कोरियन पॉप म्युझिक (के-पॉप), टीव्ही मालिका, चित्रपट, खाद्यसंस्कृती आणि एकूणच कोरियन संस्कृतीने गेल्या काही वर्षांमध्ये जगावर गारूड निर्माण केले आहे. या सांस्कृतिक बाजारपेठेतील सर्वाधिक लोकप्रिय घटक म्हणजे ‘बीटीएस’ हा म्युझिक बँड होय. दक्षिण कोरियातील हाईब (Hybe) या एंटरटेनमेंट कंपनीचा हा बँड आहे. एरवी आपल्या गाण्यांसाठी चर्चेत असणारा हा बँड आता भलत्याच वादांसाठी चर्चेत आला आहे. या कंपनीतील सदस्यांनी पत्रकार परिषदा घेत एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.

सध्या हाईब या कंपनीचे बाजारमूल्य ८०० दशलक्ष डॉलर आहे. मात्र, आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर या कंपनीला शेअर मार्केटमध्ये मोठा फटका बसला असल्याचे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ने गेल्या महिन्यात दिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, कोरियन पॉप्युलर म्युझिक अथवा ‘के-पॉप’ म्युझिकच्या संपूर्ण जगातील लोकप्रियतेने दक्षिण कोरियाच्या तिजोरीत गडगंज भर घातली आहे. जगभरात ‘बीटीएस’चे कोट्यवधी चाहते आहेत. भारतातदेखील बीटीएसच्या चाहत्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. या सगळ्या माध्यमातून दक्षिण कोरियाला भरपूर फायदा होतो आहे. कोरियाच्या बहुरंगी संस्कृतीच्या विक्रीमुळे एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भरपूर वाढ झाली आहे. मात्र, हाईब कंपनीमध्ये सध्या सुरू असलेल्या वादांचे पडसाद जगभरातल्या चाहत्यांपासून कोरियातल्या शेअर मार्केटपर्यंत सर्वत्र उमटले आहेत. त्यामुळे कोरियाच्या अर्थव्यवस्थेला याचा किती फटका बसणार आहे, याची माहिती आपण आता घेणार आहोत.

madhuri dixit lips turned blue while filming song pukar
माधुरी दीक्षितचे ओठ निळे पडले अन् थांबवावं लागलेलं शूटिंग…; ‘त्या’ सिनेमाला पूर्ण झाली २५ वर्षे, ‘धकधक गर्ल’ची खास पोस्ट
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
good feelings song Cold Play show ahmedabad Satyajit Padhye puppet show
‘कोल्ड प्ले’च्या मंचावर सत्यजित पाध्ये आणि सहकारी, ‘गुड फिलिंग्स’ गाण्यावर बोलक्या बाहुल्यांचे लक्षवेधी सादरीकरण
litile girl Singing
चिमुकलीने गायले “मेरे ख्वाबों में जो आए” गाणे! नेटकरी म्हणे, ‘हा तिचा आवाज नाही”, Viral Videoचे काय आहे सत्य?
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण
Wamik Karad Audio Clip
“इथं बीड जिल्ह्याचा बाप बसलाय”, वाल्मिक कराडची आणखी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; पोलीस अधिकाऱ्याला म्हणाला…
pimprichnchwad municipal corporations taxation and collection department is hosting Me jababdar kardata rap contest to encourage property tax payments
रील-रॅप गाणे बनवा, बक्षिसे मिळवा!

हेही वाचा : गिटार वाजवणारे राजकारणी सिंगापूरचे नवे पंतप्रधान; कोण आहेत लॉरेन्स वोंग?

‘हाईब’ काय आहे?

कोरियन संगीत निर्माता बँग सी-ह्यूक यांनी २००५ मध्ये हाईब कॉर्पोरेशनची स्थापना केली होती. सुरुवातीला ‘बिग हिट एंटरटेनमेंट’ नाव असलेल्या कंपनीचा कारभार लहान होता. त्यावेळी, के-पॉप इंडस्ट्रीमध्ये तीन-चार बँड्सचा दबदबा मोठा होता. अशा पार्श्वभूमीवर, बिग हिट एंटरटेनमेंट कंपनीने काही कलाकारांना हाताशी घेतले आणि संगीत निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले. मात्र, सुरुवातीला या कंपनीच्या गाण्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. कंपनी दिवाळखोरीत निघेल, अशीही वेळ आली होती.

