कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण दिवसेंदिवस वातावरणात वाढत आहे. परिणामस्वरूपी संपूर्ण जगाला हवामान बदलाचा सामना करावा लागत आहे. हवामानात सातत्याने होणार्‍या बदलांचा एकूण मानवी जीवनावर लक्षणीयरीत्या परिणाम होत आहे. ब्रिटनही हवामान बदलामुळे त्रस्त आहे. ब्रिटनला हवामान बदलाचे संकट सोडवायचे आहे आणि त्यासाठी या देशाने समुद्राखाली कार्बन डाय-ऑक्साइड साठविण्याच्या योजनेला पाठिंबा दिला आहे. ब्रिटनचा नवीन मजूर पक्ष कार्बन कॅप्चर प्रकल्पासाठी पुढील दोन दशकांमध्ये अब्जावधी डॉलर्स खर्च करणार आहे. परंतु, काही हवामान कार्यकर्ते साशंक आहेत की, हे तंत्रज्ञान हवामान संकट सोडवू शकते. नेमकी ही योजना काय आहे? समुद्राखाली कार्बन डाय-ऑक्साइड साठविल्यास नक्की काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊ.

प्रकल्पाला येणार २८ अब्ज डॉलर्सचा खर्च

‘द न्यूयॉर्क टाइम्स’नुसार, ब्रिटन टीसाइड आणि लिव्हरपूलमध्ये प्लांट्स उभारण्याची योजना आखत आहे. सरकारने पुढील २५ वर्षांत या प्रकल्पासाठी २८ अब्ज डॉलर्स खर्च करणार असल्याची माहिती दिली आहे. ‘बीबीसी’च्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प दरवर्षी वातावरणातून ८.५ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन काढून टाकण्यास मदत करील. २०२८ पासून ब्रिटन कार्बन साठविण्यास सुरुवात करेल. या प्रकल्पात दोन वाहतूक आणि साठवण नेटवर्कचाही समावेश असेल, जे कार्बन लिव्हरपूल उपसागर आणि उत्तर समुद्रात वाहून नेतील. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’नुसार, सरकारचा दावा आहे की, त्यांची योजना चार हजार नोकऱ्या निर्माण करील. वृत्तात असेही म्हटले आहे की, कार्बन कॅप्चर प्रकल्प खासगी गुंतवणूकदारांना आकर्षित करील तसेच ब्रिटनला त्याचे हवामान उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करील.

Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
Kalammawadi dam, Satej Patil, leakage of Kalammawadi dam, Kalammawadi dam news,
काळम्मावाडी धरणाच्या गळतीवर तातडीने उपाययोजना करावी, सतेज पाटील यांची मागणी
Ganesh Naik Minister post , Navi Mumbai water,
गणेश नाईकांच्या मंत्रिपदामुळे शहराला वाढीव पाण्याची आस, बारवी धरणाचे पाणी मिळण्याची आशा बळावली
Survey of wetlands in Maharashtra State National Centre for Sustainable Coastal Management Report thane news
५६४ पाणथळींचे भवितव्य नव्या सरकारच्या हाती!
हवामान बदलाचा धोका कमी करणे, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : जगातील सर्वांत घातक विषाणूमुळे आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू; काय आहे मारबर्ग व्हायरस? त्याची लक्षणं काय?

काही जण या प्रकल्पाबाबत आशावादी आहेत. ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूट फॉर एनर्जी स्टडीज या संशोधन गटाचे संचालक बसम फत्तौह यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले की, हे सरकार वचनबद्ध आहे. एनर्जी यूकेच्या मुख्य कार्यकारी एम्मा पिंचबेक यांनी ‘बीबीसी’ला सांगितले की, कार्बन कॅप्चर फार महत्त्वाचे आहे. हवामान बदलाचा धोका कमी करणे, हा यामागील आमचा मुख्य उद्देश आहे. हवामान बदल समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स रिचर्डसन म्हणाले, “या मोठ्या प्रकल्पांसाठी किती खासगी गुंतवणूकदारांकडून किती निधी येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.” ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर म्हणाले, “आजच्या घोषणेमुळे उद्योगाला आवश्यक असलेली निश्चितता मिळेल.” ते म्हणाले, या योजनेमुळे नोकर्‍या वाढतील, देशाची आर्थिक स्थिती सुधारेल आणि आमच्या औद्योगिक केंद्रे पुन्हा प्रज्वलित होतील.

