क्रांतिकारी आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या १२४ व्या पुण्यतिथीनिमित्त झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी रविवारी (९ जून) त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचे स्मरण करताना मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी ‘एक्स’वर लिहिले, “आदरणीय बिरसा मुंडाजींना विनम्र अभिवादन! आमचे सरकार तुम्ही दाखविलेल्या मार्गावर चालत आहे. आदिवासी, मूलनिवासी आणि सामान्य लोकांच्या राहणीमानामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.” आजही आदिवासी समाजामध्ये बिरसा मुंडा यांना इतके मानाचे स्थान का दिले जाते? त्यांनी केलेल्या संघर्षाचे महत्त्व नेमके काय आहे, ते जाणून घेऊ या.

बंडखोर नेता – बिरसा मुंडा

बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला होता. याच काळादरम्यान आदिवासी समाज काही मोठ्या बदलांना सामोरी जात होता. मुंडा ही भटक्या-शिकारी-शेतकऱ्यांची जमात आहे. ती आजच्या झारखंडमधील छोटा नागपूर भागात राहत होती. त्यांना ब्रिटिशांच्या दमनकारी व्यवस्थेला सामोरे जावे लागले. ब्रिटिशांची राजवट लागू होण्याच्या आधी् तिथे आदिवासींची मूळची ‘खुंटकट्टी’ शेती पद्धत होती. या शेतीच्या पद्धतीमध्ये जमीनदारांचा अजिबात सहभाग नव्हता. परंपरागत अधिकारांच्या तत्त्वावर ही शेती पद्धती आधारलेली होती. मात्र, ही पद्धत नष्ट करून १७९३ मध्ये ब्रिटिशांनी तेथे कायद्याद्वारे जमीनदारी पद्धत आरंभली होती. त्यामुळे ब्रिटिशांना ग्रामीण भागावर ताबा प्रस्थापित करण्यात यश आले. ब्रिटिशांना ग्रामीण-आदिवासी भागातून महसूल हवा होता. त्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने जमीनदारी पद्धतीला चालना दिली. त्यामुळे आदिवासी समाजामध्ये दोन वर्ग पडले. ब्रिटिशांसारखी वसाहतवादी शक्ती आणि ‘डिकू’ म्हणजेच आदिवासींचे शोषण करण्यासाठी बाहेरून आलेले बिगरआदिवासी असा एक वर्ग आणि मूलनिवासी असलेले आदिवासी यांच्यामध्ये संघर्षास सुरुवात झाली. या संघर्षाचे नायक होते बिरसा मुंडा!

indian railway video TT police man fight viral video
“तुम्हाला सगळचं फ्री पाहिजे का…” भर ट्रेनमध्ये टीटीने पोलिसाला फटकारले; VIDEO पाहून युजर्सचा संताप
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
My Name The Night Agent Vincenzo The Glory
नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे? रविवारी पाहा ‘या’ जबरदस्त सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिज, वाचा यादी
Shocking Video madhya pradesh woman jumped from moving train after fighting with her husband
Shocking Video: नवऱ्याशी भांडता भांडता महिलेनं ट्रेनमधून घेतली उडी; लेकरांचा भयंकर आक्रोश अन् थरारक प्रकार कॅमेरात कैद
Sanjay Raut
Sanjay Raut : “महायुतीला जिंकवण्यासाठी पोलीस व गुंडांच्या बैठका”, राऊतांचे आरोप; यादी देण्यास तयार, वरिष्ठ अधिकाऱ्याला म्हणाले, “सरकार बदलल्यावर…”
स्मरण : विसाव्या शतकातील संत!
उत्सव : संत नामदेवांचा विठ्ठल
scientist Raghunath mashelkar
Raghunath Mashelkar: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाहीर

हेही वाचा : ‘ईश्वरसाक्ष’ की ‘गांभीर्यपूर्वक’? जेव्हा शपथेमधील शब्दांवरुन संविधान सभेत झालं होतं रणकंदन!

ब्रिटिशांनी आणलेल्या नव्या कायद्यानुसार, ‘डिकूं’ना आदिवासींच्या जमिनीवर मालकी हक्क सांगता येऊ लागला. त्यामुळे मूळचे स्थानिक रहिवासीच विस्थापित झाले. ज्यांनी पिढ्यान् पिढ्या जल, जंगल, जमिनीचे संरक्षण केले; त्यांनाच त्यांच्या जमिनीची मालकी नाकारण्यात आली. त्यामुळे मूळचे आदिवासीच पोटापाण्यासाठी आपल्या जमिनीवर शेतमजूर झाले. ब्रिटिशांनी आणलेल्या या पद्धतीमुळेच या आदिवासी भागामध्ये सावकार, कंत्राटदार, तसेच सरंजामी जमीनदारांचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत गेले. बिगरआदिवासी लोक ब्रिटिशांच्या मदतीने आदिवासींचे शोषण करू लागले. त्याच वेळी ब्रिटिशांच्या कृपेमुळे मिशनऱ्यांच्या धर्मांतरासाठीच्या कारवायाही चालू राहिल्या. त्यामुळे आदिवासींच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीवरही घाव घालण्यात येऊ लागले. या सगळ्याबरोबरच १८९६-९७, तसेच १२९९ ते १९०० या दरम्यान पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे गरीब आदिवासींची बरीच उपासमार झाली. बिरसा मुंडा हे सगळं आपल्या लहानपणापासूनच पाहत होते. या सगळ्या अन्यायकारी आणि शोषणकारी व्यवस्थेची त्यांना चीड यायची. त्यातूनच त्यांनी ब्रिटिशांविरोधात संघर्षाचा मार्ग पत्करला.

