इटलीमध्ये बऱ्याच काळापासून सुप्त अवस्थेत असलेला ज्वालामुखी आता पुन्हा जागा होतो की काय? अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. इटलीमधील कॅम्पी फ्लेग्रेई (Campi Flegrei) या ज्वालामुखीला फ्लेग्रेअन फील्ड्स असेही म्हटले जाते. सध्या या ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नॅपल्स आणि त्याच्या शेजारी असलेले पोझुओली शहर या ज्वालामुखीच्या टप्प्यात असल्याचे मानले जाते. या परिसरात मागच्या काही महिन्यात हजारांहून अधिक छोटे छोटे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळेच पाचशे वर्षांनंतर या ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक होतो की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कॅम्पी फ्लेग्रेई काय आहे?

जगातील २० मोठ्या ज्वालामुखींमध्ये कॅम्पी फ्लेग्रेईचा समावेश होतो. कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हार्यमेंट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार कॅम्पी फ्लेग्रेई ज्वालामुखीमुळे तयार झालेले विवर किंवा ज्याला ज्वालामुखीचे मुख म्हटले जाते, हे युरोपमधील सर्वात मोठे विवर (caldera) असल्याचे मानले जाते. याचे क्षेत्रफळ १२ ते १५ किमीपर्यंत पसरलेले आहे. जगातील सर्वात मोठे ज्वालामुखीचे विवर फिलिपिन्स समुद्रात असलेल्या फिलीपिन राईज या ठिकाणी आहे. ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या अपोलाकी या विवराचे क्षेत्रफळ १५० किलोमीटर इतके मोठे आहे.

Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
Spain devastating floods Flow of Turia River Heavy rain in Spain
आपण कधी जागे होणार? स्पेनचा विध्वंसक पूर
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
Dance Viral Video
‘डान्स असावा तर असा…’; ‘चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी’ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
bomb explosion at railway station in Quetta pakistan
Pakistan Blast: पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट, २१ लोकांचा मृत्यू

हे वाचा >> उकळणारा तप्त लाव्हारस पाहण्याचा थरार, जीव धोक्यात घालून केलं जाणारं ‘व्होल्कॅनो टुरिझम’ आहे तरी काय?

इटलीमध्ये इसवी सन ७९ मध्ये माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काळाच्या पडद्याआढ गेलेल्या पॉम्पे शहरापासून केवळ २८ मैलांवर (४५ किमी) कॅम्पी फ्लेग्रेई ज्वालामुखी आहे. पॉम्पे शहराच्या ठिकाणी उत्खनन झाल्यानंतर या शहराच्या खाणाखुणा सापडल्या आहेत. कॅम्पी फ्लेग्रेईचा शेवटचा ज्वालामुखी उद्रेक ५०० वर्षांपूर्वी १५३८ मध्ये झाला होता. ज्यामुळे जवळच असलेल्या नॅपल्सच्या खाडीमध्ये एक नवा पर्वत निर्माण झाल्याचे २०११ साली प्रकाशित झालेल्या क्वॅटर्नरी सायन्स रिव्ह्यूजमध्ये म्हटले गेले होते. या प्रदेशाच्या आसपास पाण्याखाली ३९ हजार वर्षांपासून अनेक ज्वालामुखी सक्रिय आहेत.

सीएनएन या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार नॅपल्स शहर आणि आसपासच्या भागात जवळपास आठ लाख लोकांचे वास्तव्य आहे. तसेच या ठिकाणी शाळा, रुग्णालये, छोटी गावे आणि शॉपिंग सेंटर उभे राहिलेले आहेत. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यास त्याच्या कचाट्यात या ठिकाणची १८ छोटी-मोठी शहरे येऊ शकतात, त्यामुळे या शहरांना रेड झोन म्हणून ओळखले जाते. इटलीच्या नागरी संरक्षण सेवा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार या आठ लाख लोकांपैकी पाच लाखांहून अधिक लोकांना ज्वालामुखीचा थेट फटका बसू शकतो.

भूकंपाची तीव्रता वाढली

इटलीच्या द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ जिओफिजिक्स अँड व्हॉल्कॅनोलॉजीच्या (INGV) अहवालानुसार डिसेंबर २०२२ पासून या प्रदेशात भूकंपाचे धक्के बसण्याची संख्या वाढली आहे. यामुळेच अनेक वर्षांपासून सुप्त अवस्थेत असलेला ज्वालामुखी पुन्हा सक्रिय होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. २०२३ मध्ये कॅम्पी फ्लेग्रेई येथे ३,४५० भूकंपाची नोंद झाली आहे. यापैकी १,११८ भूकंपाचे झटके एकट्या ऑगस्ट महिन्यात बसले.

