Urfi Javed Laws Related To Vulgar and Obscenity: चित्रा वाघ विरुद्ध उर्फी जावेद हा वाद काही केल्या निवळण्याचे नाव घेत नाही. आता उर्फी जावेद महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांची सुद्धा भेट घेत असल्याचे समजत आहे. सोशल मीडिया स्टार उर्फी रस्त्यावर नंगटपणा करत घालून अश्लीलता पसरवत आहे असे म्हणत चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी उर्फीला चौकशीसाठी सुद्धा बोलावले होते पण उर्फीने मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि मी काहीच अश्लील करत नाही असा ठाम पवित्रा घेतला होता. जोपर्यंत मी प्रायव्हेट पार्ट दाखवत नाही तोपर्यंत माझ्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाही असेही उर्फीने म्हंटले होते. मुंबई पोलिसांच्या चौकशीत उर्फीने असेही म्हंटले की, भारतीय संविधानात मी घातलेल्या कपड्यांवर आक्षेप घेणारे कोणतेही नियम नाही. पण उर्फीचा हा दावा खरा आहे का? भारतात अश्लीलतेच्या संदर्भात काय नियम आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत..
डीएनएने सर्वोच्च न्यायालयाचे प्रवक्ते विशाल अरुण मिश्रा यांच्या हवाल्याने सांगितले की, मनोरंजन विश्वातील अनेकांसाठी असे कपडे घालणे सामान्य आहे. अभिनेत्री शॉर्ट कपडे घालतात तेव्हा तो त्यांच्या कामाचा भाग मानला जातो. त्यांच्या भूमिकेच्या नुसार त्यांना कपडे घालावे लागतात. उर्फी जावेदचे कपडे विचित्र असले तरी त्यांना अश्लील म्हणता येणार नाही. जर या प्रकरणात याचिका कोर्टात दाखल झाली तरी टी फेटाळूनच लावावी लागेल. वकील, हर्षिता निगम यांनीही मिश्रा यांच्या माहितीचे अनुमोदन केले आहे. कोणी काय कपडे काय घालायचे हा त्याचा निर्णय आहे. जर यामुळे गुन्हे होत असतील तर त्यामागची मानसिकता चुकीची आहे. उर्फी एक अभिनेत्री आहे आणि फॅशनबाबत ती वेगवेगळे प्रयोग करते पण त्यांना गैर ठरवता येणार नाही.
हे ही वाचा<< ३९ हजार ५२६ महिलांवर अत्याचार, २५०६ बलात्कार…चित्रा वाघ, उर्फी पुराण झालं असेल तर यावरही बोला!
दुसरीकडे, वकील पवन कुमार म्हणतात की, अत्यंत शॉर्ट कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी जाणे हे चुकीचे आहे. यामुळे लहान मुले, किशोरवयीन व तरुण वर्ग यांच्यावर चुकीचा प्रभाव पडत आहे. उर्फी जावेद जे कपडे घालते ते केवळ शॉर्टच नव्हे तर अंगप्रदर्शन करणारे आहेत. पोलीस याप्रकरणी नक्कीच तिला सूचना देऊ शकतात.
हे ही वाचा<< Urfi Javed तुला लागली कोणाची ‘उर्फी’…!
भारतात अश्लीलतेच्या संबंधित काय नियम आहेत?
भारतात अश्लीलता हा एक गुन्हा आहे. भारतीय दंडसंहिता (IPC) च्या कलम २९२, २९३ व २९४च्या अंतर्गत अश्लीलतेचा प्रदर्शन करणाऱ्यांना शिक्षा होऊ शकते. या प्रकरणी दोषी आढळून आल्यास संबंधित व्यक्तीला २ वर्षाची कैद, दोन हजार रुपयांचा दंड लगावला जाऊ शकतो,दुसऱ्यांदा अशी चूक केल्यास पाच वर्ष जेल व पाच हजार दंड ठोठवला जाऊ शकतो.
हे ही वाचा<< लोकलमध्ये चढली उर्फी, उर्फ ‘ती’ …याला म्हणतात बोल्ड बाई!
IPC कलम ५०९ : जर कोणी महिलेचा विनयभंग करणारी विधाने करत असेल किंवा कृती करत असेल तर त्याला कलम ५०९ च्या अंतर्गत ३ वर्षांची शिक्षा व दंड होऊ शकतो.
IT Act सेक्शन 67(A): जर कोणी ऑनलाईन माध्यमातून अश्लीलतेला प्रोत्साहन देणारा कॉन्टेन्ट शेअर करत असेल तर त्या व्यक्ती विरुद्ध आयटी ऍक्ट ६७ (अ) अंतर्गत कारवाई होऊ शकते. या प्रकरणात दोषीला ५ वर्ष जेल व १० लाखापर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
दरम्यान, अश्लीलतेची व्याख्या पाहिल्यास जर कुणी अन्य आपत्तीजनक व विभत्स गोष्टी सार्वजनिक ठिकाणी प्रसारित करत असेल आणि यामुळे समाजातील अन्य व्यक्तींना नैतिक रूपात अडचण असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करता येते