भाजप नेते हर्षवर्धन शहाजी पाटील हे नाराज असल्याचे वृत्त येत आहे. सलग चार वेळा मंत्रीपद भूषवलेले हर्षवर्धन यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. यामुळे महायुतीची कोंडी झाली. सध्या या ठिकाणी अजित पवार गटाचे दत्ता भरणे हे विद्यमान आमदार आहेत. ज्याचा विद्यमान आमदार त्याच्याकडे ती जागा हा न्याय जागावाटपात लावला तर, हर्षवर्धन पाटील यांना महायुतीतून संधी मिळणे कठीण आहे. त्यामुळे ६१ वर्षीय पाटील यांनी लवकरच निर्णय घेण्याचे संकेत देत वेगळी वाट चोखाळण्याचा इरादा स्पष्ट केला.

हर्षवर्धन पाटील यांचे महत्त्व

ज्येष्ठ नेते तसेच माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांचे हर्षवर्धन हे पुतणे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर हे त्यांचे कार्यक्षेत्र. १९९५ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्यावर हर्षवर्धन प्रथम मंत्री झाले. त्यावेळी युती शासनात त्यांना संधी मिळाली. तेथून त्यांची कारकीर्द बहरली. युतीच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा स्नेह निर्माण झाला. अपक्ष आमदारांचे नेते म्हणूनच त्यांची ओळख होती. पुन्हा १९९९ मध्ये इंदापूरमधून ते अपक्ष म्हणून विजयी होत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. सरकार कोणाचेही असो हर्षवर्धन पाटील यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडतेच अशी चर्चा त्यावेळी सुरू झाली. त्यांचे सर्वांशी असलेले संबंध कामी आले. एखाद्या वर्षाचा अपवाद वगळता जवळपास वीस वर्षे हर्षवर्धन यांच्याकडे मंत्रीपद होते. पुढे २००४ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. मात्र यावेळी सुरुवातीला राष्ट्रवादीच्या विरोधामुळे त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. नंतर त्यांना संधी मिळाली. पुढे २००९मध्ये काँग्रेसकडून ते विधानसभेवर विजयी झाले. त्यांना सहकार तसेच संसदीय कामकाज ही खाती मिळाली. मात्र याच काळात काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्ष निर्माण झाला. पुढे २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे यांनी त्यांना पराभूत केले. तर सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र भाजपकडून इंदापूर मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. प्रदेश पातळीवरील भाजपचे नेते अशी त्यांची ओळख असली, तरी मतदारसंघाबाहेर समर्थक आमदार निवडून आणण्यात त्यांना यश आले नाही असा आक्षेप त्यांचे विरोधक घेतात. तसेच राज्यातही त्यांना मानणारे कार्यकर्ते फार नाहीत अशीही एक टीका होते.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?

हेही वाचा : विश्लेषण : प्रबळ शत्रूंनाही युद्धविराम करायला लावणारा पोलिओ… गाझात युद्धापेक्षाही पोलिओचे संकट भयावह?

सहकारात कार्य

पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्राच्या आधारे राजकारण मोठ्या प्रमाणात होते. साखर कारखाने, बँक, सहकारी सोसायटी यावर समर्थकांचे प्राबल्य असले की, शेतकरी तसेच या संस्थांच्या माध्यमातून ताकदीच्या जोरावर मते मिळतात असा साधा हिशेब. हर्षवर्धन यांच्या ताब्यात सध्या चार साखर कारखाने आहेत. याखेरीज स्थानिक पातळीवरील काही सहकारी संस्थांवर त्यांच्या समर्थकांची सत्ता आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी यावर्षी फेब्रुवारीत त्यांची निवड करण्यात आली. कारखान्यांना केंद्राकडून मदत तसेच मार्गदर्शन करणे या दृष्टीने या पदाचे महत्त्व आहे. हर्षवर्धन यांनी पक्षांतर केलेच तर मग या पदाचे काय, हा मुद्दा आहे. तसेच केंद्रात सलग तिसऱ्यांदा आता भाजपची सत्ता आली आहे. केंद्रात सहकार खातेही आहे. साखर कारखानदारीबाबत महत्त्वाची धोरणे या खात्याकडून ठरणार. अशा वेळी या गोष्टीकडे काणाडोळा करून हर्षवर्धन विधानसभेच्या जागेसाठी पक्षांतर करणार का, हा एक मुद्दा आहे.

हेही वाचा : कर्नाटकच्या कोप्पलमध्ये हिंदू धार्मिक चिन्हे असलेला लॅम्प पोस्ट काढण्याचा आदेश का ठरतोय वादग्रस्त?

जागावाटपात रस्सीखेच

महायुतीत तीन पक्षांत विधानसभेच्या प्रत्येक जागेसाठी तीव्र स्पर्धा आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह प्रत्येक जागेवर संबंधित पक्षाच्या नेत्यांना आहे. मात्र एकत्रित निवडणूक लढवायची म्हटल्यावर तडजोड करावी लागणार. इंदापूर मतदारसंघाबाबत ज्याचा विद्यमान आमदार त्याला मतदारसंघ हा निकष लावल्यावर ती जागा अजित पवार गटाकडे जाणार हे उघड आहे. यातून हर्षवर्धन पाटील अस्वस्थ असल्याचे मानले जाते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याचे हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. त्याला भाजप नेत्यांच्या विधानाची किनार आहे. पक्ष सोडण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसताना, राज्यातील नेत्यांनी आपल्याबाबत अशी विधाने कशी केली, असा पाटील यांचा सवाल आहे. बावडा या त्यांच्या गावी हर्षवर्धन यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र इंदापूरमधील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांचा पुढचा मार्ग सोपा नाही. कारण शरद पवार गटात प्रवेश जरी केला तरी तेथेही मूळचे अनेक दिग्गज नेते इंदापुरातून इच्छुक आहेत. अशा वेळी पक्ष त्यांना दुखावण्याचा धोका पत्करणार नाही. त्यामुळे आता भाजप याबाबत हर्षवर्धन यांची मनधरणी करणार का, हा प्रश्न आहे.

hrishikesh.deshpande@expressindia.com

Story img Loader