INGV च्या माहितीनुसार, मागच्या वर्षीच्या तुलनेत भूकंपाचे प्रमाण तीन पटींनी वाढले आहे. ऑक्टोबर महिन्यात ५०० भूकंपाचे झटके जाणवले, ज्यामध्ये ४ रिश्टर स्केलचा सर्वात मोठा भूकंप झाला. या मोठ्या भूकंपानंतर १२ छोटे छोटे धक्केही (aftershocks) जाणवले. INGV च्या माहितीप्रमाणे, मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत जवळजवळ सर्व भूकंप ३ रिश्टर स्केलपेक्षा कमी तीव्रतेचे होते.

INGV च्या व्हेसुव्हियस वेधशाळेचे माजी प्रमुखांनी सप्टेंबर महिन्यात रॉयटर्स या वृत्तसंकेतस्थळाला माहिती देताना म्हटले की, सततच्या भूकंपामुळे या ठिकाणची जमीन वर उचलली (uplift) जात आहे, ज्याचा परिणाम नॅपल्सच्या बाहेर सुमारे २० मैलांवर असलेल्या पोझुओली या बंदराच्या शहरावर जाणवू शकतो. या शहरांचे संरचनात्मक नुकसान यामुळे होऊ शकते, असा अंदाज वेधशाळेच्या माजी प्रमुखांनी व्यक्त केला.

हे वाचा >> अनवट भटकंती.. पॉम्पे ज्वालामुखीने गोठवलेले गाव!!

अनेक वर्ष निपचित असलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाची शक्यता

कॅम्पी फ्लेग्रेईवर संशोधन करणारे आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील ज्वालामुखी शास्त्राचे प्राध्यापक ख्रिस्तोफर किलबर्न यांनी एनबीसी न्यूजशी बोलताना सांगितले की, अलीकडच्या काळात वाढलेले भूकंप पृथ्वीचे कवच कमकुवत करत आहेत आणि त्यामुळे ज्वालामुखी फुटण्याची शक्यता वाढत आहे, असे संशोधनातून दिसून येते.

या ठिकाणी मासेमारी करणाऱ्या एका मच्छीमाराने वॉल स्ट्रीट जर्नलशी बोलताना सांगितले की, आम्हाला आता या भूकंपाच्या धक्क्यांची सवय झाली आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही की आम्हाला भीती वाटत नाही.

ज्वालामुखीचा उद्रेख झाल्यास काय परिस्थिती उद्भवू शकते, याची माहिती कॅम्पी फ्लेग्रेईमधील रहिवाशांनी इटालियन यंत्रणांना दिली असल्याची एक बातमी मध्यंतरी प्रकाशित झाली होती. या बातमीनुसार, इटलीच्या यंत्रणांनी येथील लोकांना संकट आल्यानंतर बाहेर काढायचे ठरविल्यास ते शक्य होणार नाही किंवा त्यात यश मिळणार नाही. कारण शहराबाहेर पडण्यासाठी अतिशय अरुंद रस्ते असल्यामुळे ही बचावात्मक योजना प्रभावी ठरणार नाही.

किलबर्न यांनी मात्र कॅम्पी फ्लेग्रेईबाबत बोलताना सावध पवित्रा घेतला. एनबीसी न्यूजशी बोलताना ते म्हणाले की, पोझुओलीमध्ये आणि नॅपल्स शहरांमध्ये सध्या वारंवार भूकंपाचे धक्के बसत असले आणि जमिनीखालून सल्फुरिक वायू बाहेर पडत असला तरी कॅम्पी फ्लेग्रेई ज्वालामुखीचा उद्रेक इतक्यात होईल, अशी शक्यता वाटत नाही.

ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर काय होईल?

नेप्स फेडेरिको द्वितीय विद्यापीठातील भूविज्ञान प्राध्यापक अलेस्सांद्रो आयनास यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला माहिती देताना सांगितले की, ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाल्यास स्थलांतरामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होईल. आपल्याला चिंतेत टाकणारे हे प्राथमिक कारण आहे. आयनास यांनी यासाठी यलोस्टोन ज्वालामुखीचे उदाहरण दिले. या ठिकाणी स्फोट होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर यलोस्टोन राष्ट्रीय उद्यानातील पर्यटकांना तत्काळ हलविले गेले. “पर्यटकांना घरी पाठवून चार वर्षांसाठी उद्यान बंद करणे सोपे असते, पण कॅम्पी फ्लेग्रेईसारख्या नागरी भागात असे करणे सोपे नाही”, असे आयनास म्हणाले.