कॅनडात सध्या डॉक्टरांची कमी असल्याने कॅनडा सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. नुकताच कॅनडा सरकारने कायमस्वरुपी रहिवासी दर्जाच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे सध्या कॅनडामध्ये तात्पुरते रहिवासी असलेल्या डॉक्टरांना आता कॅनडामध्ये कायस्वरुपी राहता येणार आहे. कॅनडा सरकारने या नियमांमध्ये नेमके काय बदल केले आहेत आणि कायस्वरुपी रहिवासी दर्जा नेमका काय असतो, जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – विश्लेषण : सागरी मार्गानेच मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी का होते? देशात कोट्यवधींचे अमली पदार्थ नेमके कुठून येतात?

डॉक्टरांना नेमक्या काय अडचणी होत्या?

‘एक्सप्रेस एन्ट्री प्रोग्राम’द्वारे विदेशील डॉक्टरांना कॅनडामध्ये कायस्वरुपी राहणासाठी ‘सेवा शुल्क’ भरावे लागत होते. इतर नोकरी करणाऱ्यांना लागणाऱ्या शुल्कापेक्षा ते वेगळे होते. तसेच या डॉक्टरांचा स्वयंरोजगार करणाऱ्यांमध्ये समावेश होत होता. त्यामुळे कायमस्वरुपी रहिवासी दर्जा मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत होता.

नियमांत नेमके काय बदल केले आहेत?

कॅनडामध्ये तात्पुरते राहाणाऱ्या डॉक्टरांना आता कॅनडामध्ये कायमस्वरुपी राहणाऱ्याची प्रक्रिया सोप्पी करण्यात आल्याची माहिती कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री सीयन फ्रेझर यांनी दिली आहे. ”डॉक्टरांसाठी असलेला स्वयंरोजगाराचा अडथळा आता दूर करण्यात आला असून डॉक्टरांना कायमस्वरुपी कॅनडामध्ये राहणे सोप्पे झाले आहे. विदेशातील डॉक्टर आमच्या जनतेची काळजी घेत आहेत. त्यांचे कौशल्य आमच्यासाठी अमुल्य ठेवा आहे”, अशी प्रतिक्रिया सीयन फ्रेझर यांनी दिली आहे. नियमांमधील बदलांशिवाय इतरही अनेक योजना कॅनडा सरकारकडून राबविण्यात येत आहेत. जून २०२२ पर्यंत कॅनडा सरकारने ४३०० डॉक्टर आणि आरोग्य सेवकांना आरोग्यसेवेत सामावून घेतले आहेत.

कायमस्वरुपी रहिवासी दर्जा म्हणजे काय?

कॅनडामध्ये तुम्हाला कायमस्वरुपी राहायचे असेल, तर तुमच्याकडे पीआर कार्ड ( Permanent Residents Card) असणे आवश्यक आहे. हे कार्ड कायमस्वरुपी जरी असले तरी ठराविक मुदतीनंतर त्याचे नूतनीकरण करावे लागते. पीआर कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला कॅनडामध्ये कायमस्वरुपी राहता येत असले तरी याचा अर्थ तुम्हाला कॅनडाचे नागरिकत्व मिळाले असा होत नाही.

हेही वाचा – विश्लेषण: ‘आयुष्मान भारत’ची चार वर्षे… नागरिकांसाठी किती उपयुक्त? अजूनही कोणत्या समस्या?

कायमस्वरुपी रहिवासी दर्जा मिळाल्याचे फायदे काय?

कायमस्वरुपी रहिवासी दर्जा मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीला कॅनडातील नागरिकांना मिळणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. तसेच कॅनडामध्ये कुठेही कामासाठी, शिक्षणासाठी जाता येते. तसेच त्या व्यक्तीला कायदेशीर संरक्षणही दिले जाते. मात्र, त्यांना निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नसतो. तसेच कोणत्याही पक्षात त्यांना प्रवेश घेता येत नाही. कायमस्वरुपी रहिवासी दर्जा मिळण्यासाठी तुम्हाला कॅनडामध्ये ७३० दिवस राहणे बंधनकारक आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Canada government make changes for doctors to become permanent residents spb
Show comments