How Bigg Boss Influences Viewer Reactions and Emotions: सध्या बिगबॉस मराठी हा रिअ‍ॅलिटी शो विशेष चर्चेत आहे. या शोला मिळणारे प्रचंड टीआरपी रेटिंग हे त्याचं प्रमाणपत्रच म्हणावं लागेल. अलीकडेच एका स्पर्धकावर हिंसाचाराचा आरोप झाल्यामुळे त्या स्पर्धकाला शो मधून काढून टाकण्यात आलं. असं का झालं याची पार्श्वभूमीही महत्त्वाची आहे. या शो मध्ये असणाऱ्या एका खलनायिका सदृश्य स्पर्धकाच्या कानशिलात लगावल्यामुळे त्या स्पर्धकाला निष्कासित करण्यात आले. जी निष्कासित झाली तिच्याबद्दल बोलण्यापेक्षा जी खलनायिका आहे तिचीच चर्चा अधिक रंगली आहे. या खलनायिकेला धड मराठीही बोलता येत नाही. उठता बसता समोरच्या स्पर्धकांचा अपमान करते. लहान-मोठ्यांचे तिला भान नाही. बिगबॉसच्या घरात कोणालाही जुमानत नाही. तरीही बिगबॉसकडून तिच्या पापांकडे (कृतीकडे) दुर्लक्ष केले जातं. असे असताना जिने विरोध केला तिलाच बाहेर काढलं, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये असंतोष पाहायला मिळाला. समाजमाध्यमांवर याविषयीचा निषेध नोंदवणाऱ्या पोस्ट, मेसेजेस यांचा पाऊस पडला. आपल्या निषेधामुळे का होईना त्या स्पर्धकाला परत बोलावतील अशी भाबडी आशा प्रेक्षकांनी व्यक्त केली. ‘…तर हा शो पाहणार नाही’ असंही अनेकांनी सांगितलं. त्याने फारसा फरक पडत नाही, कारण हीच तर शोची स्ट्रेटेजी होती! प्रेक्षकांना अशा प्रतिक्रिया व्यक्त करायला भाग पाडणं, हाच गेम आणि हेच या शोचं यशही! यू हेट मी ऑर लव्ह मी, बट यू कॅनॉट इग्नोर मी अशी स्थिती आहे. काहीही झालं तरी प्रेक्षक हा शो पाहतात, त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर कोणतं गारुड करतात किंवा कशा प्रकारे त्यांच्या मनाशी खेळतात हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

अधिक वाचा: “गुहेत पळून जाणारा सिंह…” म्हणत अभिजीतने उडवली अरबाजची खिल्ली; घराबाहेर जाण्याविषयी केलं भाकित

Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Aroh Welankar New Villa
Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक
ghanshyam aka chota pudhari meets nikki arbaz
Video : निक्कीला भेटण्यासाठी मुंबईत आला घन:श्याम! अरबाजला चुकून ‘या’ नावाने मारली हाक अन्…; पुढे काय घडलं?
Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव
Bigg Boss 18 hrithik roshan life coach arfeen khan Evicted from salman khan
Bigg Boss 18: हृतिक रोशनच्या लाइफ कोचला दाखवला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता, ‘हे’ सदस्य झाले सुरक्षित
actress sreejita de and michael bengali wedding
Bigg Boss फेम अभिनेत्री पुन्हा करतेय लग्न, दीड वर्षापूर्वी जर्मन तरुणाशी बांधली लग्नगाठ
shiv thakare and big boss 16 contenstant dancing video
Video : ‘लडकी आंख मारे’वर शिव ठाकरे थिरकला, त्याच्यासह Bigg Boss १६ च्या स्पर्धकांनीही केला डान्स; चाहते म्हणाले, “चुगली करणारे…”

रिअ‍ॅलिटी शो म्हणजे नक्की काय?

