पाणी हा सध्या महत्त्वाचा विषय झालेला आहे. भारत असो किंवा युरोप अनेक राष्ट्रे पाणीटंचाईशी सामना करत आहेत. विशेषत्वाने युरोपमध्ये पाणी टंचाई अधिक आहे. या पाणी टंचाईवर उपाय म्हणून सांडपाण्याचा पुनर्वापर करू शकतो का, यावर संशोधन सुरू आहे. उपलब्ध पाण्याचा वापर आणि पुनर्वापर याबाबत जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

युरोपमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे तणाव निर्माण होत आहे. सध्या युरोपमध्ये पुरेसे पाणी आहे. परंतु, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर होणे महत्त्वाचे आहे. मध्य आणि दक्षिण युरोपमधील विस्तीर्ण भाग हे पाऊस कमी पडल्यामुळे आणि तीव्र उन्हाळ्यामुळे कोरडे आहेत. जवळजवळ सर्व चेक प्रजासत्ताक आणि लिथुआनिया प्रदेश जुलैमध्येही दुष्काळग्रस्त आहेत. मार्चमध्ये फ्रान्समधील आंदोलकांनी दुष्काळग्रस्त पाण्याचे साठे बांधण्यावरून पोलिसांशी संघर्ष केला होता. स्पेनमध्ये, पाण्याचा साठा ४१ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. मानवाच्या हस्तक्षेपामुळे निसर्गामध्ये होणारे बदल चिंताजनक आहेत. हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा निर्माण होत असून ते युरोपच्या वाढत्या जलसंकटाचे एक कारण आहेत.
त्याचवेळी, नैसर्गिक संसाधनाची मागणी वाढत आहे. उद्योग, शेती आणि दैनंदिन वापरासाठी पाण्याचा अधिक वापर होत आहे.

हेही वाचा : Women’s Equality Day 2023 : लैंगिक असमानतेमुळे महिलांच्या मेंदूवर परिणाम होतो का?

पाण्याचा अधिक वापर कोण करतो?

नेदरलँड्समधील उट्रेच विद्यापीठातील संशोधक मार्क बिअरकेन्स यांच्या मतानुसार, युरोपातील उद्योग निम्म्या जलस्रोतांचा वापर करतात, तर आणखी ४० टक्के शेती आणि १० टक्के वापर हा घरांमध्ये होत आहे. युरोपियन राष्ट्रांमध्ये पाण्याची टंचाई ११ टक्के लोकांना प्रभावित करते. पाणीपुरवठा कमी झाल्यामुळे घरगुती पाण्याच्या वापरावर निर्बंध येऊ शकतात.
२०२२ मध्ये, फ्रेंच अधिकाऱ्यांना काही अणुऊर्जा प्रकल्प बंद करावे लागले. तसेच २०२२ मधील उन्हाळ्यात नॉर्वेमधील जलविद्युत प्रकल्पही कमी झाले. पीक सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनाही पाणीटंचाई आणि दुष्काळाचा मोठा फटका बसत आहे.

हेही वाचा : चांगल्या पगाराची नोकरी सोडून आईला केली मदत, उभारला २०, ७०० कोटींचा व्यवसाय; जाणून घ्या तिच्याविषयी!

उद्योगातील सांडपाणी वापरल्याने शेतकऱ्यांना मदत होऊ शकते का?

शेती क्षेत्राला पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. उद्योगक्षेत्राला अधिक पाणी लागत असल्यामुळे शेती आणि घरगुती वापरासाठी पाणी कमी पडते. या समस्येवर एक उपाय म्हणून उद्योग क्षेत्रातील सांडपाणी शेतीसाठी वापरता येईल का, याच्यावर संशोधन सुरु आहे. सिंचनासाठी अधिक प्रक्रिया केलेले औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी वापरून गोड्या पाण्याच्या साठ्यांचे संरक्षण करता येऊ शकते. युरोपियन राष्ट्रांमध्ये सांडपाण्याचा पुनर्वापर करणे सहापटीने अधिक शक्य आहे.
”गोड्या पाण्याचे स्त्रोत दुर्मीळ आहे. तसेच आता उपलब्ध असणाऱ्या गोड्या पाण्याच्या साठ्यांवर सतत वाढणाऱ्या लोकसंख्येचा ताण आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत गोडे पाणी म्हणजेच पिण्यायोग्य पाणी कमी उपलब्ध आहे. तापमानवाढीकडे आपण वाटचाल करत असताना पाण्याचा मर्यादित वापर आणि उपलब्ध संसाधनांचा वापर-पुनर्वापर करणे आवश्यक आहे,” असे व्हर्जिनिजस सिन्केविसियस, पर्यावरण, महासागर आणि मत्स्यपालनासाठी युरोपियन युनियन आयुक्त यांनी एका प्रसिद्धीपत्रकात लिहिले आहे.