२०१३ मध्ये कंपनीने ‘बीटीएस’ म्हणजेच ‘बंगतां सोनियांदन’ (Bangtan Sonyeondan) नावाचा नवा बँड सुरू केला. यामध्ये पॉप किंवा रॅप साँग गाणारे सात कलाकार होते. कोरियन गायकांच्या या सप्तकाने अशा काही गाण्यांची निर्मिती केली की, त्यांनी अल्पावधीतच कोरियामध्ये लोकप्रियता निर्माण केली. निव्वळ दोन ते तीन वर्षांतच या बँडची लोकप्रियता गगनाला भिडली. संपूर्ण दक्षिण कोरियामध्ये आपला दबदबा निर्माण केल्यानंतर अल्पावधीतच या बँडने पाश्चिमात्त्य देशातील चाहत्यांमध्येही धुमाकूळ घातला. जगभरात त्यांच्या अल्बमची विक्री मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. त्यांना ‘ग्रॅमी’सारख्या अनेक मोठ्या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले. बीटीएसच्या या यशामुळे हाईब कंपनीने आपला विस्तार सुरू केला. त्यांनी अनेक नव्या कलाकारांना संधी दिली. त्यासाठी इतर कंपन्यादेखील विकत घेतल्या आणि अनेक उपकंपन्याही स्थापन केल्या. २०२० मध्ये हाईब कंपनी खासगी न राहता सार्वजनिक झाली. तेव्हा तिचे मूल्य ४.१ अब्ज डॉलर इतके होते. २०२१ मध्ये अधिक विस्तार करण्यासाठी कंपनीची पुनर्रचना करण्यात आली.

कंपनीमध्ये सध्या काय वाद सुरू आहेत?

गेल्या काही आठवड्यांपासून, हाईबची उपकंपनी असलेल्या ‘ADOR’ बरोबरच हाईबचा हा वाद सुरू आहे. एप्रिल २०२४ मध्ये ADOR कंपनीच्या सीईओ मिन ही-जीन या कंपनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत हाईबने ADOR कंपनीचे ऑडिट करण्याचे आदेश दिले. मिन ही-जीन २०१९ मध्ये हाईब कंपनीत दाखल झाल्या होत्या. त्यापुढील दोन वर्षांतच त्यांना ADOR कंपनीचे सीईओ करण्यात आले होते.

२०२२ मध्ये मिन यांनी पाच कलाकार मुलींचा एक के-पॉप गर्ल ग्रुप बँड सुरू केला. ‘न्यू जीन्स’ (NewJeans) असे या बँडचे नाव होते. हा बँडदेखील काही गाणी प्रसिद्ध केल्यानंतर अल्पावधीतच कोरियामध्ये सुप्रसिद्ध झाला. त्यानंतर लगोलग त्याला जगभरातही प्रसिद्धी मिळाली. २०२३ मध्ये या बँडला जगातील सर्वोच्च के-पॉप पुरस्कार ‘बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड’ मिळाला. हा अमेरिकेतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे.

या बँडमधील कलाकार मुलींनाही वारेमाप प्रसिद्धी मिळाली. त्यांची लोकप्रियता पाहता त्यांना डायर, लुई व्हिटन, अरमानी आणि गुच्ची यांसारख्या अनेक मोठमोठ्या कंपन्याच्या जाहिरातींसाठी ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ही करण्यात आले. मात्र, आता ADOR कंपनीच्या सीईओ मिन आणि इतर सदस्य कंपनीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हाईबने केला आहे. ‘कोरिया हेराल्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार, हाईबने मिन आणि इतरांबरोबर झालेल्या संभाषणाचे काही स्क्रीनशॉट्सही प्रसिद्ध केले आहेत.