टीव्हीवर प्रक्षेपित होणाऱ्या अनेक कार्यक्रमांच्या विविध प्रकारांपैकी एक म्हणजे रिअ‍ॅलिटी शो. डेली सोप्स किंवा इतर कार्यक्रम आणि रिअ‍ॅलिटी शो मध्ये एक मुख्य फरक असतो, तो म्हणजे या शोजमध्ये प्रेक्षकांना दिसतं ते रिअल किंवा खरं असणं अपेक्षित असतं. रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धकांना आधीपासून दिलेली स्क्रिप्ट नसते (किंवा तसं अपेक्षित तरी असतं). या कार्यक्रमांमध्ये स्पर्धकांचे किंवा सहभागींचे दैनंदिन जीवन, संघर्ष, वागणूक आणि भावना कॅमेऱ्याद्वारे टिपल्या जातात. बरेच रिअ‍ॅलिटी शो स्पर्धात्मक असतात, जिथे स्पर्धकांना विविध टास्क किंवा आव्हाने पूर्ण करावी लागतात. रिअ‍ॅलिटी शोच्या स्पर्धकांमध्ये भावनिक, सामाजिक किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केली जाते. या परिस्थितीमुळे वादविवाद, प्रेम, मैत्री किंवा वैर निर्माण होऊ शकते. ज्यामुळे शो ‘मसालेदार’ होण्यास मदतच होते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर हा कार्यक्रम अधिक रंगतदार होतो. स्पर्धात्मक (Competitive Reality Shows), लाइफस्टाइल (Lifestyle Reality Shows), टॅलेंट (Talent Reality Shows) आणि डेटिंग/ मॅरेज शो (Dating Reality Shows) इत्यादी रिअ‍ॅलिटी शोजचे प्रकार आहे. रिअ‍ॅलिटी शोमध्ये कॅमेरा क्रू स्पर्धकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग होतो. स्पर्धकांना टास्क दिली जातात किंवा एकत्र राहण्याची संधी दिली जाते. स्पर्धकांच्या नैसर्गिक प्रतिक्रिया आणि त्यांच्यातील संवाद हाच शोचा मुख्य भाग असतो.

जगातील पहिला रिअ‍ॅलिटी शो कोणता?

अ‍ॅन अमेरिकन फॅमिली (An American Family) हा जगातील पहिला रिअ‍ॅलिटी शो मानला जातो. या शोचे प्रक्षेपण १९७३ साली पीबीएस (Public Broadcasting Service) या वाहिनीवर करण्यात आले होते. या शोमध्ये लॉड (Loud) नावाच्या अमेरिकन कुटुंबाचे जीवन दाखवण्यात आले. त्यात या कुटुंबाचे वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक संघर्ष व त्या अनुषंगाने होणारे बदलही दाखवण्यात आले. यात कोणत्याही नट किंवा नटीचा सहभाग नव्हता. वास्तविक कुटुंबातील सदस्यांचे जीवन दाखवण्यात आले. त्यामुळे प्रेक्षकांना खरे आणि नैसर्गिक अनुभव घेता आले. हा शो खूप यशस्वी झाला होता आणि त्यातून रिअ‍ॅलिटी टीव्हीचा नवीन प्रकार समोर आला. कुटुंबातील वैयक्तिक वाद, घटस्फोट, मुलांच्या समस्या इत्यादी प्रसंगांमुळे हा शो प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. “An American Family” ने रिअ‍ॅलिटी शोच्या प्रकाराला चालना दिली आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे रिअ‍ॅलिटी शो तयार होऊ लागले.

बिगबॉस हा भारतातील सगळ्यात यशस्वी रिअ‍ॅलिटी शोजपैकी एक आहे. हा शो मूळतः १९९९ साली प्रक्षेपित झालेल्या ‘बिग ब्रदर’ नावाच्या एका डच रिअ‍ॅलिटी शोवर आधारित आहे. या कार्यक्रमाची संकल्पना डच निर्माता जॉन डी मॉल यांची होती. यामध्ये स्पर्धकांना एका घरात बंद केले जाते आणि संपूर्ण २४ तास ते कॅमेराच्या देखरेखीखाली असतात. या शोला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर विविध देशांनी या शोची स्थानिक आवृत्ती तयार केली. भारतात हा शो बिग बॉस या नावाखाली हिंदीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये करण्यात आला. बिग बॉस मराठी हा कार्यक्रम २०१८ साली सुरू झाला. तेव्हापासून ते आजपर्यंत या शोचे प्रक्षेपण कलर्स मराठी या वाहिनीवर सुरु आहे.

बिग बॉसची मूलभूत रचना:

शोमध्ये स्पर्धक एका घरात १०० दिवस किंवा त्याहून अधिक काळ एकत्र राहतात. त्यांना बाहेरील जगाशी कोणताही संपर्क ठेवता येत नाही. त्यांना फक्त बिग बॉसच्या आदेशानुसार काम करावे लागते. दर आठवड्याला स्पर्धकांना विविध टास्क दिली जातात. या टास्कद्वारे त्यांचे वर्तन, सहकार्य, आणि क्षमता तपासल्या जातात. प्रत्येक आठवड्यात घरातील सदस्य इतर सदस्यांना नॉमिनेट करतात. नंतर प्रेक्षकांच्या मतांनुसार एक स्पर्धक शोमधून बाहेर जातो. शेवटी, एक स्पर्धक विजेता म्हणून निवडला जातो, ज्याला मोठी रोख रक्कम आणि विजेतेपद मिळते.

