मध्य प्रदेशातील धार शहराच्या मध्यभागी भोपाळपासून सुमारे २५० किमी अंतरावर चिश्ती संत कमाल अल-दीन यांची समाधी आहे. या समाधीला लागूनच एक प्रशस्त हायपोस्टाइल मशीद उभी आहे. या मशिदीची रचना हिंदू मंदिराचे अवशेष वापरून तयार करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील भोजशाला मंदिर किंवा कमाल मौला मशीद हे संकुल १९९२ पासून-अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यापासून वादाच्या केंद्रस्थानी आहे. या संपूर्ण संकुलाला भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत संरक्षित वास्तूचा दर्जा होता. हिंदूधर्मीय हे स्थळ वाग्देवीचे (सरस्वती) मंदिर मानतात, तर मुस्लिम धर्मीय कमाल मौला मशिदीचे ठिकाण मानतात.

अलीकडेच १५ जुलै रोजी पुरातत्त्व खात्याने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, पूर्वी या स्थळी अस्तित्त्वात असलेल्या मंदिराच्या भागांचा वापर करून मशीद तयार करण्यात आली आहे. ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टिस’ने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेनंतर हा अहवाल सादर करण्यात आला होता. या याचिकेत ७ एप्रिल २००३ रोजीच्या ASI आदेशाला आव्हान दिले होते. या आदेशात मंगळवारी संकुलात पूजा आणि शुक्रवारी नमाजाची परवानगी देण्यात आली होती. १५ जुलैच्या अहवालानंतर उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी जल्लोष साजरा केला. वाग्देवीचे हे मंदिर परमार राजा भोज याने बांधल्याचे सांगितले जाते.

uday samant and rajan salvi
कोकणात उदय सामंत, राजन साळवी यांच्यातील वाद विकोपाला
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
readers feedback on loksatta editorial
लोकमानस: संस्कृतीविषयीच्या अनास्थेचे प्रतीक
supreme court on governor marathi news
चतुःसूत्र: राज्यपाल न्यायिक पुनरावलोकनाच्या कक्षेत
Badlapur, sexual abuse, political exploitation, protest, banners, internet shutdown, ‘Mychildnotforpolitics’, rail roko, lathi charge, local response, badlpur school case
चिमुकल्यांच्या अत्याचाराचे ” विकृत राजकारण नको”, बदलापुरात ठिकठिकाणी झळकले फलक
father-in-law, extraordinary personality,
माझे सासरे : एक असाधारण व्यक्तिमत्त्व
nirbhaya mother mamata banerjee
Kolkata Doctor Murder : कोलकाता बलात्कार प्रकरणावरून निर्भयाच्या आईचा ममता बॅनर्जींवर संताप; म्हणाल्या, “त्या केवळ लोकांचं…”
Ramgiri Maharaj, Prophet Muhammad,
Ramgiri Maharaj : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल

अधिक वाचा: केनिया सरकार करणार १० लाख भारतीय कावळ्यांचा संहार; काय आहे नेमकं प्रकरण?

ब्रिटिशकालीन संदर्भ

१८२२ साली इंग्रज लेखक जॉन माल्कम आणि १८४४ साली मेजर जनरल विल्यम किनकेड यांच्या लिखाणात वादग्रस्त जागेवरील कमाल मौला मशिदीचा उल्लेख करण्यात आला आहे. या लेखकांनी राजा भोजाविषयीच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण करताना भोजशाळेचा उल्लेख केलेला नाही.

संस्कृत अभ्यासाचे केंद्र

परंतु रॉयल एशियाटिक सोसायटीने प्रकाशित केलेल्या मायकेल विलिसच्या २०१२ च्या शोधनिबंधात, भोजशाळा (भोज हॉल) हे राजा भोजाशी संबंधित संस्कृत अभ्यासाचे केंद्र होते. विलिस यांनी नमूद केले की कमाल अल-दीन चिश्तीच्या कबरीला लागून असलेली मशीद २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून भोजशाळा म्हणून ओळखली जात होती आणि ती धार्मिक, सामाजिक आणि राजकीय तणावाचा केंद्रबिंदू ठरली होती.

