चीनच्या वुहान प्रांतातून सुरू झालेला करोना विषाणुसंसर्ग आता जपान, द. कोरिया, अमेरिका, इराण, इटलीसह जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. भारताचाही अर्थातच त्यात समावेश आहे. भारतामध्ये मृत्यूची आकडेवारी पसत्तीशीपार झाली आहे तर १३०० पेक्षा जास्त जणांना या विषाणूची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. तर इटलीनंतर सर्वाधिक मृत्यू हे स्पेनमध्ये आहेत. सध्या या व्हायरसबाबत हैराण करणारी करणारी गोष्ट म्हणजे, अनेक कोरोनाग्रस्त रूग्णांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तपासणीचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळेच डॉक्टरांची चिंता वाढली आहे. सर्वांसमोर प्रश्नचिन्ह उभं आहे की, एकदा कोरोनाची लागण झालेल्या लोकांना पुन्हा या व्हायरसची लागण होऊ शकते का? करोना व्हायरसच्या विळाख्यातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा या रोगाचा संसर्ग होऊ शकतो का?

चीन,जपान आणि इटलीमधील परिस्थिती आणि आकडे पाहिल्यास त्यातून असे निष्पण होते की, एकदा करोना झाल्यास पुन्हा संसर्ग होऊ शकतो. याचेचं एक उदाहरण म्हणजे, जपानमधली एक महिला उपचार घेऊन बरी झाली. पण नंतर तिला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं नुकतेच समोर आले. त्यामुळे एकदा कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यावर पुन्हा संसर्ग होऊ शकतो. आतापर्यंत समोर आलेल्या काही प्रसारमाध्यमांच्या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, हा व्हायरस तुमच्या शरिरात पुन्हा शिरकाव करू शकतो. पण, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तज्ञ्जांचं यावर अद्याप संशोधन सुरू आहे. या महामारीपासून बचाव करण्यासाठी औषधउपचारांचा शोध घेत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या साथीच्या रोगाला महामारी असे घोषित केले आहे. WHO च्या रिपोर्ट्सनुसार, करोना व्हायरस हा एका व्यक्तीपासून साधारण तीन व्यक्तींमध्ये आणि असं करत काही दिवसांतच १००० लोकांना आपल्या विळख्यात घेऊ शकतो.

कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतेही औषध अथवा प्रतिबंधात्मक लस उपलबद्ध नाही. रोगप्रतिकार शक्तीच्या बळावर रूग्णांना बरं केलं जातेय. त्यामुळे रूग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी डॉक्टर काम करत आहेत. करोना व्हायरसपेक्षा रूग्णाची रोगप्रतिकारक शक्ती जास्त ताकदवान ठरतेय, असंच सध्यातरी म्हणावं लागेल. त्यामुळे ठोस निष्कर्ष काढता येईल, असं संशोधन सध्या उपलब्ध नाही. रोगप्रतिकारशक्ती आधिक असल्यावर करोनावर मात करता येते. तसेच रोगप्रतिकारशक्ती जास्त असेल तर पुन्हा करोना व्हायरस होण्याची शक्यता धुसूर आहे.

Story img Loader