ख्रिसमसच्या दिवशी बाकूहून चेचन्यातील ग्रोझनी या रशियन शहराकडे उड्डाण करणारे अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कझाकस्तानमधील अकताऊ शहराजवळ नियोजित मार्गावरून भटकले आणि क्रॅश झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात विमानातील चालक दलासह ६७ जणांपैकी ३८ जणांचा मृत्यू झाला. बुधवारी (२५ डिसेंबर) अझरबैजान एअरलाइन्सचे फ्लाइट ‘J2-8243’ विमानाने अझरबैजानची राजधानी बाकू येथून ३.५५ वाजता उड्डाण केले. त्यानंतर ६.२८ च्या सुमारास ते क्रॅश झाले, असे फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट ‘Flightradar24’ मधील डेटा दर्शवितो.

फ्लाइट रडार वेबसाइटवरील आपल्या सामान्य मार्गापासून हे विमान भटकले आणि कॅस्पियन समुद्र ओलांडून समुद्राच्या पूर्वेकडच्या किनाऱ्यावरील तेल आणि वायू केंद्र असलेल्या अकताऊजवळ क्रॅश झाले. प्राथमिक तपासानुसार, वैमानिकाने पक्षी धडकल्यानंतर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला; ज्यामुळे हा अपघात झाला. अगदी अझरबैजान एअरलाइन्सने सुरुवातीला सांगितले की, हा अपघात पक्ष्यांमुळे झाला, मात्र नंतर त्यांनी आपले विधान मागे घेतले. विमानाचा अपघात नक्की कसा झाला आणि खरंच पक्षी धडकल्याने हा अपघात झाला का? त्याविषयी जाणून घेऊ.

Russias Voronezh radar system
चीनची घुसखोरी रोखण्यासाठी भारताला रशियाची मदत! काय आहे वोरोनेझ रडार प्रणाली?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
russia ins tushil
रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?
Cylinder explosion in Badlapur one injured
Cylinder explosion : बदलापुरात सिलेंडरचा स्फोट, एक जखमी
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान
fire godown Pimpri-Chinchwad, Massive fire at godown,
पिंपरी-चिंचवडमध्ये गोडाऊनला भीषण आग; धुरांचे लोट काही किलोमीटर..
अझरबैजान एअरलाइन्सचे J2-8243 ६२ या विमानाने प्रवासी आणि पाच क्रू सदस्यांसह बाकू येथून उड्डाण केले आणि ते रशियामधील ग्रोझनीकडे जात असताना ही दुर्घटना घडली. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : दोन लाखांहून अधिक जणांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ विध्वंसाने त्सुनामीचा पूर्वइशारा देणारी प्रणाली कशी बदलली?

अझरबैजान एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये काय घडले?

अझरबैजान एअरलाइन्सचे J2-8243 ६२ या विमानाने प्रवासी आणि पाच क्रू सदस्यांसह बाकू येथून उड्डाण केले आणि ते रशियामधील ग्रोझनीकडे जात असताना ही दुर्घटना घडली. परंतु, अकताऊपासून अंदाजे तीन किलोमीटर (१.८ मैल) अंतरावर विमानाने आपत्कालीन लँडिंग केले. विमानाच्या असत्यापित व्हिडीओ फुटेजमध्ये ते जमिनीवर धडकल्याचे आणि त्याला आग लागल्याचे दिसले. विमान अपघातानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विमान खाली पडल्यावर त्यातील प्रवासी ‘अल्लाहू अकबर’ म्हणताना ऐकू येते. आसनांवर पिवळे ऑक्सिजन मास्क लटकलेले आणि लोकांचे ओरडणे व रडणे ऐकू येते.

विमान कोसळल्यानंतर काही वेळातच बचावकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली. अधिकाऱ्यांनी नंतर सांगितले की, दोन मुलांसह २९ लोक अपघातातून वाचले. परंतु, कझाकस्तानचे उपपंतप्रधान कानाट बोझुम्बेव यांनी सांगितले की, वाचलेल्या ११ जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर अझरबैजानी राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांनी दुर्घटनेनंतरचा आजचा दिवस गुरुवार राष्ट्रीय शोक दिवस म्हणून घोषित केला आणि माजी सोव्हिएत राष्ट्रांचा समूह असलेल्या कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स (CIS)च्या नेत्यांच्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठीची रशियाची नियोजित भेट रद्द केली.

अपघाताचा तपास

कझाकस्तानने घोषणा केली आहे की, त्यांनी अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. तसेच, विमानाचा ब्लॅक बॉक्स जप्त करण्यात आला आहे; ज्यामुळे विमानात नेमकी काय परिस्थिती उपस्थित झाली, हे समजण्यास मदत होईल. अझरबैजान एअरलाइन्सचे विमान खाली पडल्यानंतर काही काळानंतर, तज्ज्ञांनी काही अंदाज व्यक्त केले. काहींचा असा अंदाज होता की, विमान रशियन हवाई संरक्षण दलाकडून खाली पाडले गेले असावे. फायटर बॉम्बर टेलिग्राम चॅनेल रशियन सैन्याच्या कॅप्टन इल्या तुमानोव्हद्वारे चालवले जात असल्याचे मानले जाते. त्यांनी एक क्लिप जारी केली; ज्यामध्ये विमानात छिद्र असल्याचे दिसून आले. काहींनी सुचवले की, हे गोळीबार किंवा स्फोटामुळे झालेल्या नुकसानासारखे आहे.

