Sambit Patra Statement: सध्या ओडिशात सुरु असलेल्या लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी रणांगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचार सभांदरम्यान एक मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. तो म्हणजे जगन्नाथ पुरी मंदिरातील रत्नभांडाराचा. १२ व्या शतकात बांधण्यात आलेल्या मंदिराला गेले अनेक शतकांचा इतिहास आहे. या कालखंडात अनेक राजे-राजवाड्यांनी दान दिलेले दागिने रत्नभांडारात ठेवण्यात आले आहेत. दोन दालनात विभागलेल्या रत्नभांडारातील बाहेरचे दालन रथयात्रेच्या निमित्ताने नेहमीच उघडण्यात येते. परंतु आतले दालन मात्र गेल्या ३८ वर्षांपासून उघडण्यात आलेले नाही. या दालनातील मौल्यवान ऐवज चोरीला जात असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. इतकेच नाही तर आज भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी तर थेट ‘भगवान जगन्नाथच पंतप्रधान मोदी यांचे भक्त’ असा उल्लेख केला. यावर टीकेची झोड उठल्यानंतर पात्रा यांनी माफीही मागितली. त्याच पार्श्वभूमीवर जगन्नाथ पंथ कसा उदयास आला हे जाणून घेणे रंजक ठरावे.  

अधिक वाचा: हिंदू पुराणातील ‘वासुकी’ तो हाच का? गुजरातमध्ये सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; का आहे हे संशोधन महत्त्वाचे?

industrial production
औद्योगिक उत्पादन दर ऑक्टोबरमध्ये मंदावून ३.५ टक्क्यांवर सीमित
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
जगन्नाथ मंदिराचे रेखाचित्र, १८७७ (सौजन्य: विकिपीडिया)

आदिवासी प्रथा आणि जगन्नाथ स्वामी

भारतातील आदिवासी लोकसंख्येमध्ये ओडिशा तिसऱ्या क्रमांकावर आहे. इथल्या आदिवासी लोकसंख्येचा ओडिया संस्कृतीवर खोलवर प्रभाव आहे. इतकेच नाही तर त्यांनी मूळ प्रवाहातल्या लोकांसोबतही एक सातत्य निर्माण केले आहे. ही अखंडता दर्शवणारे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे स्वतः जगन्नाथ स्वामी. मानववंशशास्त्र अभ्यासक आणि पुरातत्त्व अभ्यासकांच्या मते जगन्नाथ स्वामी हे सबरा नावाच्या आदिवासी वर्गाशी संबंधित आहेत. कडुनिंबाच्या झाडाच्या लाकडात जगन्नाथ पुजण्याची एक प्रथा आहे. या प्रथेचा संबंध सामान्यत: आदिवासींच्या मूर्तीपूजनाशी आहे.

अधिक वाचा: स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?

सिंहद्वार, १८७० (सौजन्य: विकिपीडिया)

नवकलेबर आणि ब्राह्मणेतर पुरोहित

दैतस नावाचा ब्राह्मणेतर पुरोहितांचा वर्ग या प्रथेशी संबंधित आहे. या प्रथेला नवकलेबर  म्हणतात. ॲन्चार्लोट एश्मन यांनी याविषयी एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. त्यांनी म्हटले आहे की, नवकलेबर समारंभ म्हणजेच देवतेचा नियतकालिक नूतनीकरण समारंभ. ही एक आदिवासी प्रथा आहे (संदर्भ: Hinduization of Tribal Deities in Orissa: The Śākta and Śaiva Typology; Anncharlot Eschmann, 1978). या प्रथेत सोरस आणि खोंड सारख्या जमातींमध्ये देवतेच्या लाकडी मूर्तींचे नूतनीकरण केले जाते, असा संदर्भ ए. सी. प्रधान यांच्या अ स्टडी ऑफ हिस्टरी ऑफ ओरिसा, २०१५ या शोधनिबंधात सापडतो. त्यामुळेच भगवान जगन्नाथाच्या पंथाचे मूळ आदिवासी समाजात असल्याचे अभ्यासक मानतात.

पुरुषोत्तम ते जगन्नाथ

एश्मन असा युक्तिवाद करतात की, जगन्नाथ हे नृसिंह म्हणून ओळखले जात होते. तिसऱ्या शतकातील अप्रकाशित संस्कृत हस्तलिखित विष्णूधर्मानुसार, कृष्णाला ओद्रदेश (ओडिशाचे शास्त्रीय नाव) मध्ये पुरुषोत्तम म्हणून संबोधले गेले. सातव्या शतकातील वामन पुराणामध्ये पुरी येथील पुरुषोत्तम देवतेच्या पूजेचा उल्लेख आहे. या भागावर शैव धर्माचाही काही प्रभाव आहे. जगन्नाथ हे एकपाद भैरवाशी साम्य दर्शवितात, ज्याची उपासना भौमाच्या काळात प्रचलित होती. रामानुज, आदि शंकराचार्य, चैतन्य महाप्रभू इत्यादींनी वैष्णव धर्माचा प्रसार केल्यामुळे जगन्नाथ वैष्णव धर्मात लोकप्रिय झाली.