नॉर्वेमध्येही अशाच प्रकल्पाचे उद्घाटन

अशा प्रकल्पाला मंजुरी देणारा ब्रिटन एकटा नाही. गुरुवारी, नॉर्वेने कार्बन डाय-ऑक्साइडसाठी समुद्राखालील व्हॉल्टच्या गेटवेचे उद्घाटन केले. नॉर्दर्न लाइट्स प्रकल्पाची योजना आहे की युरोपमधील फॅक्टरी स्मोकस्टॅक्समध्ये जमा असलेला कार्बन डाय-ऑक्साइड समुद्रतळाखालील भूवैज्ञानिक जलाशयांमध्ये इंजेक्ट केला जाईल. उत्सर्जन वातावरणात सोडले जाण्यापासून रोखणे आणि त्याद्वारे हवामान बदल थांबविण्यास मदत करणे हा यामागचा उद्देश आहे. ओयगार्डन बेटावर गुरुवारी उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर बांधलेल्या टर्मिनलच्या उद्घाटनासह १२ साठवण टक्यांचेही उद्घाटन करण्यात आले आहे. ११० किलोमीटरचा प्रवास करून द्रवरूप कार्बन डाय-ऑक्साइड सुमारे २.६ किलोमीटर खोलीवर समुद्रतळात कायमस्वरूपी साठवले जाईल. २०२५ पासून याची सुरुवात होईल, अशी माहिती आहे. त्याची प्रारंभिक क्षमता प्रतिवर्षी १.५ दशलक्ष टन कार्बन डाय-ऑक्साइड साठवण्याची असेल, जी दुसऱ्या टप्प्यात पाच दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्यात येईल.

नॉर्वेने कार्बन डाय-ऑक्साइडसाठी समुद्राखालील व्हॉल्टच्या गेटवेचे उद्घाटन केले. (छायाचित्र-रॉयटर्स)

व्यवस्थापकीय संचालक टिम हेजन यांनी ‘एएफपी’ला सांगितले की, हे एक असे साधन आहे, ज्याचा वापर हवामान बदलाचा सामना करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे तंत्रज्ञान, अद्याप त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. अशा प्रकल्पाचा खर्च जास्त असल्यामुळे त्याच्या विकासाची गती मंद आहे. हे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर अनुदानावर अवलंबून आहेत. ग्लोबल सीसीएस इन्स्टिट्यूटच्या सार्वजनिक व्यवहार संचालक डॅनिएला पेटा म्हणाल्या, “अशा नावीन्यपूर्ण प्रकल्पांना पुढे जाण्यासाठी सार्वजनिक पाठिंबा महत्त्वाचा आहे आणि असेल.” नॉर्वेजियन सरकारने नॉर्दर्न लाइट्सच्या एकूण खर्चाच्या ८० टक्के निधी दिला आहे, हा आकडा गोपनीय ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘सॅल्मन स्पर्म फेशियल’ काय आहे? हॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये याची लोकप्रियता का वाढतेय?

युरोपमध्ये समुद्राखालील साठवण प्रकल्प विकसित होत आहेत. ब्रिटिश केमिकल्स ग्रुप इनियोस आणि २३ भागीदारांद्वारे डेन्मार्कच्या किनाऱ्यावर तयार केलेली ग्रीनसँड योजना २०२५ च्या उत्तरार्धात किंवा २०२६ च्या सुरुवातीला सुरू होणार आहे. लाँगशिप योजनेमध्ये सुरुवातीला नॉर्वेमध्ये दोन ‘कार्बन डाय-ऑक्साइड कॅप्चर साइट्स’ची निर्मिती करण्यात येत आहे. ब्रेविकमधील हेडलबर्ग मटेरियल्स सिमेंट कारखाना पुढील वर्षी त्याचे कॅप्चर केलेले उत्सर्जन साइटवर पाठवणे सुरू करील, अशी शक्यता आहे. नॉर्दर्न लाइट्सने त्याचे पहिले व्यावसायिक क्रॉस-बॉर्डर कॉन्ट्रॅक्ट्सदेखील मिळवले आहेत. नेदरलँडमधील अमोनिया प्लांट आणि डेन्मार्कमधील दोन बायोमास पॉवर स्टेशनमधून कार्बन डाय-ऑक्साइड साठवण करण्यासाठी नॉर्वेजियन खत उत्पादक कंपनी यारा आणि ऊर्जा समूह ऑरस्टेड यांच्याशी करार केला आहे.

Story img Loader