पक्ष्याची विमानाशी झालेली धडक अथवा विमान आणि पक्षी यांच्यात झालेल्या टकरीला ‘बर्ड स्ट्राइक’, असे म्हटले जाते. (छायाचित्र-रॉयटर्स)

परंतु, रशियाच्या एव्हिएशन वॉचडॉगने सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, पायलटने पक्ष्यांच्या धडकेनंतर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला होता. “पक्ष्यांशी टक्कर झाल्यानंतर वैमानिकाने पर्यायी एअरफील्डवर जाण्याचा निर्णय घेतला आणि अकताऊ येथे लँडिंग करण्याचा निर्णय घेतला,” असे रशियाच्या विमान वाहतूक वॉचडॉगने टेलिग्रामवर सांगितले.

‘बर्ड स्ट्राइक’ म्हणजे काय?

पक्ष्याची विमानाशी झालेली धडक अथवा विमान आणि पक्षी यांच्यात झालेल्या टकरीला ‘बर्ड स्ट्राइक’, असे म्हटले जाते. ओहायोमधील कॉर्नफील्डवर १९०५ मध्ये ऑर्व्हिल राईटने प्रथम नोंद केल्यापासून पक्ष्यांची टक्कर अगदी सामान्य झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१६ ते २०२१ या कालावधीत २,७०,००० पेक्षा जास्त वेळा पक्ष्यांची धडक म्हणजेच ‘बर्ड स्ट्राइक’ची नोंद करण्यात आली आहे. पक्षी विमाने आणि विमानतळांच्या आजूबाजूच्या भागाकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे ‘बर्ड स्ट्राइक’च्या दुर्घटना घडत असल्याचे मत विमान वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पावसाळ्यात मोकळ्या मैदानात पाण्याची डबकी तयार होतात आणि तेथे कीटक प्रजननासाठी आकर्षित होतात. त्यामुळे या प्रदेशांमध्ये पक्ष्यांची उपस्थितीही वाढते. त्याशिवाय स्थलांतरित पक्षी अनेकदा हवाई वाहतूक मार्गावर येतात. पक्षी अनेकदा कळपाने उडतात; ज्यामुळे पक्षी व विमान यांच्यात टक्कर झाल्यास घडणाऱ्या दुर्घटनेत व्यक्तींच्या मृत्यूंची शक्यता वाढते.

पक्ष्यांच्या धडकेमुळे लोक मारले गेले आहेत किंवा जखमी झाले आहेत का?

तज्ज्ञांनी असे नमूद केले आहे की, पक्ष्यांच्या हल्ल्यामुळे विमानाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. एखाद्या पक्ष्याकडूनही विमानावर होणारा आघात लहान विमानांसाठी, विशेषतः सिंगल इंजिन विमानांसाठी घातक ठरू शकतो. जगभरात १९८८ पासून आतापर्यंत २६२ पक्ष्यांच्या हल्ल्यांमुळे २५० विमानांचे अपघात झाले आहेत. त्यात प्रवाशांचे मत्यू झाल्याची नोंद आहे. पक्षी धडकल्याची सर्वांत प्रसिद्ध घटना २००९ मध्ये घडली. यूएस एअरवेज फ्लाइट १५४९ ने न्यूयॉर्कमधील लागार्डिया विमानतळावरून उड्डाण केले. त्यानंतर लगेचच स्थलांतरित कॅनेडियन गुसचा कळप विमानाला धडकला. त्यामुळे विमानाची दोन्ही इंजिने निकामी झाली आणि कॅप्टन सुली सुलेनबर्गरला विमान हडसन नदीत लँडिंग करण्यास भाग पाडले.

ऑक्टोबर १९६० मध्ये पक्ष्यांच्या धडकेने प्राणघातक विमान दुर्घटना घडली होती. बोस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या २० सेकंदांनंतर ईस्टर्न एअरलाइन्सच्या विमानाला पक्ष्यांनी धडक दिली. या घटनेमुळे विमान बोस्टन हार्बरवर कोसळले आणि विमानातील ७२ पैकी ६२ जणांचा मृत्यू झाला. १९८८ मध्ये आणखी एक प्राणघातक ‘बर्ड स्ट्राइक’ची दुर्घटना ड. इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग ७३७ विमानात बसलेल्या १०४ पैकी ३५ लोकांचा मृत्यू झाला. इथिओपिया येथून विमान उड्डाण घेत असताना अनेक पक्ष्यांनी विमानाच्या इंजिनाला धडक दिल्याने हा अपघात घडला.

हेही वाचा : पाकिस्तानमध्ये ब्रँडेड कार नव्हे तर पिकअप ट्रक चर्चेत; राजकारण्यांपासून उद्योगपतींपर्यंत वाढली मागणी, कारण काय?

पक्ष्यांचे आघात रोखता येऊ शकतात?

पक्ष्यांचे आघात टाळता येण्यासारखे आहेत; परंतु ते एका मर्यादेपर्यंतच शक्य आहे. पक्ष्यांच्या कळपांचा मागोवा घेण्यासाठी रडारचा वापर केला जाऊ शकतो. वैमानिक पक्ष्यांचा सामना टाळण्यासाठी त्यांची उड्डाणे समायोजितही करू शकतात. पक्ष्यांसाठी सुरक्षित स्थलांतरित कॉरिडॉर तयार करणेदेखील शक्य आहे. त्यामुळे पक्ष्यांना अन्न, पाणी व विश्रांती क्षेत्र यांसारख्या आवश्यक संसाधनांमध्ये प्रवेश करता येतो आणि जैवविविधता राखण्यासही मदत होते.

Story img Loader