संतोष प्रधान

राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) तमिळनाडूतून २५ खासदारांचे पाठबळ मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच व्यक्त केली. नवीन लोकसभेत ऐतिहासिक राजदंड (सेन्गाॅल) बसविल्याबद्दल तमीळ जनतेने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देऊन पंतप्रधान मोदी यांचे आभार मानावेत, असे आवाहनही शहा यांनी केले. तमिळ‌नाडूत भाजप अजूनही चाचपडत आहे. केंद्र सरकार व भाजप तमीळ जनतेची मने जिंकण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्याला कितपत यश मिळेल याबद्दल वेगवेगळे तर्क वर्तविले जातात.

Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?
maharashtra assembly election 2024 amol kolhe allegations bjp for online cash payment to voters
भोसरीत भाजपकडून ‘ऑनलाइन लक्ष्मी दर्शन’?, कोणी केला हा गंभीर आरोप
bjp expels rebel candidates in amravati
कारवाईची कुऱ्हाड, अमरावती जिल्ह्यातील बंडखोर उमेदवारांची भाजपातून हकालपट्टी

तमिळनाडूतील राजकीय परिस्थिती कशी आहे?

तमिळनाडूत १९६७ पासून कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला राज्याची सत्ता मिळू शकलेली नाही. तेव्हापासून द्रमुक वा अण्णा द्रमुक हे दोन प्रादेशिक पक्ष सत्तेत आहेत. काँग्रेस देशात मजबूत असताना तमिळनाडूत मात्र या पक्षाला नेहमीच द्रमुक किंवा अण्णा द्रमुकची मदत घ्यावी लागत असे. भाजपने दक्षिण भारतात आपली ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात तमिळनाडूवर लक्ष केंद्रित केले आहे. जयललिता यांच्या पश्चात अण्णा द्रमुक पक्ष कमकुवत झाल्याने ही जागा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सध्या द्रमुक सत्तेत असून, अण्णा द्रमुक विरोधी पक्षात आहे.

तमिळनाडूत ताकद वाढविण्यासाठी भाजपचे कोणकोणते प्रयोग सुरू आहेत?

तमिळनाडूतील राजकारण हे मुख्यत्वे द्रविड संस्कृतीवर आधारित आहे. तर भाजप किंवा संघ परिवाराची विचारधारा वेगळी आहे. तमिळनाडूतील तरुणांना आकर्षित करण्यावर भाजपचा मुख्यत्वे भर आहे. याचाच भाग म्हणून गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघात काशी तमीळ संगम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुमारे महिनाभर चाललेल्या या कार्यक्रमासाठी तमिळनाडूमधून सुमारे २५ हजार लोकांना काशीची सहल घडवून आणण्यात आली होती. काशी आणि तमीळ संस्कृतीची त्यासाठी जोड देण्यात आली. याशिवाय गुजरातमध्ये असाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संसदेच्या नवीन इमारतीमध्ये चोला राजवटीच्या काळातील ऐतिहासिक राजदंड बसविण्यात आला. तमीळ जनतेला आपलेसे करण्याचा मोदी यांचा प्रयत्न होता. याशिवाय संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्गाटनाला तमिळनाडूतील २० साधूंना पाचारण करण्यात आले होते. राजदंड बसविण्यात आल्यावर त्यांना विशेष महत्त्व देण्यात आले.

अतिश्रीमंत व्यक्ती २०२३ मध्ये भारत सोडून जाण्याचा अंदाज; अब्जाधीश देशातून स्थलांतर का करतात?

भाजपला प्रतिकूल ठरणारे मुद्दे कोणते?

तमिळनाडूतील द्रमुक वा अण्णा द्रमुकचे राजकारण विशेषत: हिंदीविरोधी मुद्द्यावर केंद्रित असते. केंद्राने हिंदी लादण्याचा जरा जरी प्रयत्न केला तरी तमिळनाडूतील सर्व राजकीय पक्ष एकत्र येतात. नवीन शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्राला तमिळनाडूतूनच विरोध झाला. वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या ‘नीट’ परीक्षेला तमिळनाडूतील सर्व पक्षांचा विरोध असतो. ‘कर्ड’चे दही किंवा ऑल इंडिया रडिओचे आकाशवाणी नामकरण करण्यास अलीकडेच विरोध झाला. भाजप किंवा संघ परिवाराचा भर हा ‘हिंदी, हिंदू आणि हिंदुस्थानी’वर असतो. नेमके हेच मुद्दे तमीळ जनता स्वीकारत नाही. हिंदी विरोधावर द्रमुक किंवा अण्णा द्रमुकच्या राजकारणाचा गाभा आहे. भाजपने अण्णा द्रमुकशी युती करून पक्ष वाढविण्याचा प्रयत्न केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकबरोबरील युतीत चार जागा मिळाल्या होत्या.

भाजप स्वबळावर की युतीत निवडणुका लढवेल?

अण्णा द्रमुकशी भाजपचे संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीत. तमिळनाडू भाजपच्या अध्यक्षांनी माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर भ्रष्टाचाराच्या संदर्भात केलेल्या काही वादग्रस्त विधानांमुळे अण्णा द्रमुकच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. भाजपशी हातमिळवणी केल्याने अल्पसंख्याक मतांवर परिणाम होतो हे अण्णा द्रमुकच्या नेत्यांच्या निदर्शनास आले आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन आणि भाजपचे फारसे सख्य नाही. द्रमुक सरकारची कोंडी करण्याचा केंद्रातील भाजपचा प्रयत्न असतो. ‘ईडी’ने नुकतेच द्रमुक सरकारमधील मंत्र्याला अटक केल्याने संबंध अधिक ताणले गेले आहेत. स्टॅलिन यांच्या पुत्राशी संबंधित मालमत्तेवर मध्यंतरी टाच आणण्यात आली होती. द्रमुक विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.

@sanpradhan

santosh.pradhan@expressindia.com