बौद्ध परंपरा आणि पुरीचा जगन्नाथ

बौद्ध परंपरा सांगतात की, जगन्नाथाच्या प्रतिमेमध्ये बुद्धाच्या दातांचे अवशेष आहेत. दथवंश खेमानुसार, बुद्धाच्या शिष्यांपैकी एकाने बुद्धाच्या अस्थी कुंडातून दातांचे अवशेष घेतले आणि दंतापुरातील कलिंगाचा राजा ब्रम्हदत्त याला दिले. जगन्नाथ, बलभद्र, शुभद्र ही बुद्ध संघाची प्रतीकं आहेत. कैवल्य म्हणजेच प्रत्येकाची जात विचारात न घेता पवित्र अन्न देणे हा बौद्ध धम्माचा प्रभाव असल्याचा संदर्भ निशांत सिंग यांनी जगन्नाथ कल्ट या त्यांच्या शोध निबंधात दिला आहे. १५ व्या शतकातील कवयित्री सरला दास यांनी लिहिले आहे की, “मानवजातीचा उद्धार करण्यासाठी जगन्नाथाने स्वतःला बुद्धाच्या रूपात प्रकट केले आहे”. जगन्नाथ दासांच्या ‘दारू ब्रम्हगीते’त म्हटले आहे की “बुद्धाचे रूप धारण करण्यासाठी भगवानांनी आपले हात आणि पाय सोडून दिले”.

अधिक वाचा: महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?

रथयात्रा उत्सव, जेम्स फर्ग्युसन यांचे चित्र (सौजन्य: विकिपीडिया)

महाभारताशी संबंध

ब्रह्मपुराणातील संदर्भानुसार महाभारताच्या युद्धानंतर अनावधानाने एका शिकाऱ्याचा बाण श्रीकृष्णाला लागला आणि त्यातच कृष्णअवतार कार्य संपुष्टात आले. श्रीकृष्णाचे शरीर लाकडात परिवर्तित झाले आणि ते तरंगत पुरीच्या किनाऱ्यावर पोहोचले. ते लाकडी शरीर राजा इंद्रयुम्नान याने आपल्याकडे घेऊन विश्वकर्म्याला त्यातून तीन मूर्ती कोरण्याची विनंती केली. विश्वकर्म्याने २१ दिवस कोणीही त्याच्या कामात व्यत्यय आणणार नाही या अटीवर तयारी दर्शवली. परंतु, १५ दिवस झाले तरी विश्वकर्मा काहीच आवाज देत नाही म्हणून राणी गुंडीचाच्या आग्रहास्तव, राजा आणि त्याचे कर्मचारी विश्वकर्माच्या कार्यशाळेत गेले. राजाने करारभंग केल्याने विश्वकर्म्याने काम अर्धवट सोडले आणि जगन्नाथाची मूर्ती हाता- पायांशिवाय अपूर्ण राहिली.

साम्राज्यांद्वारे जगन्नाथ पंथाची उत्क्रांती

जगन्नाथ आणि पुरी मंदिराचा स्थानिक लोकसंख्येवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे तेथील राजकीय शक्तीला ही त्यापुढे झुकावेच लागते. दक्षिणेतील गंगा साम्राज्याचा संस्थापक चोडगंगा हा शैव होता, त्याने जगन्नाथ मंदिर बांधले. अनंगभीमा तिसऱ्याने आपल्या साम्राज्याला पुरुषोत्तम साम्राज्य म्हटले आणि राऊत (प्रतिनिधी) ही पदवी घेतली. कपिलेंद्रदेवाने जगन्नाथाच्या नावाने आपला कारभार चालवला. सलाबेगा, १७ व्या शतकातील कवी, मुस्लिम सुभेदाराचा मुलगा, जगन्नाथाचा महान भक्त होता. आदी शंकराचार्यांनी पुरीला भेट देताना लिहिले होते की, भगवान जगन्नाथ हे दयाळू आहेत आणि ते काळ्या पावसाच्या ढगांच्या रांगेसारखे सुंदर आहेत. ते लक्ष्मी आणि सरस्वतीसाठी आनंदाचे भांडार आहेत आणि त्यांचा चेहरा निष्कलंक फुललेल्या कमळासारखा आहे. देवता आणि ऋषींमध्ये त्यांची पूजा केली जाते आणि उपनिषदांमध्ये त्यांचा महिमा गायला जातो (श्री जगन्नाथ अष्टकम, ४). एकुणातच जगन्नाथ हे भारतीय परंपरांच्या सातत्य आणि एकतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे! एरवी जगन्नाथ यात्रेच्या वेळेस जगन्नाथ आणि पुरी नेहमी चर्चेत असतात. पण यंदा ओडिशातील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने संबित पात्रा यांनी एक वादग्रस्त विधान केले आणि भगवान जगन्नाथ पुन्हा चर्चेत आले.

Story img Loader