PETA India sends a letter to Salman Khan: पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (PETA) इंडियाने बुधवारी बॉलिवूड सुपरस्टार आणि बिग बॉसचा होस्ट सलमान खानला विनंती केली की, त्यांनी ‘बिग बॉस १८’ च्या सेटवरून गाढवाला बाजूला काढण्यासाठी प्रयत्न करावेत. PETA ने सलमान खानला पाठवलेल्या पत्रात ‘गाढवाला कार्यक्रमात आणल्यामुळे जनतेत असंतोष निर्माण झाल्याचे’ म्हटले आहे. या शोच्या नवीन सीझनमध्ये १९ वा स्पर्धक म्हणून गाढवाला सहभागी करण्यात आले आहे. PETA ने म्हटले आहे की, लोकांच्या अनेक तक्रारी येत असून त्यांचे चिंतेचे कारण योग्य आहे. त्यामुळे ते दुर्लक्षित केले जाऊ नये. पत्राद्वारे, PETA इंडियाचे प्रतिनिधी शौर्य अग्रवाल यांनी सलमान खानला शोच्या निर्मात्यांना विनंती करण्याचे सुचवले. प्राण्यांना मनोरंजनासाठी प्रॉप्स म्हणून न वापरण्याचे आवाहन करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यांनी म्हटले आहे की, त्यांची ही विनंती प्राण्यावरील ताण आणि प्रेक्षकांना होणारा त्रास टाळण्यास मदत करेलच, परंतु एक सकारात्मक उदाहरणही प्रस्थापित करेल,” असे पत्रात लिहिले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा