नासा (NASA) आणि इस्रो (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या अवकाश मोहिमेचे बिगुल आता वाजले आहे. या दोन्ही मोठ्या संस्थांनी एकमेकांबरोबर केलेल्या संयुक्त कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये (international space station) अंतराळवीर पाठवण्याचे निश्चित करण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गतच आता एका भारतीयाला अवकाश प्रवास करणे शक्य होणार आहे. भारतीय वायू दलातील अधिकारी ग्रुप कॅप्टन सुधांशू शुक्ला यांची ‘प्राईम अस्ट्रॉनॉट’ (प्रमुख अंतराळवीर) म्हणून अवकाश मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल ४० वर्षांनी भारतीय व्यक्ती पुन्हा एकदा अंतराळात झेपावणार आहे.

हेही वाचा : राहुल गांधींकडून सद्य राजकारणाला चक्रव्यूहाची उपमा; काय आहे महाभारतातील चक्रव्यूह नि अभिमन्यूचा पराक्रम?

PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
DoT recruitment 2024 Apply for Sub Divisional engineer salary up to Rs 151100
DoT recruitment 2024: सब-डिव्हिजन इंजीनिअरच्या पदासाठी होणार भरती;१,५१,१०० रुपयांपर्यंत मिळेल पगार, आताच करा अर्ज
On December 13 and 14 there will also meteor shower in space and feast for astronomy lovers
आकाशात १३, १४ डिसेंबरला उल्कावर्षाव; पृथ्वी लहान-मोठ्या कणांजवळून…
International Space Station
भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा, नाव ठरलं ‘भारतीय….’
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Venkatesh Iyer Completed His MBA and Now Pursuing PhD in Finance
IPL 2025: आयपीएल लिलावात २३ कोटींपेक्षा जास्त बोली अन् आता होणार डॉक्टर, कोण आहे हा खेळाडू?
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?

सुधांशू शुक्ला यांच्यासह राखीव अंतराळवीर म्हणून भारतीय वायू दलातील आणखी एक अधिकारी ग्रुप कॅप्टन प्रशांत बाळकृष्ण नायर यांची निवड करण्यात आली आहे. हे दोन्हीही ‘गगनयात्री’ भारतीय हवाई दलाचे अधिकारी असून ते या अंतराळ मोहिमेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या वर्षी ऑक्टोबर महिन्यानंतर हे मिशन कधीही राबवले जाऊ शकते. सर्व भारतीयांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे हे निश्चित; कारण विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या अंतराळ प्रवासानंतर जवळपास ४० वर्षांनंतर एखादा भारतीय अंतराळात पुन्हा एकदा झेपावणार आहे. राकेश शर्मा यांचा अंतराळ प्रवास हा १९८४ साली सोव्हिएत अवकाशयानातून झाला होता. इस्रोच्या ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटरने (HSFC) अमेरिकेमधील Axiom Space Inc बरोबर करार केल्यानंतर ही मोहीम निश्चित झाली आहे. Axiom Space Inc ही एक स्पेस इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर कंपनी असून दोहोंमधील हा करार Axiom-4 या मिशनसाठी झाला आहे.

कोण आहेत शुभांशू शुक्ला?

नुकतीच विंग कमांडर पदावरून बढती झालेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे मूळचे उत्तर प्रदेशमधील लखनौचे आहेत. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९८५ रोजी झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, वयाच्या १४ व्या वर्षी १९९९ साली झालेल्या कारगील युद्धातील शौर्याच्या कथा ऐकतच त्यांची जडणघडण झाली. त्याचवेळी त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा अंतराळवीर होण्याचा प्रवासही इथूनच सुरू झाला असे म्हणता येईल. कारण या शौर्य कथांनीच त्यांना सशस्त्र दलात सामील होण्याची प्रेरणा दिली, तसेच त्यांच्या महत्त्वाकांक्षांनाही आकार दिला. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, शुभांशू शुक्ला यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधून (National Defence Academy – NDA) पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांची १७ जून २००६ रोजी भारतीय हवाई दलामध्ये नियुक्ती झाली. ते सशस्त्र दलामध्ये सामील होणारे त्यांच्या कुटुंबातील पहिलेच सदस्य ठरले. आपल्या कारकिर्दीबाबत बोलताना शुक्ला यांनी ही एक ‘रोलरकोस्टर राईड’ होती, असे वर्णन केले आहे. शुभांशू शुक्ला यांनी टॅक्टिक्स अँड कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (TACDE) स्कूलमधून फायटर कॉम्बॅट लीडरचा कोर्स केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये टेस्ट पायलट म्हणून त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शुक्ला यांना Su-30MKI, MIG-21, MIG-29, Jaguar, Domnier, BAe Hawk आणि An-32 यांसह विविध लढाऊ विमानांमधून सुमारे दोन हजार तासांच्या उड्डाणाचा देदीप्यमान असा अनुभव आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना प्रेमाने गुंजन या टोपण नावानेच संबोधले जाते. शुभांशू हे आपल्या तीन भावंडांमध्ये सर्वांत लहान असून त्यांना चार वर्षांचा लहान मुलगा आहे. ३९ वर्षीय शुभांशू शुक्ला हे या ISS मोहिमेसाठी निवडले गेलेले सर्वात तरुण अंतराळवीर ठरले आहेत.

