बेंगळुरूच्या व्हाईटफिल्ड भागातील गजबजलेल्या रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी (१ मार्च) ला झालेल्या बॉम्बस्फोटात नऊ जण जखमी झाले आहे. हा स्फोट गॅस गळतीने झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती कॅफेमध्ये बॅग ठेवताना दिसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा इंप्रोव्हाईझ्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाईस म्हणजेच आयईडी स्फोट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयईडी म्हणजे नक्की काय? यात कोणती उपकरणे असतात? आणि यामुळे काय नुकसान होऊ शकते? याबद्दल जाणून घेऊया
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आयईडी म्हणजे काय?
आयईडी हा मुळात घरगुती बॉम्ब असतो. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीच्या फॅक्टशीटनुसार, “इंप्रोव्हाईझ्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) याला इंप्रोव्हाईझ्ड म्हणजेच सुधारित किंवा अपग्रेड करता येऊ शकते. त्यामुळेच हे स्फोटके अनेक प्रकारात येऊ शकतात. यामध्ये लहान पाईप बॉम्बपासून ते मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचविणारे बॉम्ब तयार केले जाऊ शकतात.
आयईडी बॉम्ब, वाहनाचा वापरून तैनात केले जाऊ शकतात. एखाद्या व्यक्ती स्वतः हा बॉम्ब तैनात करू शकते, तसेच एखाद्या पॅकेजमध्ये हा बॉम्ब असू शकतो किंवा रस्त्याच्या कडेला सहज लपवता येऊ शकतो. आयईडी बॉम्बचा वापर एका शतकाहून अधिक काळापासून केला जात आहे. ‘आयईडी’ हा शब्द पहिल्यांदा युनायटेड स्टेट्सच्या इराक आक्रमणादरम्यान (२००३ पासून) वापरला गेला. या ठिकाणी आयईडी बॉम्बचा वापर अगदी सामान्य होता. अमेरिकेच्या सैन्याविरूद्ध याचा वापर केला जायचा.
आयईडीतील उपकरणे
प्रत्येक आयईडीमध्ये काही मूलभूत गोष्टींचा समावेश असतो. या गोष्टी बॉम्ब तयार करणार्या व्यक्तीजवळ संसाधनांच्या स्वरुपात उपलब्ध असतात. यामध्ये इनिशिएटर किंवा ट्रिगरिंग मेकॅनिझम, एक बटन (जी स्फोटकाला अॅक्टीव्ह करते), एक मुख्य चार्ज (ज्यामुळे स्फोट होतो), पॉवर सोर्स (बहुतेक आयईडीमध्ये इलेक्ट्रिक इनिशिएटर असल्यामुळे त्यांना इलेक्ट्रॉनिक उर्जा स्त्रोत आवश्यक असतो), आणि कंटेनरचा समावेश असतो.
याव्यतिरिक्त, आयईडीमध्ये नखे, काच, खिळे किंवा अन्य धातूच्या तुकड्यांचा वापर केला जाऊ शकतो; ज्यामुळे स्फोटाचा प्रभाव तीव्र होता. याचा वापर केल्यास स्फोटामुळे अधिक नुकसान होऊ शकते. यासह यात विषारी रसायनेदेखील आढळतता. युरेनियम (या खनिजात असणार्या अणू स्फोटातून मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते) असलेल्या आयईडीला ‘डर्टी बॉम्ब’देखील म्हटले जाते.
आयईडी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही सामान्य उपकरणांमध्ये अमोनियम नायट्रेट, युरिया नायट्रेट, गनपावडर आणि हायड्रोजन पेरोक्साइड यांचा समावेश असतो. विमानात अनेकदा प्रवाशांना द्रवपदार्थ नेण्याची परवानगी नसते. याचे कारण म्हणजे, घातक रसायन द्रव पदार्थात मिसळून एखाद्या ठिकाणी नेले जाऊ शकते आणि याचा वापर करून आयईडी तयार करण्याची शक्यता असते.
आयईडीमुळे होणारे नुकसान
आयईडी केवळ मारण्यासाठी किंवा जखमी करण्यासाठी वापरले जात नाहीत. बर्याचदा याचा वापर सक्रिय युद्ध क्षेत्रांमध्ये लक्ष विचलित करण्यासाठी केला जातो. यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीच्या मते, “आयईडीमुळे होणारे नुकसान त्याच्या आकारावर, जागेवर आणि आयईडी मध्ये उच्च स्फोटक आहे की नाही यावर अवलंबून असतो.” आयईडीला हाताळणे सोपे असते. याला लपवणे, बॅगमध्ये घेऊन कुठेही नेता येणे किंवा एखाद्या ठिकाणी तैनात करणे अगदी सोपे असते. सामान्यतः मोठ्या बॉम्बपेक्षा आयईडी कमी हानीकारक असतात.
हेही वाचा : पाकिस्तानमुळे भारतातील बासमती तांदळाच्या निर्यातीत घट? ‘हा’ नवा वाद काय?
भारतात अनेकदा आयईडी बॉम्बचा वापर करून स्फोट करण्यात आले आहे. १९९३ मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोट, २००८ चा जयपूर बॉम्बस्फोट, २००६ मध्ये झालेला जामा मशीद बॉम्बस्फोट आणि २०१३ मधील बोधगया बॉम्बस्फोट मध्ये याचा वापर करण्यात आला होता. माओवादी आणि काश्मिरी अतिरेकीदेखील सामान्यतः आयईडीचा वापर करतात.