History of Mathura Krishna Janma Bhumi: सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी १५ डिसेंबर रोजी दिलेल्या निर्णयामुळे सगळ्यांचेच लक्ष मथुरेकडे लागले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरा येथील शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणास परवानगी दिली होती, याच निर्णयाला स्थगिती देणयाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. परंतु मशिदीच्या सर्वेक्षणाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. ज्या ठिकाणी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता तेथेच शाही इदगाह मशीद बांधण्यात आल्याचे मानले जाते. ही मशीद १७ व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेब याच्या काळात बांधण्यात आली होती. औरंगजेबाने भगवान श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी असलेल्या मंदिराबरोबरीनेच मोठ्या संख्येने इतर हिंदू धार्मिक स्थळे आणि मंदिरे पाडण्याचे आदेश दिले होते, असे मूळ याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मथुरा आणि कृष्ण मंदिराचा इतिहास समजून घेणे नक्कीच समयोचित ठरणारे आहे.

आणखी वाचा: Gwalior ‘city of music’: अकबरालाही संगीताच्या प्रेमात पाडणाऱ्या शहराला जागतिक ओळख; काय आहेत या शहराशी संबंधित संगीत परंपरा?

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare (1)
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले? लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी होणार? आदिती तटकरेंनी थेट पत्रकच काढलं
News About Osho
Osho : आचार्य रजनीश अर्थात ओशो कोण होते? त्यांच्या विषयीची ही रहस्यं तुम्हाला ठाऊक आहेत का?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका

ऐतिहासिक नोंदी काय सांगतात?

मथुरेतील पहिले मंदिर सुमारे २,००० वर्षांपूर्वी म्हणजेच पहिल्या शतकात बांधले गेले. ब्रजच्या मध्यभागी यमुनेच्या काठी वसलेल्या मथुरा या भागाला मौर्यांच्या काळात (इसवी सन पूर्व ४ ते २ रे शतक) व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र म्हणून महत्त्व प्राप्त झाले होते. यात्रेकरूंसाठी मथुरेतील सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे कृष्ण जन्मस्थान हे होते. इतिहासकार ए. डब्लू. एन्टविसल यांनी नोंदविल्याप्रमाणे कृष्ण जन्मस्थानावरील पहिले वैष्णव मंदिर बहुधा इसवी सन पहिल्या शतकात बांधले गेले होते आणि दुसरे भव्य मंदिर चंद्रगुप्त दुसरा (इसवी सन ४ थे शतक) याच्या कारकिर्दीत बांधले गेले होते,चंद्रगुप्त दुसरा याला विक्रमादित्य असेही म्हणतात (Braj: Centre of Krishna Pilgrimage, 1987).

आणखी वाचा: भारतीय कला-साहित्यातील देवी लक्ष्मीची बदलती प्रतिमा!

मथुरा: बौद्ध आणि जैन केंद्र

अलेक्झांडर कनिंगहॅम (१८१४-९३) हे ब्रिटीश भारताचे पहिले पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) चे संस्थापक महासंचालक होते. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे या जागी मुळात नष्ट झालेल्या बौद्ध वास्तू होत्या, नंतरच्या काळात त्याच वास्तूंच्या अवशेषांचा वापर हिंदू मंदिराच्या बांधकामासाठी करण्यात आला. या परिसरातील उत्खननात एका मोठ्या बौद्ध संकुलाचे अवशेष सापडले आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकात, कृष्ण जन्मस्थानावरील मंदिराने भारतीय उपखंडातील भक्तांना आकर्षित केले. याच कालखंडात बौद्ध आणि जैन स्थळे परिसरातच अस्तित्वात आल्याचेही दिसून येते, पहिल्या शतकाच्या अखेरीपर्यंत प्राचीन मथुरा हे प्रमुख बौद्ध आणि जैन केंद्र म्हणून प्रसिद्धीस आले होते. चिनी यात्रेकरू फा हिआन/ फॅक्सियन (इसवी सन ३३७-४२२ ) आणि ह्युएन त्सांग/ झुआनझांग (इसवी सन ६०२-६६४), आणि नंतरच्या कालखंडातील मुस्लिम इतिहासकारांनी मथुरेतील स्तूप आणि मठांचे वर्णन केलेले आहे.