‘धरती का अब्बा’, भगवान बिरसा

बिरसा मुंडा यांनी त्यांच्या बालपणीचा बराचसा काळ आई-वडिलांसोबत एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतर करण्यात घालवला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सालगा येथे शिक्षक जयपाल नाग यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. शिक्षक जयपाल नाग यांनी त्यांना जर्मन मिशन स्कूलमध्ये भरती होण्याची सूचना केल्यानंतर बिरसा यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला; परंतु त्यांनी काही वर्षांतच शाळा सोडली. ब्रिटिश राजवटीचा प्रभाव, तसेच या भागातील ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आदिवासी समाजातील रोष अधिकाधिक वाढू लागला होता. मुंडा यांनी १८८६ ते १८९० या काळात ‘सरदारी लराई’ आंदोलनाजवळील चाईबासा येथे आपला बहुतांश वेळ घालवला होता. ‘सरदारी लराई’ ही चळवळ म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या विरोधात ओराव व मुंडा या जमातींनी केलेले शांततापूर्ण आंदोलन होते. या चळवळीने ब्रिटिशांसमोर आपल्या काही मागण्या अहिंसक मार्गाने अर्ज-विनंत्यांद्वारे मांडल्या होत्या. मात्र, ब्रिटिशांनी या मागण्यांकडे दुर्लक्षच केले.

या आंदोलनातूनच बिरसा मुंडा यांना प्रेरणा मिळाली. एका बाजूला आदिवासींचे शोषण टिपेला पोहोचलेले असताना बिरसा मुंडा यांनी आपल्या लढ्याला सुरुवात केली. त्यांनी ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी लोकांना एकत्र केले. बिरसा मुंडा लवकरच एक आदिवासी नेता म्हणून उदयास आले. ‘अबुआ राज सेतार जाना, महारानी राज तुंडू जाना’ [आपले राज्य पुन्हा येवो, राणीचे (ब्रिटिश) राज्य संपून जावो], अशी त्यांची घोषणा होती. त्यांनी आदिवासी संस्कृतीचा आधार घेत मूलनिवासी लोकांमधील चेतना जागृत केली. ‘सिरमरे फिरन राजा जाई’ (आदिवासींच्या राजाचा विजय असो), अशी घोषणा देत ही जमीन आणि हा प्रांत आपला असल्याचे त्यांनी आदिवासींच्या मनावर बिंबवले. मिशनऱ्यांचा प्रभाव आणि शोषण यांना वैतागून बरेचसे आदिवासी ख्रिश्चन धर्म पत्करू लागले होते. अशा वेळी बिरसा मुंडा यांनी आदिवासी संस्कृतीचे महत्त्व विशद करायला सुरुवात केली. त्यांनी आपल्याच आदिवासी रीतीरिवाजांमधील चुकीच्या गोष्टींवर प्रहार केला. या सगळ्या जनजागृतीमुळे मुंडा आणि ओराव जमातीचे लोक बिरसाईत पंथांमध्ये सामील झाले आणि त्यांनी धर्मांतराला विरोध करायला सुरुवात केली. बिरसा मुंडा यांच्या एकंदर कार्यपद्धतीमुळे समाजात त्यांची लोकप्रियता वाढू लागली आणि त्यातूनच मग लोक त्यांना आदिवासी भाषेत ‘धरती आबा’ (भगवान) म्हणू लागले.

हेही वाचा : शपथविधी समारंभाचा इतिहास कुठून सुरु होतो? भारतात कधीपासून सुरु झाली शपथविधीची प्रथा?

‘उलगुलान’ आंदोलन

बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश राजवटीविरोधात १८९९ साली ‘उलगुलान’ आंदोलनाला सुरुवात केली. हे आंदोलन सशस्त्र होते. बिरसा यांनी आदिवासींना बिरसा राजचे पालन करण्यास, तसेच भुईभाडे न देण्याचे आवाहन लोकांना केले. तसेच जमीनदार, मिशनरी व वसाहतवाद्यांची ठाणी यांच्यावर पारंपरिक धनुष्यबाण वापरून हल्ले चढविण्यात आले. अर्थातच, धनुष्यबाण वापरणाऱ्या आदिवासींपेक्षा ब्रिटिशांचे बळ अधिक होते. त्यामुळे त्यांनी अल्पावधीतच हे सशस्त्र आंदोलन मोडीत काढले. ३ मार्च १९०० रोजी बिरसा मुंडा यांना अटक करण्यात आली. ९ जून १९०० रोजी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी आजारपणामुळे रांची तुरुंगामध्ये बिरसा मुंडा यांचे निधन झाले, असे सांगण्यात येते. बिरसा मुंडा यांना फारच कमी आयुष्य लाभले; तसेच त्यांनी उभे केलेले आंदोलनही त्यांच्या जाण्यानंतर संपुष्टात आले. मात्र, आदिवासींना एकत्र करून आपल्या हक्कांसाठी लढा देणारे ते पहिले नेते होते. त्यामुळे इतिहासात त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण मानले जाते.