एका नव्या संशोधनानुसार असे लक्षात आले आहे की, युनायटेड स्टेट्समधील बहुतेक कॉन्टॅक्ट लेन्सेसमध्ये पीएफएएस (PFAS) सारखे रसायन वापरले जाते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो. पीएफएएसला कायमस्वरूपी रसायन (forever chemicals)देखील म्हटले जाते. संशोधकांच्या अभ्यासानुसार १८ प्रकारच्या लोकप्रिय कॉन्टॅक्ट लेन्सेसमध्ये पीएफएएस (PFAS)चे प्रमाण आढळून आले आहे. पीएफएएसमध्ये फ्लोरीनची मात्रा (फिकट पिवळ्या रंगाचा एक विषारी वायू) अधिक असते. पीएफएएस हे मानवनिर्मित रसायन असून त्याच्यामुळे कर्करोग, यकृत निकामी होणे आणि प्रजनन मस्या यांसारखे गंभीर आजार उद्भभवू शकतात. नक्की हे प्रकरण काय आहे? कॉन्टॅक्ट लेन्समुळे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका उद्भवू शकतो का?

पीएफएएस (PFAS) म्हणजे काय?

पीएफएएस (PFAS) हे मानवनिर्मित रसायन असून पर्यावरणात ते दीर्घकाळापर्यंत राहते. फ्लोरीन आणि कार्बन यांच्या संयुगातून १९४० च्या दरम्यान पीएफएएसची निर्मिती केली गेली. हे रसायन नष्ट होण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे त्याला कायमस्वरूपी रसायन असेही म्हटले गेले. आपण दैनंदिन जीवनात ज्या वस्तू वापरतो त्यात पीएफएएसचा सर्रास वापर केलेला असतो. जसे की, खाद्यपदार्थांचे पॅकेजिंग, टेक्स्टाईल, कॉस्मेटिक्स, दातांवरील उपचार, जेवणाची भांडी, गिर्यारोहण किंवा आऊटडोअर साहसी खेळांसाठी लागणारे साहित्य, औषधे, मेडिकल उपकरणे, रंग आणि इमारतींसाठी लागणारे साहित्य, गाडी आणि स्वच्छतेसाठी लागणाऱ्या उपकरणांमध्ये हे रसायन मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Demand to the judges to withdraw the ban on single use plastic in the court premises Mumbai print news
न्यायालयाच्या आवारातील एकेरी वापराच्या प्लास्टिकवरील बंदी मागे घ्या; वकील संघटनेची मुख्य न्यायमूर्तींकडे पत्रव्यवहाराद्वारे मागणी
hundred liver transplants at New Era Hospital in nagpur
अवयव दानाला बळ… मध्य भारतातील एकाच रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाचे शतक
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Union Health Minister confirms sudden deaths in India are not caused by COVID-19 vaccines, addressing public concerns about vaccine safety.
Deaths Due To Corona Vaccine : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
mazgaon bkc among most polluted areas due to nitrogen dioxide levels increase
माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल सर्वाधिक प्रदूषित; नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत वाढ

काही कायमस्वरूपी रसायने ही कर्करोग आणि प्रजननाशी संबंधित समस्यांसाठी कारणीभूत ठरतात. पर्यावरणाच्या आरोग्याशी निगडित एक संशोधन फेब्रुवारी महिन्यात बाहेर आले, ज्यामध्ये असे आढळले की, पर्यावरणातील पीएफएएसच्या अस्तित्वामुळे मानवी शरीराच्या विकासात अडचणी, हृदयाशी संबंधित आजार आणि इतर अनेक प्रकारचे कर्करोग असे अनेक गंभीर आजार निर्माण झाले आहेत.

या अभ्यासात असेही नमूद करण्यात आले आहे की, अनेक लोकांचे रक्त रसायनमिश्रित झाले आहे.

मागच्या वर्षी एका पीअर रिव्ह्यूव्ड (peer-reviewed) (म्हणजे एकाच विषयातील अनेक तज्ज्ञांनी एकत्र येऊन केलेल्या संशोधनाचा दस्तऐवज) अहवालानुसार असे समोर आले की, सिंथेटिक रासायनिक प्रदूषकांचे प्रमाण वातावरणात इतक्या खोलवर पसरले आहे की, त्याने आता धोक्याची घंटा वाजविली आहे.

कॉन्टॅक्ट लेन्सवर केलेल्या प्रयोगात काय आढळले?