आणखी वाचा: UPSC-MPSC :  ‘तांडव’ हा नृत्य प्रकार नेमका काय आहे? भारतीय शिल्पकलेत त्याचे स्वरूप कसे असते? 

…तरीही कृष्णभक्ती संपली नाही

मथुरेतील मंदिरांवर अनेक वेळा हल्ले झाले, परंतु ती नष्ट होऊ शकली नाहीत. गझनीचा महमूद (इ.स. ९९८ ते १०३०), याने ११ व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच भारतावर अनेक लुटमार- हल्ले केले. १०१७ किंवा १०१८ मध्ये, महमूद मथुरेत आला, इतिहासकार महोमद कासिम फिरिश्ता (१५७० -१६२०) याच्या ऐतिहासिक नोंदींनुसार, तो या भागात सुमारे २० दिवस राहिला. फिरिश्ता याने लिहिल्याप्रमाणे या वेळी,“लुटीमुळे झालेल्या नुकसानी व्यतिरिक्त शहराला आगीचा मोठा फटका बसला होता”. जैन आणि बौद्ध केंद्रांचा आधीच ऱ्हास झाला होता, ती महमूदच्या हल्ल्यात तग धरू शकली नाहीत. परंतु त्याच्या हल्ल्याच्या काही वर्षांनंतर या भागाला भेट देवू दिलेल्या अल-बिरुनीने या भागातील श्रीकृष्णाच्या उपासकांना वासुदेव म्हणून संबोधले जाते आणि मथुरेचा उल्लेख ब्राह्मणांची गर्दी असलेल्या भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी असा केला आहे. एकूणच त्याच्या संदर्भानुसार या भागात मंदिर अस्तित्त्वात असल्याचे कळते.

इसवी सन ११५० मधील एका संस्कृत शिलालेखात आता कटरा केशवदेव मंदिर ज्या ठिकाणी उभे आहे त्याच ठिकाणी विष्णू मंदिराचा पाया असल्याची नोंद आहे. कृष्ण जन्मस्थानातील हे मंदिर “चमकदार पांढरे आणि ढगांना स्पर्श करणारे” होते, असे शिलालेखात म्हटले आहे. हे भव्य मंदिर कालांतराने दिल्लीचा सुलतान सिकंदर लोधी (१४५८-१५१७) याने पाडले. दिल्ली सल्तनतच्या (१२०६ -१५२६) काळात दिसलेल्या विनाशाचे हे उदाहरण आहे. एन्टविसलने लिहिले की “बौद्ध, जैन आणि हिंदूंनी बांधलेली जवळपास प्रत्येक वास्तू उध्वस्त करण्यात आली किंवा आणि उध्वस्त होण्यासाठी सोडली गेली, किंवा आयकॉनोक्लास्ट मुस्लिमांनी नष्ट केली. विशेष म्हणजे या विध्वंसामुळेच या प्रदेशात वैष्णव धर्माच्या नव्या स्वरूपाचा उदय झाला. “निम्बार्क, वल्लभ आणि चैतन्य यांच्या कृष्ण भक्तीने ब्रजच्या पुनरुत्थानाला प्रेरणा दिली असे मानले जाते,” असे एन्टविसल यांनी नमूद केले आहे. दक्षिणेकडील आणि पूर्व भारतातील वैष्णव संतांनी आपल्या शिकवणीतून कृष्ण भक्तीचा प्रसार केला. आज समाजात रुजलेली वैष्णव धर्माची सामान्य समज ही याच संतांची देणगी आहे.