बिग बॉस मराठी पहिला सीझन (२०१८) – प्रसारण तारीख: १५ एप्रिल २०१८ ते २२ जुलै २०१८ – होस्ट: महेश मांजरेकर – विजेती: मेघा धाडे – पहिला उपविजेता: पुष्कर जोग

बिग बॉस मराठी दुसरा सीझन (२०१९) – प्रसारण तारीख: २६ मे २०१९ ते १ सप्टेंबर २०१९ – होस्ट: महेश मांजरेकर – विजेता:शिव ठाकरे – उपविजेती: नेहा शितोळे

बिग बॉस मराठी तिसरा सीझन (२०२१) – प्रसारण तारीख: १९ सप्टेंबर २०२१ ते २६ डिसेंबर २०२१ – होस्ट: महेश मांजरेकर – विजेता: विशाल निकम – उपविजेता: जय दुधाने

बिग बॉस मराठी चौथा सीझन (२०२२- २०२३) – प्रसारण तारीख: २ ऑक्टोबर २०२२ ते ८ जानेवारी २०२३ – होस्ट: महेश मांजरेकर – विजेता: अक्षय केळकर – उपविजेती: अपूर्वा नेमळेकर

बिग बॉस मराठी पाचवा सिझन (२०२४) (चालू सीझन)- प्रसारण तारीख: २८ जुलै २०२४ – होस्ट: रितेश देशमुख – स्पर्धक: वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता प्रभु-वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरोडे, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरूषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, इरिना रुडाकोवा (निखिल दामले, योगिता चव्हाण, घनश्याम दरोडे, आर्या जाधव, पुरूषोत्तम दादा पाटील, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोवा बाहेर पडले आहेत)

या शोकडून प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याकरिता अनेक मानसिक तंत्रांचा वापर केला जातो.

१. भावनिक खेळ: या शोमध्ये वादविवाद, मानसिक तणाव, समेट आणि प्रेमाचे- प्रणयाचे अँगल्स/ क्षण दाखवले जातात. हे क्षण प्रेक्षकांमध्ये सहानुभूती, राग किंवा आनंद यासारख्या तीव्र भावना निर्माण करतात. विविध भावना दाखवून प्रेक्षकांचे स्पर्धकांशी भावनिक पातळीवर नाते जोडण्यात येते.

२. स्पर्धकांचा वापर करून प्रेक्षकांसाठी केलेली व्यूहरचना: आजपर्यंत जितके सीझन झाले त्यात स्पर्धकांचे दोन गट प्रामुख्याने आढळतात. एक गट खलनायक असतो तर दुसरा शोषिक/ सात्विक असतो. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये स्पर्धकांविषयी सहानभूती निर्माण होण्यास मदत होते. मानवी स्वभावानुसार असत्यावर सत्याचा विजय कसा होतो हे पाहण्यासाठी शेवटपर्यंत प्रेक्षक या खेळाशी बांधील राहतात. प्रसंगी स्पर्धक अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी अयशस्वी ठरत असतील तर बिगबॉसचे निर्माते स्वतःच खलनायकाच्या भूमिकेत येतात.

३. नाट्यमय संघर्ष आणि निराकरण: घरातील सदस्यांमधील संघर्ष हा शोच्या नाट्यमयतेचा मुख्य घटक असतो. या संघर्षांमुळे प्रेक्षकांची भावनिक गुंतवणूक वाढते आणि ऑनलाईन व ऑफलाईन चर्चांना चालना मिळते. त्यामुळे शोचे दर्शक वाढण्यास मदत होते.

अधिक वाचा: Video : “मी कोणत्याही टीमचा…”, धनंजयने गेमच बदलला! निक्कीसमोर मांडलं स्पष्ट मत; काय आहे नवीन Strategy?