कोण आहेत कॅप्टन प्रशांत बालकृष्णन?

शुभांशू शुक्ला यांच्यासमवेतच राखीव अंतराळवीर म्हणून ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन यांचीही निवड करण्यात आली आहे. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९७६ रोजी केरळमधील तिरुवाझियाद येथे झाला. तेदेखील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. वायुसेना अकादमीमध्ये त्यांना ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ हा पुरस्कार मिळाला असून त्यांना १९९८ मध्ये भारतीय वायू सेनेमध्ये नियुक्त करण्यात आले होते. त्यांना तीन हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांना टेस्ट पायलट म्हणूनही कामाचा अनुभव आहे.

हेही वाचा : विश्लेषण: महाराष्ट्र ठरू लागलाय नेमबाजांची खाण? स्वप्निल कुसळे, अंजली भागवत, राही, तेजस्विनी यांच्या यशाचे रहस्य काय?

‘गगनयान मोहिमे’चीही तयारी सुरू

भारताची अवकाश संस्था इस्रो (ISRO) ‘गगनयान मोहिमे’द्वारे स्बबळावर अवकाशात भारतीय अंतराळवीर पाठवण्याची तयारी करत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे शुभांशू शुक्ला हे याच भारताच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेसाठी निवडलेल्या हवाई दलातील चार अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. ‘गगनयान’ असे या मोहिमेचे नाव असून ही मोहीम पुढील वर्षी नियोजित आहे. याआधीच या चार जणांचे अवकाश प्रवासासाठी आवश्यक लागणारे प्रशिक्षण सुरूही झाले आहे.

काय आहे Axiom-4 मिशन?

Axiom-4 हे मिशन ‘नासा’च्या सहकार्याने पार पडणार आहे. खाजगी अंतराळ कंपनी म्हणून ओळख असलेल्या Axiom Space चे हे चौथे मिशन असून यावर्षी ऑक्टोबरनंतर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे हे अवकाशयान झेपावणार आहे. या मोहिमेत एकूण चार जण अवकाश प्रवास करून अवकाश स्थानकात जाणार आहेत. ही मोहीम एकूण १४ दिवसांची असणार आहे. या मोहिमेमध्ये भारतीय अंतराळवीरांसह अमेरिका, पोलंड आणि हंगेरी या देशांचे अंतराळवीर असतील. प्रसिद्ध Space X कंपनीचे रॉकेट आणि त्याच कंपनीची Crew Dragon हे अवकाश यान याद्वारे हा सर्व प्रवास होणार आहे. भारतीय अंतराळवीर निवड मंडळाने भारतीय वायुसेनेच्या (IAF) टेस्ट पायलट्सच्या गटातून चार अंतराळवीरांची निवड केली आहे. त्यामध्ये ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, विंग कमांडर शुभांशू शुक्ला अशी त्यांची नावे आहेत. स्पेसएक्स क्रू ड्रॅगन अंतराळयान फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण करेल. यासाठी फाल्कन ९ रॉकेट वापरण्यात येणार आहे. शुक्ला यांच्याबरोबरच क्रूमध्ये पोलंड, अमेरिका आणि हंगेरीचे अंतराळवीरही असतील.

Story img Loader