निवडणुकीत आकर्षक घोषणा, त्या आधारे प्रचार करत मतदारांना आपल्याकडे वळवण्यात राजकीय पक्षांचे कौशल्य असते. सध्याच्या समाजमाध्यमांचा प्रभाव असलेल्या काळात तर आकर्षक घोषणांना महत्त्व अधिकच. भारतीय जनता पक्षाचा निवडणूक प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेभोवती केंद्रित आहे. यापूर्वी भाजपने प्रचारात, ‘मोदी है तो मुमकीन है’, ‘फिर एक बार मोदी सरकार’ ही घोषवाक्ये मतदारांपुढे ठेवले. आता ‘अबकी बार चारसौ पार, तिसरी बार मोदी सरकार’ हे नवे घोषवाक्य २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने केले आहे. भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये रणनीती ठरवण्यात आली.
चारशे जागा कशा शक्य?
लोकसभेच्या ५४३ जागा असून, त्यापैकी पावणेदोनशे जागांवर यात सात ते आठ राज्यांत भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना आहे. यामध्ये प्रामुख्याने मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड ही राज्ये येतात. मात्र दक्षिणेकडील जवळपास १०० जागांवर भाजपचे फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे ४४३ पैकी ४०० जागा भाजप जिंकेल हे लक्ष्य थोडे कठीण आहे. बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या तीन राज्यांत भाजपला कडवी झुंज मिळेल. देशभरात प्रामुख्याने भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात इंडिया आघाडी असा सामना आहे. याला अपवाद ओडिशा, आंध्र प्रदेश तसेच केरळचा आहे. ओडिशा तसेच आंध्रमध्ये अनुक्रमे बिजु जनता दल तसेच वायएसआर काँग्रेस प्रभावी ठरतील. केरळमध्ये सत्तारूढ डावी आघाडी विरोधात काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी असा इंडिया आघाडीतील मित्रपक्षांमध्येच सामना होईल. भाजपला निव्वळ उत्तर प्रदेश तसेच पश्चिमेकडील राज्यांच्या बळावर चारशे जागांचा टप्पा गाठणे कितपत शक्य होईल, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र निवडणुकीत चटपटीत घोषणा देऊन विरोधकांना त्यांच्या जागावाटपापूर्वीच शह देण्याची भाजपची ही खेळी आहे.
हेही वाचा : सुवर्णपदक धावपटू ऑस्कर पिस्टोरियसला पॅरोल मंजूर, तुरुंगाबाहेर येण्यासाठी नेमक्या कोणत्या अटी?
संघटनेवर भिस्त
नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला. दोन दशके सत्तेत असल्याने जनतेत काही प्रमाणात नाराजी असल्याचे चित्र निर्माण झाले असते. तरीही भाजपने बाजी मारली, याचे गमक भक्कम पक्षसंघटनेत आहे. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार हे निवडणूक लढत होते तर भाजपची संघटना रिंगणात होती असे निकालानंतर काही तज्ज्ञांनी याचे विश्लेषण केले. थोडक्यात भाजपची जी अभेद्य अशी पक्ष संघटना आहे त्याचे हे यश आहे. गेल्या दहा वर्षांत निवडणूक जिंकण्यासाठी जी पूरक पक्षसंघटना तयार त्याला मध्य प्रदेशच्या विजयाचे श्रेय जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्येक राज्यातील छोट्या जातींचा तपशील ध्यानात घेऊन आखणी केली. ज्या समुदायांना आजपर्यंत प्रतिनिधित्व मिळाले नाही, त्यांना संधी दिली. हिंदी भाषिक पट्ट्यात या सूत्राला यश मिळाले. याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराच्या विविध संघटनांची मिळालेली साथ यामुळे भाजपची पक्ष संघटना भक्कम झाली. अर्थात भाजपला नेहमीच यश मिळाले असे नाही, पश्चिम बंगाल, कर्नाटक, हिमाचल प्रदेशात त्यांना मतदारांनी त्यांना नाकारले. तरीही भाजपने प्रयत्न सुरूच ठेवले. पंचायतीपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजप प्रचाराची राळ उडवून देतो, ज्येष्ठ नेत्यांना उतरवतो हे दिसून आले. आताही लोकसभेसाठी भाजपने जोरदार तयारी चालवली आहे.
हिंदुत्वाशी निगडित मुद्दे
अयोध्येत २२ जानेवारी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. आगामी निवडणुकीत हा एक प्रमुख मुद्दा असेल. याखेरीज अनुच्छेद ३७० रद्द करणे तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) निवडणुकीपूर्वी लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कायद्यानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या पाकिस्तान, बांगलादेश तसेच अफगाणिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिस्ती तसेच पारशींना भारताचे नागरिकत्व देण्यात येणार आहे. हे मुद्दे भाजपच्या विचारधारेशी सुसंगत आहेत. त्याच्या आधारे प्रचारात रण माजवले जाईल असे दिसते. विरोधकांना या मुद्द्याला तोंड देताना कठीण जाईल. विरोध करावा तर, हिंदूविरोधी शिक्का बसेल, मतदानातून त्याचा फटका बसेल याची धास्ती आहे. हे मुद्दे २०२४ च्या केंद्रस्थानी असतील त्याच्या आधारेच ४०० जागांचे लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न असेल.
पायाभूत सुविधा, कल्याणकारी योजना
गेल्या नऊ वर्षांत पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात कामे झाली. तसेच केंद्र तसेच राज्य सरकारांच्या कल्याणकारी योजनांमधून लाभार्थी वर्ग निर्माण झाला आहे. भाजपची ‘चारसौ पार’साठी यावरही भिस्त आहे. याखेरीज आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा तसेच देशाचे स्थान हा जिव्हाळ्याचा विषय आहे. या मुद्द्यावर विरोधक बचावात्मक आहेत. यासाठी प्रचारात महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांना बगल देत भाजप या सकारात्मक ठसठशीतपणे पुढे आणतेय. त्यासाठी एकेका नेत्याला तीन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार पुढील दोन-तीन महिन्यांत हे दौरे होतील. गेल्या वर्षीच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी दीडशे जागांची घोषणा केली होती. राज्यातील १८३ पैकी १५० जागांचे लक्ष्य थोडे अशक्यप्राय वाटत होते. प्रचारात खुद्द पंतप्रधानांनीच ‘भूपेंद्र नरेंद्रचा विक्रम मोडेल यासाठी नरेंद्र अपार मेहनत करेल’ असे वक्तव्य केले होते. येथे संदर्भ गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा आहे. राज्यात भाजपने १५० जागांचा टप्पा पार करत माधवसिंह सोळंकी यांचा जागांचा विक्रम मोडला होता.
‘या’ विक्रमांच्या पाठलागावर…
सन १९८४ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काँग्रेस पक्षाला चारशेच्या वर जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उठलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा काँग्रेसला झाला होता. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सलग तीनदा लोकसभा निवडणूक जिंकली होती. भाजपचे लक्ष्य या विक्रमांवर आहे. त्यामुळेच चारशे जागांची घोषणा भाजपने दिली आहे.
hrishikesh.deshpande@expressindia.com