पाण्याच्या पुनर्वापरासाठी युरोपियन युनियनने काही नियम निश्चित केले आहे. युरोपियन युनियनने औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणे अनिवार्य आहे. प्रक्रिया करून शेतीयोग्य केलेले पाणी हे ४५ टक्के असू शकते. पाण्यावर प्रक्रिया करताना पाण्याच्या गुणवत्तेसाठी उत्तम यंत्र वापरणे आवश्यक आहे. आज मोठ्या औद्योगिक संस्थांकडे स्वतःचे प्रक्रिया यंत्र आहे. या यंत्रांमधून प्रक्रिया झालेले पाणी तेथील नद्यांमध्ये सोडले जाते.
परंतु, हे सर्वच क्षेत्रांसाठी वापरता येईल असे नाही. ही यंत्रे सर्व प्रदूषके फिल्टर करू शकत नाही. त्यामुळे हे प्रक्रिया केलेले पाणी घरगुती वापरासाठी उपयुक्त ठरत नाही. तसेच विशिष्ट वनस्पती आणि माती यांनाही हे सांडपाणी उपयुक्त ठरत नाही.
जर्मनीची फेडरल पर्यावरण एजन्सीच्या म्हणण्यानुसार, प्रक्रिया केलेले पाणी नद्यांमध्ये सोडणे धोकादायक ठरू शकते. प्रक्रिया केली तरीही ते पूर्णतः वापरण्यायोग्य होत नाही. पाण्यावर अधिक प्रक्रिया करायची असल्यास अधिक खर्च येतो. पाणी शुद्धीकरण आणि प्रक्रिया केंद्रे उभारली तर त्या केंद्रांचे शेतीपासूनचे अंतर अधिक असेल तर वहन खर्च वाढेल. ते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नाही. स्लोव्हेनिया, बल्गेरिया आणि पोलंड सारख्या देशांमध्ये असेच घडते आहे.

दक्षिण युरोपमध्ये पिकांचे उत्पादन का बदलत आहेत?

संशोधक बिअरकेन्स याच्या मतानुसार, शेतीमध्ये पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. पाण्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. ठिबक सिंचनचा पाणी बचतीसाठी शेती क्षेत्रामध्ये वापर करता येऊ शकतो. ज्या पिकांना कमी पाणी लागते अशा पिकांचे उत्पादन घेणे पाणी बचतीच्या दृष्टीने उपयुक्त आहे. इटली हे युरोपातील सर्वात मोठे भात पिकवणारे क्षेत्र आहे. भातशेतीत पाण्याचा भरपूर वापर होतो. इटलीमधील भातशेती ही पो नदीच्या किनाऱ्यावर वसलेली आहे. परंतु, हिमवर्षावाचा अभाव आणि पावसाचे कमी झालेले प्रमाण याचा भातशेतीला फटका बसला. इटालियन शेतकऱ्यांना भात उत्पादनाऐवजी मका किंवा गहू यांचे उत्पादन घेऊन अधिक फायदा होऊ शकतो.
हिवाळी गहू हे कमी पाण्यावर उत्पादित होणारे पीक आहे. हे लवकर वाढते आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस आधीच पिकते. त्यामुळे त्याला जास्त पाणी लागत नाही. परंतु, अशाप्रकारची पिके घेतल्यामुळे स्थानिक लोकांच्या आहारात बदल होऊ शकतो. २०२२ च्या उन्हाळ्यात जर्मन शेतकर्‍यांनाही पीकनुकसानीचा सामना करावा लागला. त्यातून धडा घेत त्यांनी उष्ण वातावरणात उत्पादित होणारी पिके घेण्यास सुरुवात केली. मसूर आणि चणे यांचे उत्पादन ते अधिक प्रमाणात घेऊ लागले.

पाण्याचा अपव्यय होण्याची कारणे

पाण्याच्या गळतीमुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. पाण्याच्या टाक्या किंवा नद्यांपासून घर किंवा शेतीपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी पाईप्स असतात. या पाईपमधून गळती होण्याचे प्रमाण अधिक असते. ४० ते ६० टक्के पाणी गळतीमुळे वाया जाते.