मुघल शासकांच्या काळात मथुरेच्या मंदिरांचे पुनरुत्थान झाले.

१५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहिम लोधीच्या पराभवामुळे मुघल राजवटीचा पाया ठिसूळ झाला. सुरुवातीच्या दशकात बाबर आणि हुमायून यांच्या नेतृत्वाखाली मुघलांच्या कमकुवत सत्तेमुळे ब्रजमधील धार्मिक कार्यात वाढ झाली. अनेक मंदिरे या भागात बांधण्यात आली, यात कोणत्याही मोठ्या मंदिराचा समावेश नव्हता. मुख्यतः आर्थिक कारणांमुळे आणि राजश्रयाच्या अभावामुळे मथुरा आणि जवळच्या वृंदावनमध्ये भगवान कृष्णाची असंख्य छोटी मंदिरे बांधण्यात आली. अकबराच्या प्रदीर्घ कारकिर्दीत (१५५६-१६०५) परिस्थिती आणखी सुधारली. इतिहासकार तारापद मुखर्जी आणि इरफान हबीब (इतरांसह) यांनी मथुरेतील विविध वैष्णव पंथांच्या मंदिरांना सम्राटाने दिलेल्या अनेक जमीन आणि महसूल अनुदानांबद्दल लिहिले आहे. (‘अकबर आणि मथुरेची मंदिरे आणि त्याचे वातावरण’, भारतीय इतिहासाची कार्यवाही काँग्रेस, १९८७).

इतर धर्मांबद्दल उदारमतवादी आणि सहिष्णू दृष्टीकोन असणारा आणि त्यांच्याबद्दल प्रचंड कुतूहल दाखवणारा अकबर किमान तीन वेळा मथुरा आणि वृंदावनला भेट देतो आणि स्वामी हरिदास (१४८३-१५७३) यांसारख्या धार्मिक व्यक्तींना भेटतो असे मानले जाते. मुघल प्रशासनातील उच्च पदांवर असलेल्या राजपूत आणि इतर हिंदूंनी नवीन मंदिरे बांधण्यास आणि जुन्या मंदिरांचे जीर्णोद्धार करण्यास मदत केली. १६१८ साली अकबराचा मुलगा जहांगीर याच्या कारकिर्दीत, मुघल साम्राज्याचे एक मांडलिक राज्य असलेल्या ओरछा राज्याचा राजपूत शासक राजा वीर सिंग देव याने मथुरेतील कटरा येथे एक भव्य मंदिर बांधले. १६५० साली मथुरेला भेट देणारा फ्रेंच प्रवासी जीन-बॅप्टिस्ट टॅव्हर्नियर याने वर्णन केलेले हे मंदिर अष्टकोनी आकाराचे होते आणि लाल वाळूच्या दगडाने बांधलेले होते. १६५० च्या उत्तरार्धात मथुरेला भेट देणारे व्हेनेशियन प्रवासी निकोलाओ मनुची यांनी लिहिले आहे की, हे मंदिर “एवढ्या उंचीचे होते की त्याचा सोन्याचे शिखर आग्रा येथूनही नजरेस पडते.”. दारा शुकोह, याने या जागेच्या नूतनीकरणाचे आदेश दिले होते, त्यामध्ये मंदिराभोवती दगडी रेलिंग बसवण्याचाही समावेश आहे.

