. पॅरिसमध्येही दोघे स्पर्धक हातात हात घालून पदकग्रहण समारंभात वावरत होते.

हे ही वाचा… Neeraj Chopra : रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये…”

गावकरी जमवायचे अर्शदसाठी निधी

निधीची चणचण ही पाकिस्तानमध्ये क्रिकेटेतर खेळाडूंसमोर नेहमीची समस्या आहे. अर्शद नदीमचा जन्म लाहोरजवळ मियाँ चन्नू या छोट्या शहरात झाला. त्याचे वडील बांधकाम कामगार होते. त्यात अर्शदसह एकूण आठ मुले. त्यामुळे घरची परिस्थिती बेतास बात. अशा परिस्थितीत अर्शदने अंगभूत गुणवत्तेवर क्रीडानैपुण्य मिळवत प्रवास केला. त्याला शिष्यवृत्तीच्या जोरावर मॉरिशसमध्ये आणि पुढे पाकिस्तान अॅथलेटिक्स संघटनेच्या मदतीमुळे दक्षिण आफ्रिकेत प्रशक्षण घेता आले. पण प्रत्येक वेळी शिष्यवृत्ती आणि मदत मिळत नसे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये इतर शहरांत किंवा विदेशात जाता यावे यासाठी अर्शदसाठी त्याच्या गावातील मंडळी, तसेच नातेवाईक निधी जमा करून त्याला मदत करायचे. अर्शद ऑलिम्पिक जिंकल्यानंतर त्याचे वडील मुहम्मद अर्शद यांनीच ही आठवण सांगितली.

Story img Loader