Can a whale swallow a human : चिलीच्या पॅटागोनियन किनाऱ्यावरील मॅगेलन सामुद्रधुनीत ८ फेब्रुवारी रोजी थरकाप उडवणारी घटना घडली. एड्रियन सिमांकास या २३ वर्षीय तरुणाला बोट-सफारीचा आनंद घेताना महाकाय हंपबॅक व्हेल माशाने गिळले. या घटनेचा थरार एड्रियनच्या वडिलांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला, जे दुसऱ्या एका बोटीतून प्रवास करीत होते. मात्र, काही वेळाने माशाने उलटी केली आणि एड्रियन त्याच्या पोटातून बोटीसह बाहेर आला. विशेष म्हणजे तरुणाला कुठलीही दुखापत झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, व्हेल मासा माणसाला खरंच गिळू शकतो का, असा प्रश्न अनेकांना पडला, याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“डोळे उघडले तेव्हा मी व्हेलच्या तोंडात होतो”

व्हेल माशाच्या तोंडातून बाहेर आलेल्या एड्रियनने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. तो म्हणाला, “मॅगेलन सामुद्रधुनीतील सॅन इसिद्रो लाइटहाऊसजवळ मी आणि माझे वडील डेल सिमांकास कयाकिंग करत होतो. त्यावेळी माझ्या पाठीवर काहीतरी आदळल्यासारखं मला जाणवलं. माझ्याभोवती काहीतरी गडद निळी व पांढऱ्या रंगाची वस्तू होती आणि एक चिकट पदार्थ माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होता. माझ्या अंगात असलेले लाईफ जॅकेट वर खेचले गेले. मी माझे डोळे बंद केले आणि पुन्हा उघडले, तेव्हा मला जाणवले की, मी व्हेल माशाच्या तोंडात आहे. काही वेळानंतर मी माशाच्या तोंडातून बाहेर पडलो; परंतु मला कोणतीही इजा झाली नाही.”

आणखी वाचा : ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने’चा १.७ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ; या योजनेचे उद्दिष्ट काय? कशी केली जाईल अंमलबजावणी?

व्हेल माशांचे प्रकार

व्हेल मासे प्रामुख्याने बॅलीन व्हेल (Baleen Whales) व दातेदार व्हेल (Toothed Whales अशा दोन कुटुंबांत विभागलेले असतात. बॅलीन व्हेलमध्ये १४ प्रजाती आहेत; ज्यात निळा देवमासा (Blue Whale), हंपबॅक व्हेल (Humpback Whale) व ग्रे व्हेल (Gray Whale) यांचा समावेश होतो. या व्हेलमध्ये दातांऐवजी बॅलीन प्लेट्स असतात, ज्या केराटिनपासून तयार झालेल्या असतात. या प्रणालीचा उपयोग करून, ते पाण्यातील लहान मासे, प्लँक्टन व क्रिल यांसारख्या जलचर प्राण्यांची शिकार ते सहजपणे करतात.

दुसरीकडे दात असलेल्या व्हेल माशांच्या ७० हून अधिक प्रजाती आहेत; ज्यात स्पर्म व्हेल, बीक्ड व्हेल, किलर व्हेल व डॉल्फिन यांचा समावेश आहे. “या व्हेल माशांना दात असतात आणि ते मासे, स्क्विड आणि कधी कधी सीलसारख्या मोठ्या भक्ष्यांची सहजपणे शिकार करतात,” असे कॅनडाच्या सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटीच्या संशोधक अनैस रेमिली यांनी त्यांच्या व्हेल सायंटिस्ट्स वेबसाइटवरील ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. हेदेखील लक्षात घेण्यासारखं आहे की, दात असलेले व्हेल अन्न चघळण्यासाठी दातांचा वापर करत नाहीत; तर ते विशेषत भक्ष्याला पकडण्यासाठी आणि त्याला संपूर्ण गिळण्यासाठी या व्हेल दातांचा वापर करतात.

व्हेल मासा माणसाला गिळू शकतो का?

