विविध खेळांच्या सामन्यांवर विशेषतः क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी होते हे सर्वश्रुत आहे. पण सट्टेबाजी खेळांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. अगदी पाऊस कधी पडणार याच्या भाकितापासून निवडणुकीच्या निकालापर्यंत अनेक क्षेत्रांवर सट्टेबाजी करण्यात येते. फेअरप्ले ॲपद्वारे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही सट्टेबाजी करण्यात आली होती. त्याप्रमाणे विधानसभा निडणुकांवरही सट्टा खेळण्यात येत आहे का, त्यास प्रतिबंध कसा केला जातो याविषयी…

निवडणूक निकालावरही सट्टेबाजी… 

क्रिकेटच नाही, तर निवडणुकीच्या निकालांवरही सट्टेबाजी करण्यात येते. सट्टेबाजी अनेक देशांप्रमाणेच भारतातही अवैध आहे. त्यामध्ये गुंडांच्या संघटित टोळ्या कार्यरत आहेत. अनेक वर्षांपूर्वीपासून भारतात दाऊद टोळी सट्टेबाजीत सक्रिय आहे. निवडणुकीच्या निकालासह कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील यावरही सट्टेबाजी केली जाते. त्याला ‘फॅन्सी सट्टा’ म्हणतात. कोणता उमेदवार निवडून येणार, किती मतांनी निवडून येणार आदींवर सट्टा खेळला जातो. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही मोठ्या प्रमाणात ऑनलाइन सट्टा खेळला गेला होता. त्या प्रकरणी सक्तवसुली सचालनालय अर्थात ईडीने मुंबई व पुण्यातील १९ ठिकाणी छापे टाकले होते. ‘फेअर प्ले’ने विविध बनावट कागदपत्राद्वारे उघडलेल्या बँक खात्यांद्वारे निधी गोळा केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. तसेच बनावट बँक खात्यातील रकमेचा वापर करून ऑनलाइन माध्यमाध्यमातून व्यवहार करण्यात आले होते. त्यासाठी औषध कंपन्यांच्या पावत्यांचा वापर करण्यात आला. हा निधी हाँगकाँग, चीन आणि दुबई येथील परदेशी बनावट कंपन्यांना पाठवण्यात आला आहे. त्यासाठी ४०० हून अधिक बँक खात्यांचा वापर करण्यात आला. त्याद्वारे पैशांची देवाण-घेवाण झाली. 

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
senior citizen who wants to remarry was defrauded by cyber thieves
पुनर्विवाहाच्या आमिषाने कर्वेनगर भागातील ज्येष्ठाची फसवणूक, ज्येष्ठाला जाळ्यात ओढून पोलीस कारवाईची धमकी
governor scam marathi news
नाशिकच्या ठकबाजाकडून नागपुरात गोशाळा उभारण्यासाठी तीन कोटी
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Cyber ​​scam under the pretext of wedding invitation Nagpur news
विवाह निमंत्रणपत्रिकेच्या बहाण्याने सायबर घोटाळा; ‘एपीके फाइल’ने राज्यात अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड

हेही वाचा >>>पाकिस्तान-बांगलादेशदरम्यान सागरी मार्ग सुरू? भारताची चिंता का वाढली?

पूर्वी सट्टेबाजी कशी चालायची?

नव्वदच्या दशकात सट्टेबाजी पूर्णपणे विश्वासावर व धाकावर चालायची. त्याच काळात क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात सट्टेबाजीत होत होती. केवळ दूरध्वनीवरून कशावर सट्टा खेळायचा ते सट्टेबाजाला सांगितले जायचे. त्याची नोंद एका वहीत केली जायची. त्यानंतर सामना संपल्यावर नोंद वहीतील व्यवहारानुसार सट्ट्यात हरणाऱ्या व्यक्तीकडून पैसे घेतले जायचे आणि जिंकणाऱ्याला पैसे दिले जायचे. या संपूर्ण व्यवहारातील रक्कम मिळवण्यासाठी अधोविश्वातील गुंड हमी घ्यायचे. एखादा व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिल्यावर गुंड पैसे वसूल करायचे. सट्टेबाजीत दाऊद टोळीचा दबदबा होता. त्यांची टक्केवारी ठरलेली असायची. हा व्यवसाय हवालामार्फत चालायचा.

काळानुसार कोणते बदल?  

