भारताची टेक सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बंगळुरूमध्ये दक्षिण आशियातील सर्वात उंच इमारत तयार करण्यात येणार आहे. गुरुवारी कर्नाटक मंत्रिमंडळाने ५०० कोटी रुपये खर्चाच्या बंगळुरू स्कायडेकच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे शहरातील पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. हा प्रकल्प काय आहे? या प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

बंगळुरूतील स्कायडेक प्रकल्प

ऑस्ट्रियन आर्किटेक्चर कंपनी ‘Coop Himmelb(l)au’ने स्कायडेक प्रस्तावावर बंगळुरूमधील वर्ल्ड डिझाईन ऑर्गनायझेशन (WDO) बरोबर काम केले, असे ‘स्वराज्य मासिका’त सांगण्यात आले आहे. ऑस्ट्रियन आर्किटेक्चर कंपनी फ्रान्समधील म्युसी डेस कॉन्फ्लुएन्सेस आणि फ्रँकफर्ट, जर्मनीमधील युरोपियन सेंट्रल बँक यासारख्या प्रकल्पांवर काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सुरुवातीला या प्रकल्पाचा बंगळुरूमधील दुसऱ्या विमानतळाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो अशी चिंता होती. मात्र, प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने ही समस्या सोडवण्यात आल्याचे दिसून येत आहे. “कर्नाटक सरकारने दक्षिण आशियातील सर्वात उंच स्कायडेकला मान्यता दिली आहे. ५०० कोटी रुपये खर्चून शहरात स्कायडेक बांधण्यात येणार आहे,” असे कर्नाटकचे कायदा, संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले.

Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Ramsar sites india
भारतात तीन नवीन ‘रामसर’ स्थळांची घोषणा; ‘रामसर’ स्थळ म्हणजे काय? पर्यावरणासाठी ही स्थळे महत्त्वाची का आहेत?
Amol mitkari jaydeep apte 1
Amol Mitkari : “जयदीप आपटे याचा त्या पुतळ्याद्वारे छुपा अजेंडा…”, मिटकरींचे गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीसांना म्हणाले…
eknath shinde Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse at Rajkot Fort Malvan Sindhudurg
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कशामुळे पडला? एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…
PM Narendra Modi Italy Visit
Unified Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!
Atal Setu Viral Video
Atal Setu Viral Video : अटल सेतूवर थरार; रेलिंगच्या पलिकडे उतरलेल्या महिलेला पोलिसांनी वाचवलं, जबानीत म्हणाली, “मी तर…”
भारताची टेक सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बंगळुरूमध्ये दक्षिण आशियातील सर्वात उंच संरचना तयार करण्यात येणार आहे. (छायाचित्र-इण्डेक्स कर्नाटका/एक्स)

हेही वाचा : भारतात तीन नवीन ‘रामसर’ स्थळांची घोषणा; ‘रामसर’ स्थळ म्हणजे काय? पर्यावरणासाठी ही स्थळे महत्त्वाची का आहेत?

प्रकल्पाचे वैशिष्ट्य

एकूण २५ एकर क्षेत्रात ही इमारत तयार होणार आहे. याची उंची २५९ मीटर इतकी असेल, जी कुतुबमिनारपेक्षा तीनपट जास्त असेल. कुतुबमिनार ७३ मीटर उंच आहे. ‘एनडीटीव्ही’नुसार, बंगळुरूमध्ये सीएनसीटीसी प्रेसिडेंशियल टॉवर सर्वात उंच असल्याचे मानले जाते; ज्याची उंची १६० मीटरहून अधिक आहे. ही इमारत तयार झाल्यावर इमारतीवरून संपूर्ण टेक हबचे दृश्य दिसेल. ही इमारत बंगळुरूच्या उपनगरातील एनआयसीई रोडवर बांधण्यात येणार आहे, ज्यात सर्व उच्च दर्जाच्या सुविधा असतील. पर्यटकांची गैरसोय कमी करण्यासाठी ही इमारत मेट्रो ट्रेनशी जोडली जाईल. ‘स्वराज्य मासिका’नुसार, या इमारतीत पर्यटकांना ते पूर्णपणे निसर्गाने वेढलेले असल्याचा आभास देण्याचा मानस आहे. यात विविध मनोरंजन आणि इतर अनेक मनोरंजक गोष्टी असतील.

इमारतीच्या बेस एरियामध्ये एक थिएटर, रेस्टॉरंट्स, स्काय गार्डन आणि शॉपिंग एरिया या सुविधा असतील. त्यासह रोलरकोस्टर स्टेशन, एक प्रदर्शन हॉल, रेस्टॉरंट आणि बार, एक व्हीआयपी रूम, स्काय लॉबी आणि सर्वात वरच्या बाजूस विहंगम दृश्यांसह स्कायडेक असेल. कंपनीने नियतकालिकानुसार सांगितले की, स्कायवॉक आणि रोलरकोस्टर हे अभियांत्रिकी चमत्कार आहेत.”

प्रकल्पाचे ठिकाण

स्कायडेकच्या बांधकामासाठी ब्रुहत बेंगळुरू महानगरपालिकेने (बीबीएमपी)ने हेम्मीगेपुरा (नाइस रोडजवळ), बेंगळुरू विद्यापीठ, ज्ञानभारती आणि कोम्मघट्टा (नाइस रोडजवळ) या जागांपैकी एका ठिकाणी ही इमारत तयार करण्याचे ठरवले होते. त्यानंतर १७ जुलै रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नाइस रोडच्या जवळ असलेल्या हेम्मीगेपुरा येथील जागेचा तुमकूर, कनकापूर, म्हैसूर आणि होसूर महामार्गापासून नाइस रोडमार्गे पुरेसा संपर्क असल्याचा निर्णय घेण्यात आला, असे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ने दिले.

हे स्थान उपनगरीय भागात असल्यामुळे प्रस्तावित बांधकामादरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता कमी असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. बंगळुरू येथील हिरव्यागार तुराहल्ली जंगलास पाहता येणे शक्य होईल. त्यानुसार, अखेर हेम्मीगेपुरा (नाईस रोड क्लोव्हर लीफ) जमीन २५० मीटर उंच स्कायडेकच्या बांधकामासाठी योग्य असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

इतर प्रकल्प

कर्नाटक मंत्रिमंडळाने हेब्बल ते रेशीम बोर्ड जंक्शनपर्यंत अंदाजे १२,६९० कोटी रुपयांचा भूमिगत बोगदा बांधण्याचीही घोषणा केली आहे. याशिवाय अंदाजे ५० कोटी रुपये खर्चून, बंगळुरू राज्य सरकार ५९२ अंगणवाडी उघडण्याची आणि ५२ नवीन इंदिरा कॅन्टीन बांधण्याची योजना आखत आहे.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौऱ्यात कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? भारतासाठी हे मुद्दे किती महत्त्वाचे?

आशियातील सर्वात उंच संरचना

८२८ मीटर उंचीच्या बुर्ज खलिफाला आशियातील सर्वात उंच इमारतीव्यतिरिक्त जगातील सर्वात उंच संरचनेचा मान आहे. स्कीडमोर, ओविंग्स आणि मेरील (एसओएम) वास्तुविशारद एड्रियन स्मिथ यांनी तयार केलेली ही प्रसिद्ध रचना इस्लामिक वास्तुकलेतून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आली आहे. ही संरचना १२ हजार लोकांनी सहा वर्षांमध्ये तयार केली. याला तब्बल १.५ अब्ज डॉलर्स इतका खर्च आला. ६७९ मीटर उंचीसह मलेशियाची ‘मर्डेका ११८’ ही आशियातील दुसरी सर्वात उंच इमारत आहे. ११८ मजली उंच असलेली ही इमारत क्वालालंपूरमध्ये आहे. ६३२ मीटर उंच असलेल्या चीनमधील शांघाय टॉवर ही जगातील तिसरी सर्वात उंच इमारत आहे.