बॅलीन व्हेल आणि दात असलेले व्हेल हे दोन्ही मासे माणसांना गिळू शकत नाहीत. कारण- त्यांचे तोंड मोठे असले तरी त्यांचा घसा खूपच लहान असतो. उदाहरण द्यायचं झाल्यास हंपबॅक व्हेलच्या घशाचा आकार मानवी मुठीच्या आकाराचा असतो. दात असलेल्या व्हेल माशांची अन्ननलिका बॅलीन व्हेलपेक्षा मोठी असते. तरीही ते पूर्ण मानवी शरीर गिळू शकत नाहीत. काही मासे याला अपवाद आहेत.

स्पर्म व्हेल (Sperm Whale) हा दात असलेल्या व्हेल माशांमध्ये सर्वांत मोठा प्राणी आहे. या प्रजातीचे शास्त्रीय नाव Physeter macrocephalus आहे. स्पर्म व्हेलच्या शरीराचा आकार १६ ते १८ मीटर लांब आणि वजन ४५ ते ५७ टनांपर्यंत असू शकते. या माशांच्या घशाचा आकार इतका मोठा असतो की, ते सहजपणे एखाद्या व्यक्तीला गिळू शकतात. परंतु नॅशनल जिओग्राफिकच्या अहवालानुसार, स्पर्म व्हेलने माणसाला गिळणे ही एक दुर्मीळ गोष्ट असते. कारण- या माशांचा मानवाशी सहजासहजी संपर्क येत नाही. कारण- ते खोल समुद्रात असतात.

हेही वाचा : महिलांना मिळणार ‘वर्क फ्रॉम होम’; ‘या’ राज्यातील मुख्यमंत्र्यांची घोषणा, नेमके धोरण काय? याचा फायदा कोणाला?

हंपबॅक व्हेलने सिमंकासला का गिळले?

न्यू हॅम्पशायरमधील ब्लू ओशन सोसायटी फॉर मरीन कॉन्झर्व्हेशनच्या सह-संस्थापक आणि संशोधन संचालक डायना शुल्टे यांनी द न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले, “हंपबॅक व्हेल बहुतेकदा लहान मासे किंवा क्रिल खाण्यासाठी तोंड उघडून ठेवतात आणि कधी कधी ते पाण्याच्या पृष्ठभागावरही येतात. ढगाळ हवामान आणि शिकारीच्या एकाग्रतेत मग्न असल्यामुळे कदाचित या व्हेलला बोटीवर बसलेली व्यक्ती दिसली नसेल.”

शुल्टे यांच्या मते, हंपबॅक व्हेल प्रामुख्याने त्यांच्या श्रवणशक्तीवर अवलंबून असतात. समुद्रात फिरणारी लहान जहाजं किंवा बोटींचा आवाज खूपच कमी असतो. त्यामुळे आपण एका बोटीला गिळतो आहोत, याची कल्पना हंपबॅकला नसावी. पोटात भक्ष्य गेल्यानंतर व्हेलच्या त्याचे पचन करणे कठीण झाले असेल, म्हणूनच त्याने उलटी केली आणि बोटीसह तो तरुण सुखरूपपणे बाहेर आला.

हंपबॅकने सिमांकासला गिळल्यावर काय घडले?

हंपबॅक व्हेलने जेव्हा एड्रियन सिमांकासला गिळले, तेव्हा त्याचे वडील डेल काही मीटर अंतरावरील एका दुसऱ्या बोटीत होते. आपल्या मुलाला व्हेलच्या तोंडात जाताना पाहून, ते अजिबात घाबरले नाहीत. त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा प्रकार कैद केला जेव्हा व्हेलने एड्रियनला सोडले, तेव्हा डेल यांनी आपल्या मुलाला शांत राहण्यास सांगितले. व्हायरल झालेला व्हिडीओ बघितला, तर त्यामुळे डेल हे आपल्या मुलाला ‘शांत राहा, शांत राहा’, असं सांगत असल्याचे ऐकू येत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि अनेकांनी त्या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.