४. धोरणात्मक मतदान: सार्वजनिक मतदान प्रणाली प्रेक्षकांच्या मानसशास्त्राशी खेळते. त्यामुळे त्यांच्यात निकालावर नियंत्रण असल्याची भावना तयार होते. प्रेक्षकांना वाटते की, ते स्पर्धकांना ‘आपण वाचवू’ किंवा ‘बाहेर काढू शकतो’. त्यामुळे शोमध्ये त्यांचा रस अधिक वाढतो. कधी कधी धोरणात्मकरीत्या स्पर्धकांना बाहेर काढून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले जाते, त्यामुळे शो अनपेक्षित राहतो आणि अधिक रोमांचक ठरतो. शोची संपूर्ण रचना हा एक सामाजिक प्रयोग आहे, जिथे तणावाखाली मानवी वर्तन कसे असते, हे तपासले जाते. प्रेक्षकही या प्रयोगाचा एक भाग होतात, जिथे ते स्पर्धकांच्या कृतींवर निर्णय घेऊन आणि त्यांचे मूल्यांकन करून त्यांच्या जागी स्वतःला ठेवून निर्णय देतात.

५. रिअ‍ॅलिटी शोचा आभास: बिग बॉस रिअ‍ॅलिटी शो म्हणून ओळखला जात असला तरी, दाखवले जाणारे बरेचसे क्षण हे निवड स्वरूपात संपादित केलेले असतात. या संपादनामुळे प्रेक्षकांना स्पर्धक आणि परिस्थिती यांचे नेमके कसे आकलन होणार आहे, हे ठरवले जाते. हे निवडक संपादन विशिष्ट कथा किंवा दृष्टिकोन निर्माण करते, ज्याचा प्रेक्षकांच्या आकलनावर परिणाम होतो.

६. बक्षीस आणि शिक्षा चक्र: शोमध्ये दिले जाणारे काम आणि आव्हाने हे बक्षीस- शिक्षा चक्रावर आधारित असतात. चांगले वर्तन किंवा काम पूर्ण केल्यावर स्पर्धकांना बक्षीस मिळते आणि अपयशी ठरल्यास किंवा नियम तोडल्यास शिक्षा दिली जाते. ही रचना प्रेक्षकांमध्ये तणाव निर्माण करते – कोण यशस्वी होणार आणि कोण अपयशी होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक राहतात.

७. होस्टचा प्रभाव: शोचा होस्ट प्रेक्षकांच्या आकलनावर प्रभाव टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. बिग बॉस मराठीमध्ये, होस्ट दर आठवड्याला स्पर्धकांची शाळा घेतो. त्यांच्या चुका- कौतुक सांगतो. त्यामुळे प्रेक्षकांना आपले मत, भावना होस्टने स्पर्धकांपर्यंत पोहोचवल्याची भावना तयार होते.

८. क्लिफहॅंगर आणि टीझर्स: एपिसोड्स बहुधा क्लिफहॅंगरवर संपतात. म्हणजेच एखाद्या वेळी वाद विकोपाला पोहोचला असेल तर त्या क्षणाला येऊन एपिसोड संपवला जातो. हा युक्तिवाद प्रेक्षकांना परत येण्यास भाग पाडतो, पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक माघारी येतात. आगामी एपिसोड्सचे टीझर्स देखील उत्सुकता वाढविणारे आणि प्रेक्षकांच्या कुतूहलाला चालना देणारे असतात.

९. संबंध आणि प्रादेशिक ओळख: बिग बॉस मराठी हा शो मराठी संस्कृती आणि भाषेवर आधारित आहे. ज्यामुळे प्रादेशिक अभिमान जागृत होतो आणि स्थानिक प्रेक्षकांशी एक दृढ नातं निर्माण होतं. स्पर्धकांची निवड मराठी समाजाच्या विविध पैलूंना दर्शवण्यासाठी केली जाते, ज्यामुळे ते प्रेक्षकांना अधिक जवळचे वाटतात. याच उत्तम उदाहरण या सीझनमध्ये एका परदेशी स्पर्धकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. वारंवार आपला मराठी संस्कृतीशी असलेला संबंध बोलून दाखवणं हाही त्याचाच प्रकार आहे किंवा मालवणीचा मुद्दा हे देखील ताजे उदाहरण आहे.

एकुणातच सध्या हिंसाचार प्रकरणात स्पर्धकाला जे निष्कासित करण्यात आलेले आहे, तो ही या शोच्या प्रसिद्धीचा आणि स्ट्रॅटेजिचाच भाग आहे. अगदीच प्रॅक्टिकल विचार करायचा झाला तर हिंसाचाराला प्रोत्साहन नको म्हणून जर हे निष्कासन झाले असते तर यापूर्वी अनेक मार्गाने मानसिक-मौखिक-शारीरिक हिंसा या शो मधून दाखवण्यात आली होती. त्यावेळी ठोस पाऊल का उचलली गेली नाहीत या प्रश्नाचं वेगळं उत्तर देण्याची गरज नाही.