सीईओ मिन यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करणार असल्याचे हाईबने म्हटले आहे. त्यानंतर मिन यांनी २५ एप्रिल रोजी दोन तासांची पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. या पत्रकार परिषदेमध्ये मिन फारच भावनिक होऊन रडूही लागल्या. त्यांनी हे आरोप फेटाळून लावत हाईबवर प्रत्यारोप केले. हाईब कंपनी न्यू जीन्स बँडचा कारभार चुकीच्या पद्धतीने करत असल्याचा आरोप मिन यांनी केला.

हाईब कंपनीने जाहीर केलेले संभाषणांचे स्क्रीनशॉट्सदेखील चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध केले असल्याचा दावा मिन यांनी केला आहे. या स्क्रीनशॉट्समध्ये मिन या आपल्या व्यावसायिक निर्णयांसाठी एका ‘शामन’ मित्राशी बोलत असल्याचा दावा करण्यात आला आहे. कोरियन संस्कृतीमध्ये ‘शामन’ लोक पारंपरिक धार्मिक प्रथा आणि समारंभांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मानवी जग आणि आध्यात्मिक क्षेत्रामधील मध्यस्थ म्हणून ते काम करतात. बरेचदा आपल्या आयुष्यातील निर्णयांसाठी आणि मानसिक आधारासाठी अशा शामन लोकांची मदत घेतली जाते. याबाबत खुलासा करताना मिन म्हणाल्या की, ‘मला शामन मित्र असू शकत नाही का?’

पुढे मिन यांनी असाही आरोप केला की, न्यू जीन्सच्या अनेक सर्जनशील संकल्पना हाईबने चोरल्या आहेत. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांनंतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिन आणि हाईब यांची बाजू घेणारे गटही पडले आहेत. न्यू जीन्स बँडचे पुढे काय होईल, याची चिंताही अनेकांना आहे. मंगळवारी (१४ मे) काही कोरियन माध्यमांनी असेही वृत्त दिले आहे की, मिन यांची ADOR कंपनीच्या सीईओ पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

हेही वाचा : जॅकी श्रॉफ कोणत्या अधिकाराखाली ‘भिडू नहीं बोलने का’ असं ठामपणे म्हणू शकतात?

हा वाद का निर्माण झाला?

या सगळ्या वादानंतर एकूणच हाईब कंपनीची आणि त्याअंतर्गत येणाऱ्या बँड्सची नाचक्की होईल आणि लोकप्रियता घटेल, अशी चिंता हाईबला वाटते. डीएस ॲसेट मॅनेजमेंटचे फंड मॅनेजर यून जुनवॉन यांनी ‘ब्लूमबर्ग’शी बोलताना म्हटले आहे की, “मिन यांनी केलेले आरोप खरे आहेत की खोटे हा भाग नंतरचा आहे. मात्र, यामुळे हाईब कंपनीमध्ये सगळ्या गोष्टी आलबेल नसल्याचे चित्र उभे राहिले आहे. “लोक या बँड्सशी अधिक भावनिक पद्धतीने जोडले गेलेले आहेत, त्यामुळे त्यासंदर्भात घडणाऱ्या घटनांचा परिणाम तीव्रतेने त्यांच्या लोकप्रियतेवर आणि त्यातून मिळणाऱ्या कमाईवर होतो. दक्षिण कोरियामध्ये प्रत्येकाला लष्करी सेवा करणे अनिवार्य आहे. २०२२ मध्ये बीटीएसमधील कलाकार या लष्करी सेवेसाठी गेल्यावरही जगभरातील चाहत्यांमध्ये विविध प्रकारचे पडसाद उमटले होते. बँडमधील प्रमुख कलाकार सध्या लष्करी सेवेमध्ये असल्याने बीटीएस बँडची नवी गाणी आलेली नाहीत. अशा पार्श्वभूमीवर हाईबच्या इतर बँड्सनी चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा असतानाच हा वाद सुरू झालेला आहे. त्यामुळे जगभरात या वादाची चर्चा सुरू आहे. हाईबचे शेअर्स जानेवारीपासून १५ टक्क्यांहून अधिक घसरलेले आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या एसएम एंटरटेनमेंट, वायजी आणि जेवायपी यांच्या शेअर्समध्येही गेल्या सहा महिन्यांत घसरण झाली आहे. एकूणच के-पॉप इंडस्ट्रीला या वादाचा फटका बसला आहे.

Story img Loader