ISRO Chandrayaan-3 Moon Landing Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (Isro) हाती घेतलेल्या चांद्रयान-३ मोहिमेतील लँडर मॉड्युल मुख्य यानापासून (प्रोपल्शन मॉड्युल) काल (१७ ऑगस्ट) वेगळे झाले. त्यानंतर इस्रोने आपल्या एक्स हँडलवर (पूर्वीचे नाव ट्विटर) लिहिले की, “प्रवासाबद्दल धन्यवाद, सोबती!” लँडर चंद्राच्या पृष्ठभागापर्यंत २६ किलो वजनाचे रोव्हर नेणार असून, त्या माध्यमातून पृष्ठभागावर अनेक संशोधन केले जाणार आहे. बुधवार, २३ ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांच्या आसपास लँडर पृष्ठभागावर उतरण्याची अवघड क्रिया पार पाडली जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी चांद्रयान-३ मोहिमेच्या माध्यामातून इस्रोचा हा दुसरा प्रयत्न आहे. चांद्रयान-२ मोहिमेत शेवटच्या टप्प्यावर लँडर कोसळले होते.
आता यापुढे काय होणार?
लँडिग मॉड्युलचा प्रवास धीम्या वेगाने चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने सुरू होणार आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार १८ ऑगस्ट रोजी नियोजित डी-बूस्टिंग केल्यानंतर लँडर मॉड्युलची चंद्राभोवतीची कक्षा अधिक घटविली जाणार आहे. एकूण दोन वेळा लँडर चंद्राभोवतीची कक्षा कमी करील. पहिल्यांदा १०० X १०० किमींच्या कक्षेत परिभ्रमण केल्यानंतर लँडर चंद्राच्या पृष्ठभागाच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करील. दुसऱ्या टप्प्यात ही कक्षा आणखी कमी करून कमाल कक्ष (ॲपोल्युशन) १०० किलोमीटर आणि किमान कक्षा ३० किमी झाल्यानंतर २३ ऑगस्ट रोजी लँडरची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर अलगदपणे उतरण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल.
अवतरण्याच्या प्रक्रियेतील आव्हाने?
इस्रोने याआधी चांद्रयान-२ च्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर उतरविण्याचा प्रयत्न केला होता. अंतिम टप्प्याच्या आधीपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, लँडरला अलगदपणे पृष्ठभागावर उतरविण्यासाठी जेवढा वेग कमी करण्याची आवश्यकता होती, तेवढा वेग सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरला कमी करता आला नाही. अवकाशात पृष्ठभागावर अलगदपणे उतरणे हे सर्वांत कठीण असे काम आहे. त्यासाठी अतिशय प्रगत अशा तांत्रिक क्षमतांची आवश्यकता आहे.
नासाने मंगळ ग्रहावर राबविलेल्या रोव्हर मिशनचे शास्त्रज्ञ अमिताभ घोष यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना लँडिंगच्या प्रक्रियेबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, “अंतराळात एखादे यान विमानाच्याही १० पट वेगाने प्रवास करीत असते. कल्पना करा, असा प्रचंड वेग असताना पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरण्यासाठी यानाला जवळपास स्थिर थांबविणे आवश्यक असते. हे सर्व काही मिनिटांत होत असते आणि तेही अंतराळात कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय. सॉफ्ट लँडिगमधील हेच सर्वांत कठीण आणि महत्त्वाचे कार्य असते”
यावेळी सॉफ्ट लँडिग करण्यासाठी इस्रोने चांद्रयान-३ च्या लँडर मॉड्युलमध्ये लक्षणीय असे बदल केले आहेत. चांद्रयान-३ मधील पाय (Legs / Stilts) आणखी मजबूत करण्यात आले आहेत; जेणेकरून यावेळी पृष्ठभागावर अलगद उतरणे, लँडर स्थिर करणे शक्य होईल. ‘चांद्रयान-२’पेक्षाही अधिक इंधन वाहून नेण्याची क्षमता ‘चांद्रयान-३’मध्ये आहे. लँडर उतरत असताना आवश्यकता भासल्यास लँडिग साइटमध्ये शेवटच्या क्षणी बदल करता येण्यासाठी इंधन क्षमतेमध्ये वाढ करण्यात आली आहे. चांद्रयान-३ वर अतिरिक्त नेव्हिगेशनल आणि मार्गदर्शक उपकरणे बसविण्यात आली आहेत; ज्यामुळे लँडरचा वेग आणि इतर आवश्यक सुधारणा यांचे सतत निरीक्षण करणे सोपे होणार आहे.
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणावेळी सांगितले होते की, मागच्या दोन वर्षांत आम्ही अनेक शक्यता पडताळून पाहिल्या असून, त्यावर आधारित प्रयोग केले आहेत. त्यानंतरच आम्ही ‘चांद्रयान-३’चे प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा >> ‘चांद्रयान-३’ मध्ये केले आहेत नवीन बदल; यावेळी चांद्रयानचे यशस्वी लँडिग करणार?
चंद्राच्या पृष्ठभागावरील वैज्ञानिक मोहिमा
लँडर मॉड्युलचे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर ‘प्रग्यान’ रोव्हर बाहेर पडून त्याचे कार्य सुरू करील. रोव्हरवर दोन पेलोड्स (payloads- सामान वाहून नेण्यासाठी असलेली जागा) आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावरील रासायनिक व खनिज रचनेचा अभ्यास करण्यासाठी आणि चंद्रावरील माती, तसेच खडकांमधील मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम व लोह यांसारख्या घटकांची तपासणी करण्यासाठी या ‘पेलोड्स’ची रचना करण्यात आली आहे.
चांद्रयान-३ रोव्हर चंद्रावर एक दिवस काम करील एवढी क्षमता आहे. चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील १४ दिवसांचा काळ आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या रात्रीच्या थंड तापमानात टिकून राहण्यासाठी थर्मल इन्सुलेशनचा अभाव असल्यामुळे हा काळ कमी ठेवण्यात आला आहे.
विक्रम लँडरला चार वैज्ञानिक पेलोड्स आहेत. चंद्रावरील भूकंप, पृष्ठभागावरील उष्णता, पृष्ठभागावरील प्लाझ्मा आणि चंद्र व पृथ्वीमधील अचूक अंतर दाखविण्यासाठीचे प्रात्यक्षिक करण्यासाठी हे चार पेलोड्स मदत करणार आहेत. चौथा पेलोड नासाकडून घेण्यात आला आहे.
प्रोपल्शन मॉड्युलचे काय?
प्रोपल्शन मॉड्युल (मूख्य यान)पासून लँडर आणि रोव्हर वेगळे झाल्यामुळे इथून पुढे सर्व लक्ष त्यांच्यावर असणार आहे. दरम्यानच्या काळात प्रोपल्शन मॉड्युल चंद्राभोवतीच्या कक्षेत भ्रमण करत राहील. यानावरील पेलोडच्या माध्यमातून पृथ्वीचा अभ्यास केला जाईल. स्पेक्ट्रो-पोलरीमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (SHAPE) च्या माध्यमातून अंतराळातून जीवनाचे रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करणार आहेत. लँडर आणि रोव्हरची कार्य करण्याची क्षमता संपल्यानंतरही प्रोपल्शन मॉड्युल हे अनेक वर्षे चंद्राच्या कक्षेत भ्रमण करू शकते, अशी माहिती इस्रोने दिली आहे.