औरंगजेब आणि धार्मिक कट्टरता

परंतु औरंगजेबाच्या आदेशाने हे मंदिर शेवटी पाडण्यात आले. शाहजहानचा वारस असलेल्या दाराला धर्मद्रोही म्हणून घोषित करण्यात आले आणि १६५९ साली औरंगजेबाने दाराला मारले. औरंगजेब हा एक कट्टर,धर्मनिष्ठ मुस्लीम होता त्याचे धार्मिक व्यक्तिमत्त्व दाराच्या अगदी विरुद्ध होते. १६६० मध्ये,औरंगजेबाने अब्दुल नबी खान याची मथुरेचा राज्यपाल म्हणून नियुक्ती केली, हा हिंदू प्रजेमध्ये अत्यंत अप्रिय होता. १६६१-६२ साली खानने सिकंदर लोधीने नष्ट केलेल्या मंदिराच्या ठिकाणी जामा मशीद बांधली. १६६६ साली केशवदेव मंदिराभोवती दारा शुकोहने बांधलेली रेलिंग त्यानेच उद्ध्वस्त केली. १६६९ साली औरंगजेबाने मुघल साम्राज्यातील सर्व हिंदू शाळा आणि मंदिरे नष्ट करण्याचा आदेश देणारा शाही फर्मान जारी केले. हे फर्मान जारी केल्यानंतर काशीतील काशी विश्वनाथ मंदिरही नष्ट करण्यात आले.

१६७० साली औरंगजेबाने मथुरेचे केशवदेव मंदिर नष्ट करण्याचे आदेश दिले आणि त्या जागी शाही इदगाह बांधण्याचे प्रायोजित केले. इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी नमूद केल्याप्रमाणे या मंदिरातील देवतांना आग्रा येथे नेण्यात आले आणि दफन करण्यात आले. ‘औरंगजेब: द मॅन अँड द मिथ’चे (२०१७)लेखक इतिहासकार ऑड्रे ट्रुशके यांनी औरंगजेबाच्या कृतींचे स्पष्टीकरण शोधण्याचा प्रयत्न केला, या स्पष्टिकरणानुसार धार्मिक असहिष्णुता आणि कट्टरता धार्मिक कारणांच्या पलीकडे होती: “मथुरेच्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना १६६६ मध्ये आग्राहून सुटण्यास मदत केली असावी. शिवाय,औरंगजेबाचा (सिंहासनाचा) प्रमुख प्रतिस्पर्धी दारा शुकोह याने केशव देवाच्या मंदिराला संरक्षण दिले होते. त्यानंतर लगेचच, १६६९ आणि १६७० मध्ये या प्रदेशात जाटांनी केलेल्या उठावामुळे मुघलांना प्रचंड जीवितहानी सोसावी लागली होती.

स्वातंत्र्यानंतर बांधली गेलेली मथुरेतील प्रमुख मंदिरे.

१८०३ सालापर्यंत, मथुरा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली गेले. १८१५ साली कंपनीने कटरा केशवदेव येथील १३.३७ एकर जमिनीचा लिलाव वाराणसीतील एक श्रीमंत बँकर राजा पटनिमल यांना केला. हाच जमिनीचा तुकडा सध्या सुरू असलेल्या खटल्याचा विषय आहे, हिंदूच्या बाजूने दावा करण्यात आला आहे की, या जमिनीत शाही इदगाह मशिदीचा समावेश आहे, तर मुस्लीम बाजूने याला विरोध केला जात आहे. राजा पटनिमल यांना या ठिकाणी मंदिर बांधायचे होते, परंतु निधीच्या कमतरतेमुळे ते टळले. त्यानंतर, त्यांच्या वंशजांकडून जमिनीशी संबंधित अनेक खटले दाखल केले गेले. १९४४ साली उद्योगपती जुगल किशोर बिर्ला यांना ही जमीन विकण्यात आली, त्यांनी १९५१ मध्ये या जागेवर मंदिर बांधण्यासाठी श्री कृष्ण जन्मभूमी ट्रस्टची स्थापना केली. १९५३ मध्ये या मंदिराचे बांधकाम सुरू झाले. भारतातील उद्योगपती आणि व्यावसायिक कुटुंबांनी या मंदिराच्या बांधकामासाठी निधी दिला. शाही इदगाह मशिदीला लागून असलेल्या या मंदिराचे बांधकाम १९८३ मध्ये पूर्ण झाले होते. आता पुन्हा एकदा या मंदिरासंदर्भातील वाद चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Story img Loader