कोणत्याही सामन्यावर अथवा घटनेवर सट्टा खुला करण्यापूर्वी सट्टेबाज व पैजलाव्या (पंटर) टोपणनावांनी खाते सुरू करतात. या खात्याची डायरीत अथवा लॅपटॉपमध्ये याच टोपणनावाने नोंद करण्यात येते. उदाहरणार्थ सट्टेबाजीप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेला एका अभिनेता ‘जॅक’ या टोपणनावाने सट्टा खेळायचा असा आरोप आहे. तर दिल्लीतील बुकी टिंकू याचे अर्जुन नावाने खाते चालायचे. पण नवीन प्रणालीमध्ये मोबाइल अथवा वेब ॲप्लिकेशनचा वापर केला जात आहे. ई-मेलप्रमाणे सट्टेबाज, पंटर यांना लॉगइन आयडी व पासवर्ड दिला जातो. त्याद्वारे सर्व व्यवहार चालतात. पूर्वी छोट्या वहीमध्ये जिंकलेल्या व हरलेल्या पैशांचा संपूर्ण हिशेब नमूद करण्यात येत होता. त्यानंतर हवालामार्फत या पैशाची देवाण-घेवाण व्हायची. सट्टेबाज नोंदवहीऐवजी लॅपटॉपचा वापर करीत आहेत. गेल्या काही वर्षांत अटक झालेल्या सट्टेबाजांकडून मिळालेल्या माहितीवरून ते उघड झाले. त्याशिवाय देवाण-घेवाण करण्यासाठी हवालाचा वापर केला जायचा, मात्र सट्टा ऑनलाइन खेळला जात असल्यामुळे त्याच्या नोंदीही राहतात. पण आता सट्टेबाज मोठ्या प्रमाणात ॲप्लिकेशनचा वापर करीत आहेत. तसेच व्यवहारासाठी बिटकॉईनचाही वापर करण्यात येत आहे. तंत्रज्ञानामुळे परदेशात बसूनही मुंबईतील व्यक्तीकडून सट्टा घेणे शक्य झाल्यामुळे सट्टेबाजांना पकडणे कठीण झाले आहे. 

हेही वाचा >>>Vir Das post: भारतीय शास्त्रज्ञ अमेरिकेत चालवतोय टॅक्सी? काय नेमकं घडलं?

अटक टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर…

एखाद्या बँकेत अथवा संस्थेचे सदस्यत्व मिळवण्यासाठी जुन्या सभासदांच्या स्वाक्षरीची गरज भासते. त्याचप्रमाणे सट्टेबाजारात प्रथम डाव खेळताना जुन्या पंटरद्वारे सट्टेबाजाशी ओळख केली जाते. हा जुना पंटर नव्या पंटरचा हमीधारक म्हणूनही काम करीत असतो. नव्या पंटरने पैसे दिले नाहीत तर ते जुन्या पंटरकडून वसूल केले जातात. अनेकदा या बेकायदा धंद्यातही पैशांची देवाण-घेवाण अगदी इमानदारीने केली जाते. काही सट्टेबाज त्यासाठी गुंड टोळ्यांची मदत घेतात. सट्टेबाज मोठा तोटा झाल्यास गुंड टोळ्यांच्या दहशतीने सट्टा रद्दही करतात. नुकतीच अटक झालेल्या आरोपींच्या अटकेनंतर सट्ट्यांचा ऑनलाइन तपशील घेतला जात असल्याचे पुढे आले आहे. आता हमीची जागा ऑनलाइन तपशिलाने घेतली आहे. बिटकॉईनच्या माध्यमातूनही सट्टेबाजी केली जात आहे. सट्टेबाज चालत्या गाडीत अथवा बोटीमध्ये बसूनही सट्टा स्वीकारत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवणे फार कठीण झाले आहे. सध्या ऑनलाइन ॲप्लिकेशनद्वारे सट्टा घेतला जात असून मुख्य आरोपींपर्यंत पोहोचणे कठीण बनले आहे.

विधानसभा निवडणुकीवरही सट्टेबाजी? 

लोकसभा निडवणुकीपाठोपाठ विधानसभेच्या निकालावरही सट्टेबाजी सुरू असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. प्रत्येक पक्षाकडून हमखास निवडणूक येणाऱ्या उमेदवारांची यादी सट्टेबाजांकडे तयार आहे. संबंधित मतदारसंघात निवडून येणाऱ्या उमेदवारांवर अधिकचा भाव देण्यात येत आहे. राज्यातील ज्या ५० ते ५६ मतदारसंघांतील निकालांचे भाकीत करणे अवघड आहे, अशा मतदारसंघांसाठी कमी भाव देण्यात आला आहे.  या अनिश्चित ५६ जागांवरील २५ ते ३० जागा आपल्या बाजूला वळवणारी आघाडी यावेळी बाजी मारू शकेल, असे सट्टेबाजांचे भाकीत आहे.

Story img Loader