‘गार्डियन’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ममावेशन (मातांमध्ये रासायनिक वस्तूंबद्दल जागृती निर्माण करणारी वेबसाईट) आणि एन्व्हायर्नमेंटल हेल्थ न्यूज पब्लिक हेल्थ ब्लॉग्ज यांनी रसायनांचा धोका मानवी शरीराला कसा पोचतो? यासंबंधी एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सीच्या प्रयोगशाळेत एक प्रयोग राबविला. यूएसमधील लोकप्रिय ब्रँडच्या कॉन्टॅक्ट लेन्सेसची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. या लेन्सेसमध्ये सेंद्रिय फ्लोरीनचे प्रमाण किती आहे, हे तपासले गेले. लोकप्रिय ब्रँडच्या लेन्सेसमध्ये रसायनाचे प्रमाण १०५ पीपीएमपासून २०,७०० पीपीएमपर्यंत (PPM – Parts Per Million) असल्याचे आढळले. सदर प्रमाण हे ठरवलेल्या पातळीपेक्षा जास्त आहे.

तीन कॉन्टॅक्ट लेन्सेसमध्ये सेंद्रिय फ्लोरीनचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळले. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाचे संशोधक आणि कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या प्रयोगाचे शास्त्रीय सल्लागार स्कॉट बेल्कर म्हणाले की, लेन्सेस या शुद्ध पीएफएएस असतात. पीएफएएस हे सॉफ्ट प्लास्टिक मटेरियलचे सार आहे. पीएफएएसमध्ये असे गुण आहेत, जे डोळ्यासाठी आवश्यक असतात. ऑक्सिजन मिळणे आणि लेन्सेसखाली जिवाणू न वाढणे, तसेच लेन्सेस गुळगुळीत आणि आरामदायक राहण्यासाठी हे रसायन वापरले जाते.

पाणीपुरवठा करण्यासाठी पीएफएएसचा वापर

या प्रयोगदरम्यान असेही आढळून आले की, अमेरिकेत नागरिकांसाठी जे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते त्यातही मोठ्या प्रमाणात पीएफएएससारखी घातक रसायने मिसळली असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती न्यूज डॉट कॉम एयूने दिली. एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सीच्या प्रयोगशाळेतील प्रयोगातून हे निष्पन्न झाले आहे.

एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सीने मार्च महिन्यात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात वापरली जाणारी हानिकारक ज्याला कायमस्वरूपी रसायने म्हणतो, यांचा वापर कमी करण्यास सांगितले. ईपीएच्या नव्या नियमावलीनुसार, सार्वनजिक पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा करताना वापरण्यात येणारी पीएफएएस रसायने कमी करण्याचा सल्ला दिला आहे. ईपीएचे प्रशासक मायकेल रेगन म्हणाले की, पिण्याच्या पाण्यासंदर्भातील नवी नियमावली हजारो लोकांचे मृत्यू आणि कितीतरी पटींनी पीएफएएशी संबंधित आजारांना आळा घालू शकते.

रेगन पुढे म्हणाले, ही विषारी रसायने पर्यावरणात अतिशय व्यापक प्रमाणात पसरली असून ती दीर्घकाळ टिकणारी आहेत. अन्न, माती आणि पाण्यातदेखील अशी रसायने आढळत आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मानवी वस्ती नाही, अशा भागातही त्यांचे अस्तित्व आढळले आहे. पीएफएएससारखी रसायने मानवी शरीरात दीर्घ काळापासून साचत आली आहेत, ज्यामुळे गंभीर आजार, कर्करोग, यकृत खराब होणे आणि कोलेस्ट्रॉल यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात.

मागच्या काही वर्षांपासून अमेरिकेतील अनेक महानगरपालिकांनी काही पीएफएएस रसायनांचा वापर बंद केला आहे. काही राज्यांनी तर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेत अशा प्रकारची रसायने वापरण्यास निर्बंध आणले आहेत. ईपीएने सादर केलेल्या नियमावलीवर या वर्षाच्या अखेरीपर्यंत काम केले जाणार आहे. पिण्याच्या पाण्यात पीएफएएसच्या प्रमाणाबाबत एक राष्ट्रीय धोरण ठरविण्यात येणार आहे.

धक्कादायक म्हणजे अमेरिकेमधील २०० दशलक्षहून अधिक लोकांच्या घरातील नळाला पीएफएएसयुक्त पाणी येते, अशी माहिती एन्व्हायर्नमेंटल वर्किंग ग्रुपचे उपाध्यक्ष स्कॉट फायबर यांनी दिली. कित्येक दशकांपासून अमेरिकन नागरिक दूषित पाणी पित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी द्विपक्षीय पायाभूत सुविधा विधेयक मंजूर करून २०२१ साली नऊ अब्ज डॉलरची तरतूद केली आहे. या निधीच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षांत अमेरिकेतील पिण्याच्या पाण्यातील पीएफएएस रसायनांचे प्रमाण कमी करण्याचे लक्ष्य प्रशासनाला देण्यात आले आहे.

Story img Loader