दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उजव्या आणि डाव्या विचारांच्या आघाड्यांची आलटून-पालटून सत्ता राहिली आहे. सध्या त्या देशात अध्यक्षीय निवडणूक सुरू असून रविवारी पार पडलेल्या मतदानात कुणा एकाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे आता नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा अंतिम फेरीचे मतदान होईल आणि अर्जेंटिनाची जनता कुणाला निवडते हे स्पष्ट होईल. या निवडणुकीकडे विशेष लक्ष असायचे कारण ऑगस्टमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीमध्ये ट्रम्प यांचे निस्सीम भक्त असलेले अतिउजव्या आघाडीचे नेते हावीर मिली यांनी आघाडी घेतली होती. आता मुख्य निवडणुकीत ते काहीसे मागे पडले असले, तरी अद्याप स्पर्धेतून बाहेर फेकले गेलेले नाहीत. आता मध्यम-डाव्या विचारसरणीचे विद्यमान अर्थमंत्री सर्जिओ मास्सा आणि मिली यांच्यात खरी लढत आहे. या पार्श्वभूमीवर अर्जेंटिनातील राजकारणाचा घेतलेला हा आढावा.

निवडणूक प्रक्रिया कशी असते?

अर्जेंटिनामध्ये दर चार वर्षांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, राष्ट्रीय कायदेमंडळाचे सदस्य, बहुतांश राज्यांचे गव्हर्नर निवडण्यासाठी एकत्र मतदान घेतले जाते. अध्यक्ष-उपाध्यक्ष अशा जोडीसाठी विविध आघाड्या किंवा पक्ष आपली उमेदवारी जाहीर करतात. १८ ते ७० वयोगटातील नागरिकांना मतदान सक्तीचे आहे. १६ ते १७ वयोगटातील तरुण स्वेच्छेने आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात. ही मुख्य निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असली, तरी तिची प्राथमिक फेरी (प्रायमरीज) १३ ऑगस्ट रोजी पार पडली. मुख्य निवडणुकीमध्ये कोणते उमेदवार असणार, हे यातील मतांच्या टक्केवारीवरून ठरते. प्राथमिक फेरीमध्ये १.५ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळविलेली जोडगोळी अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या मुख्य निवडणुकीत उतरू शकते. या फेरीमध्ये साधारणत: कोण आघाडीवर आहे, याचा अंदाजही येत असतो.

Who is George Soros
जॉर्ज सोरोस कोण आहेत? भाजपला त्यांच्याविषयी इतका राग का? ते खरेच ‘काँग्रेसमित्र’ आणि ‘भारतशत्रू’ आहेत का?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
Sharad Pawar asserts that distrust in the electoral system should be removed print politics news
मारकडवाडीवरून कलगीतुरा, निवडणूक यंत्रणेबद्दल अविश्वास दूर करा; शरद पवारांचे मारकरवाडीत प्रतिपादन
News About Rahul Narwekar
Rahul Narwekar : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड निश्चित; अर्ज भरताच विरोधकांवर टीका “विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास…”
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?

हेही वाचा : वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमाण काही राज्यांत कमी तर काही राज्यांत जास्त, असे नेमके का?

आतापर्यंत मतदानाचा कल काय?

विद्यमान अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिझ यांनी दुसऱ्या कार्यकाळासाठी पात्र असतानाही निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे सत्ताधारी डाव्या-मध्यममार्गी आघाडीकडून अर्थमंत्री सर्जिओ मास्सा रिंगणात उतरले. त्यांची उजव्या-मध्यममार्गी आघाडीच्या उमेदवार पॅट्रिशिया बुलरिच यांच्याशी मुख्य लढत होती. मात्र प्राथमिक फेरीमध्ये या दोघांनाही मागे टाकून लिबरल ॲडव्हान्सेस या अतिउजव्या आघाडीचे नेते हावीर मिली पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचले तेव्हा अनेकांना धक्का बसला. प्राथमिक फेरीमध्ये हावीर मिली-व्हिक्टोरिया विलारुएल या जोडीने ३०.५ टक्के मतांसह पहिला क्रमांक पटकावला. त्याखालोखाल मुख्य विरोधक उजव्या आघाडीला २८ टक्के आणि सत्ताधारी डाव्या आघाडीला २७ टक्के मते पडली. रविवारी झालेल्या मुख्य निवडणुकीच्या पहिल्या फेरीमध्ये मास्सा यांनी मिली यांना मागे टाकून दुसरा धक्का दिला आहे. मास्सा यांना साधारणत: ३७ टक्के मते पडली, तर मिली यांना ३० टक्क्यांच्या आसपास राहावे लागले. २३ ते २४ टक्के मते मिळविणाऱ्या बुलरिच स्पर्धेतून बाहेर पडल्या असून आता मास्सा आणि मिली यांच्यात नोव्हेंबरमध्ये थेट लढत होईल.

हेही वाचा : विश्लेषण : वस्तू आणि सेवा करामुळे रुग्णसेवा महागली का?

हावीर मिली कोण आहेत?

ऑगस्टमधील प्राथमिक फेरीमुळे अचानक चर्चेत आलेले मिली यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘शिष्यत्व’ स्वीकारले आहे. मात्र विक्षिप्तपणामध्ये ५२ वर्षांच्या मिली यांनी आपल्या गुरूवरही मात केल्याचे दिसते. सत्तेत आल्यास सध्याचे चलन पेसो बंद करून डॉलर आणू, देशाच्या मध्यवर्ती बँकेला टाळे ठोकू अशी भन्नाट आर्थिक आश्वासने त्यांनी दिली आहेत. याखेरीज वातावरण बदल हे थोतांड आहे, लैंगिक शिक्षण कुटुंबव्यवस्थेचा ऱ्हास करण्यासाठी रचलेला कट आहे, मानवी अवयवांची खरेदी-विक्री कायदेशीर असावी अशी जहाल मते ते मांडत असतात. २०१९ ते २०२२ या काळात ब्राझीलचे अध्यक्ष राहिलेले जाइर बोल्सोनारो यांची मिली ही अर्जेंटिनियन आवृत्ती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

हेही वाचा : विश्लेषण : गाझातील निर्वासितांना स्वीकारण्यास अरब देश अनुत्सुक का? पॅलेस्टाईन प्रश्नावर नेमकी भूमिका काय?

मुख्य निवडणुकीत कोणाला संधी?

सर्जिओ मास्सा हे विद्यमान सरकारमध्ये अर्थमंत्री आहेत. ऑगस्टमध्ये त्यांची आघाडी पिछाडीवर जाण्याची मुख्य कारणे घसरलेला पेसो, महागाई ही होती. या आधारावर ऑगस्टमधील प्राथमिक फेरीमध्ये मतदारांनी आतापर्यंतचे दोन्ही विचारप्रवाह बाजूला सारून अतिउजव्या मिली यांना भरभरून मते दिली. मात्र मुख्य निवडणुकीच्या पहिल्या फेरीमध्ये ते सत्ताधारी पक्षावर कडी करण्यात अपयशी ठरले. गेल्या दोन महिन्यांत ही आर्थिक घडी काहीशी नीट करण्यात मास्सा यांना यश आल्याचे ताज्या निकालांवरून दिसते. मात्र आता मास्सा-मिली थेट लढतीत बुलरिच यांची उजवी-मध्यममार्गी आघाडी आणि अन्य छोट्या पक्षांची मते कुणाच्या झोळीत पडतात, यावर नोव्हेंबरचा निकाल अवलंबून असेल.

amol.paranjpe@expressindia.com

Story img Loader