तरुणांसाठी वैयक्तिक कर्ज सुरक्षित करणे हा एक महत्त्वपूर्ण आर्थिक टप्पा असू शकतो. अनपेक्षित खर्चाचे व्यवस्थापन करणे असो किंवा शैक्षणिक शुल्कासारख्या महत्त्वाच्या बाबींसाठी पैसे देणे असो, १८ वर्षांच्या वयोगटातील मुलांना कर्ज घ्यायचे असल्यास त्याबाबतच्या प्रक्रियेची स्पष्ट माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे. त्यात समाविष्ट असलेल्या महत्त्वपूर्ण बाबी आणि पात्रता निकष जाणून घेतल्याने तरुण कर्जदारांना कर्जासाठी अर्ज करताना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. १८ वर्षीय व्यक्तींसाठी एकूणच कर्जाची प्रक्रिया काय? त्याविषयी जाणून घेऊ.
भारतात वयाच्या १८ व्या वर्षी वैयक्तिक कर्ज सुरक्षित करणे शक्य आहे. वित्तीय संस्थांना सहसा कर्जदारांना काही निकषांची पूर्तता करणे आवश्यक असते आणि कर्ज करारामध्ये प्रवेश करण्यासाठी वय १८ वर्षे असणे हे कायदेशीर वय आहे. परंतु, अर्जदाराची पात्रता मोठ्या प्रमाणावर उत्पन्न, रोजगार स्थिती व क्रेडिट स्कोअर यांसारख्या घटकांवर अवलंबून असते.
हेही वाचा : महाकुंभातील ‘खोया-पाया केंद्र’ काय आहे? हरवलेल्या लोकांना प्रियजनांना शोधण्यात कशी होतेय केंद्राची मदत?
वैयक्तिक कर्जासाठी १८ वर्षीय व्यक्ती पात्र असू शकते; परंतु त्यांच्याकडे रोजगार किंवा इतर विश्वसनीय स्रोतांकडून मिळणारे स्थिर उत्पन्न असणे आवश्यक आहे. बहुतेक बँका आणि सावकार अर्जदारांचे किमान मासिक उत्पन्न असण्यास महत्त्व देतात. जे स्वयंरोजगार करणारे आहेत किंवा अर्धवेळ नोकरी असलेले विद्यार्थी आहेत, त्यांना सह-स्वाक्षरीदार किंवा हमीदाराशिवाय कर्ज घेता येणे कठीण होऊ शकते. या वयात वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदाराने काही पात्रता निकषांची पूर्तता करणे आणि विशिष्ट कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते.
वैयक्तिक कर्जासाठी १८ वर्षीय व्यक्ती अर्ज कसा करू शकते?
पात्रता तपासा : अर्जदारांकडे स्थिर उत्पन्नाचा स्रोत असणे आवश्यक असते. १८ हे अर्ज करण्याचे कायदेशीर वय असताना, कर्ज मंजुरी ही व्यक्तीच्या आर्थिक प्रोफाइलवर अवलंबून असते. त्यामध्ये उत्पन्न, क्रेडिट इतिहास आदी बाबी समाविष्ट असतात. अनेक बँका आणि वित्तीय संस्थांना किमान मासिक उत्पन्नाची अपेक्षा असते, जी कर्ज देणाऱ्यांनुसार बदलू शकते.
क्रेडिट इतिहास : वैयक्तिक कर्ज सहसा अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारावर दिले जाते, जे कर्जाची परतफेड करण्याची त्यांची क्षमता दर्शवते. अर्जदाराकडे क्रेडिट कार्ड असल्यास किंवा भूतकाळात लहान कर्ज घेतले असल्यास, ते क्रेडिट रेकॉर्ड स्थापित करण्यात मदत करू शकते. क्रेडिट इतिहास नसल्यास काही सावकार सह-अर्जदाराच्या मदतीने कर्ज मंजूर करू शकतात.
सह-अर्जदार किंवा हमीदार : अनेक सावकार तरुण कर्जदारांसाठी वैयक्तिक कर्ज मंजूर करण्याची अधिक शक्यता असते. जर त्यांच्याकडे सह-अर्जदार असेल, जसे की पालक ज्यांचे उत्पन्न स्थिर आहे आणि ज्यांचा चांगला क्रेडिट स्कोअर आहे.
आवश्यक कागदपत्रे : वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, १८ वर्षांच्या वयोगटातील व्यक्तींनी आवश्यकतेनुसार विविध कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
वैयक्तिक कर्जाकरिता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
ओळखीचा पुरावा – आधार कार्ड, पारपत्र, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स.
पत्त्याचा पुरावा – युटिलिटी बिले, भाडेकरार किंवा आधार कार्ड.
उत्पन्नाचा पुरावा – सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट किंवा आयकर रिटर्न (ITR).
छायाचित्रे – पासपोर्ट आकाराचे फोटो.
वयाचा पुरावा – जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
हेही वाचा : एका हत्तीवरून भारत-बांगलादेशमध्ये वाद; नेमके प्रकरण काय?
वर नमूद केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून, १८ वर्षांचे लोक भारतात वैयक्तिक कर्जासाठी यशस्वीरीत्या अर्ज करू शकतात. परंतु, तरुण अर्जदारांनी त्यांच्या परतफेडीच्या क्षमतेचा काळजीपूर्वक विचार करणे आणि कर्ज हाताळण्यासाठी ते आर्थिकदृष्ट्या तयार असल्याची खात्री करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.