संस्कृत शिलालेख

“धार, भोज अॅण्ड सरस्वती: इंडोलॉजी टू पॉलिटिकल मिथॉलॉजी अॅण्ड बॅक” या शीर्षकाच्या शोधनिबंधात विलिसने भारतीय पुरातत्त्व खात्यासाठी काम केलेले जर्मन इंडोलॉजिस्ट, Alois Anton Fuhrer यांनी दिलेला भोजाचा पहिला संदर्भ दिला आहे. १८९३ साली फ्युहररने मध्य भारतात प्रवास केला होता, त्याने मशीद संकुलाची नोंद भोजशाळा म्हणून केली आहे. परंतु त्याला एएसआयच्या पदावरून नंतर बडतर्फ करण्यात आले. विलीस यांनी आपल्या शोध निबंधात १९०२ साली भारतीय पुरातत्त्व खात्याने के.के. लेले यांच्या अधिपत्याखाली भोजशाळेजवळ लहानसे कार्यालय स्थापन केले होते. येथे त्यांना दोन संस्कृत शिलालेख सापडले होते. लेले यांनी या संस्कृत शिलालेखांचा अर्थ लावताना या स्थळाचे भोजशाळा असे नामकरण केले असे संदर्भ दिले आहेत.

राजकारणाचा केंद्रबिंदू

खरंतर धारची ओळख ही माळव्याचा राजा बाज बहादूर आणि रूपमती यांच्या प्रेमकथेसाठी होती. परंतु धार लवकरच जातीय राजकारणाच्या छायेत आले. हे राजकारण आजही भोजशाळेभोवती फिरते आहे. १९५२ साली या ठिकाणी पहिल्यांदा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, त्या वर्षी हिंदूंनी भोज दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर मुस्लिमांनी १९५३ साली उर्स (सूफी संत मोईनुद्दीन चिश्ती यांची पुण्यतिथी) साजरी करण्याचे ठरवले. तर पुढील काही दशकांमध्ये मुस्लिम शुक्रवारी या ठिकाणी नमाज अदा करत होते, तर हिंदू वसंत पंचमी साजरी करण्यासाठी एकत्र येत होते.

अधिक वाचा: Vasco da Gama ‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो? 

मंगळवारी हिंदूंचा, शुक्रवार मुस्लिम समाजाचा

बाबरी मशीद पाडल्यानंतर, मध्य प्रदेशातील उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी हिंदू पूजेसाठी ही जागा मोकळी करण्याची मागणी केली. १९९४ साली बाबरी मशीद पाडल्याच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त विहिंपने स्मारकावर ध्वज फडकवण्याची धमकी दिल्यानंतर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतरच्या काही वर्षांत, स्थानिक शांतता समित्यांनी दोन्ही समुदायांना या स्थळी प्रवेश मिळावा याची खात्री करण्यासाठी एक सूत्र तयार केले. या सूत्रानुसार मंगळवार हिंदूंसाठी आणि शुक्रवार हा मुस्लिमांच्या प्रार्थनेसाठी ठरवण्यात आला.

२००३ साली चकमक

परंतु १९९७ साली पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले, त्यावर्षी विहिंपने या जागेवर झेंडा फडकावण्याची धमकी दिल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. २००३ साली राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगलसदृश्य वातावरण निर्माण झाले होते. त्याप्रसंगी झालेल्या चकमकीत अनेक पोलीसही जखमी झाले होते, त्याच वर्षी हा मुद्दा दिल्लीपर्यंत पोहोचला. भाजपाच्या नेत्यांनी भोजशाळा उघडण्याचे आवाहन केले. विदिशाचे तत्कालीन खासदार माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत माहिती दिली की, “राज्य सरकारने हिंदूंच्या भावना दडपून भोजशाळेत हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घातली होती”.

२००३ साली मार्च महिन्यात, केंद्रीय पर्यटन मंत्री जगमोहन मल्होत्रा यांनी दिग्विजय सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला हिंदूंना सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या ठिकाणी प्रार्थना करण्याची आणि मुस्लिमांना नमाज अदा करण्यास परवानगी देण्यास सांगितल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार या वादात अडकले. काँग्रेस सरकारने ठरवलेल्या सूत्रापेक्षा ते वेगळे होते, ज्यात हिंदूंना मंगळवारी दोन तास प्रार्थनास्थळी प्रार्थना करण्याची परवानगी होती.

२००३ साली हाच मुद्दा निवडणुकीत प्रचारासाठी भाजपाने निवडला होता. उमा भारती मध्य प्रदेशच्या भाजपा प्रचार प्रभारी होत्या. हिंदू जागरण मंचने भोजशाळेच्या मुद्द्यावर या भागातील मतदारांना एकत्र आणले. या घटनांमुळे भाजपाला दिग्विजय सरकारचा पाडाव करण्यासाठी आवश्यक असलेली गती मिळाली. डिसेंबर २००३ साली मध्ये मुख्यमंत्री म्हणून उमा भारती यांनी कार्यभार स्वीकारला. २०२२ साली, शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने ब्रिटीश संग्रहालयातून सरस्वतीची मूर्ती परत आणण्याचे आश्वासन दिले आणि राजकीय चर्चांना अधिक धार चढली.