समाज माध्यमांचा वापर आपल्या प्रचारासाठी करणे ही गोष्ट आता काही नवीन राहिलेली नाही. विशेषत: २०१४ च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने सत्तेत येण्यासाठी समाज माध्यमांचा वापर मोठ्या खुबीने केला होता. त्यावेळेला इतर कोणतेच पक्ष समाज माध्यमावर प्रचार करण्यासाठीची यंत्रणा स्वत:जवळ बाळगून नव्हते. मात्र, भाजपाकडे तेव्हापासूनच ‘आयटी सेल’ अस्तित्वात होती. त्यानंतर मग समाज माध्यमांच्या प्रभावाचे महत्त्व ओळखून इतरही पक्षांनी यावरील आपली ताकद मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले. सध्या समाज माध्यमांवर ‘इन्फ्लूएन्सर्स’ची चलती आहे. यांना फॉलो करणाऱ्या लोकांची संख्या लाखोंमध्ये असते. त्यामुळे त्यांच्या तीस सेकंदांच्या रिललाही मोठे महत्त्व असते. आता समाज माध्यमांवरील हेच ‘इन्फ्लूएन्सर्स’ निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी राजकीय पक्षांचं प्रमुख अस्त्र ठरत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. याचे कारणही तसेच आहे. कारण विविध राजकीय पक्ष त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहेच. शिवाय अलीकडेच देशभरातील इन्फ्लूएन्सर्सना दिल्लीत गौरवण्यात आलं होतं. केंद्र सरकारनेच या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सरकारकडूनच देशातील मोजक्या इन्फ्लूएन्सर्सना ‘नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड्स’ देण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा