Charan Singh Got Indira Gandhi arrested : भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा २३ डिसेंबर हा जन्मदिन दरवर्षी ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. चरणसिंग हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते. त्यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ अवघा महिनाभराचा होता. तरी देखील चरणसिंह यांची राजकीय कारकीर्द अत्यंत संस्मरणीय होती, ज्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काम केले. चरणसिंह हे गृहमंत्री असताना त्यांच्या आदेशानुसार माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? सविस्तर जाणून घेऊया…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आणीबाणीनंतर देशात जनता पार्टीचे सरकार
२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगत देशांतर्गत आणीबाणी जाहीर केली होती. या काळात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले. २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. इंदिरा गांधी यांची लोकप्रियता अत्यंत कमी झाली होती. राजकारणात पुनरागमन करण्याची त्यांची कोणतीही शक्यता नव्हती. मात्र, हत्तीवर स्वार होऊन त्यांनी सत्तेत येण्याची किमया करून दाखवली.
हेही वाचा : Congress Views on Savarkar : काँग्रेसचे सावरकरांबद्दलचे विचार कसे कठोर होत गेले?
त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे, देशात जनता पार्टीचे सरकार असताना २७ मे १९७७ रोजी बिहारच्या बेलछी येथे काही दलित बांधवांना मारहाण करून जिवंत जाळण्यात आलं होतं. इंदिरा गांधी यांच्या कानावर ही घटना पडताच त्यांनी बेलछी गावात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, रस्ते अत्यंत खराब असल्याने त्यांच्या ताफ्याला घटनास्थळी पोहोचण्यास अनेक अडचणी येत होत्या. अखेरीस इंदिरा गांधी यांनी हत्तीवर स्वार होऊन बेलछी गावाला भेट दिली. त्यांच्या या धाडसी वृत्तीवर अनेकजण प्रभावित झाले होते. पीडितांची भेट घेतल्यानंतर इंदिरा गांधी यांनी रायबरेली, गुजरात आणि बॉम्बेचा (मुंबई) दौरा केला. तिथे जनतेतून त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. इंदिरा गांधी यांची लोकप्रियता पुन्हा वाढत असल्याने जनता सरकारच्या चिंतेत भर पडली.
इंदिरा गांधींना अटक का झाली होती?
त्यावेळी मोरारजी देसाई यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे होती. तर चौधरी चरणसिंह हे गृह मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या आदेशावरून सेंट्रल करप्शन ब्युरोने (सीबीआय) इंदिरा गांधींविरोधात भ्रष्टाचाराचे आरोपपत्र तयार केले. ३ ऑक्टोबर १९७७ रोजी पोलीस इंदिरा गांधी यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी माजी पंतप्रधानांना हरियाणातील एका विश्रांतीगृहात नेण्याची पोलिसांची योजना होती. परंतु इंदिरा गांधी यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याने पोलीस त्यांना किंग्सवे कॅम्पमधील न्यू पोलिस लाईन्स येथे घेऊन गेले. जिथे त्यांना संपूर्ण रात्र घालवावी लागली.
अटकेनंतर इंदिरा गांधी काय म्हणाल्या होत्या?
वॉशिंग्टन पोस्टमध्ये त्यावेळी प्रकाशित झालेल्या एका वृत्तात म्हटले आहे की, “पोलीस जेव्हा इंदिरा गांधी यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले, तेव्हा त्यांनी हातात बेड्या घालून घरातून नेण्याची मागणी केली. परंतु, पोलिसांनी इंदिरा गांधी यांची विनंती नाकारली.” ४ ऑक्टोबर १९७७ रोजी इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तात इंदिरा यांनी त्यांच्या अटकेचे वर्णन राजकीय असे केले होते. “माझ्यावर कितीही आरोप केले जात असले तरीही अटक राजकीय आहे. दुःख आणि अन्याय पाहिल्यावर मी अजिबात शांत राहू शकत नाही. जरी मी प्रवास करू शकत नाही, तुमच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधू शकत नाही, तरी मी मनापासून तुमच्याबरोबर आहे आणि यापुढेही राहीन. तुम्ही सगळ्यांनी शांतता राखावी, कोणत्याही व्यक्तीच्या कृत्याने तुमचा आत्मनिर्धार कमी होऊ देऊ नका”, असे इंदिरा गांधी यांनी अटकेनंतर म्हटलं होते.
इंदिरा गांधींवर कोणते आरोप होते?
इंदिरा गांधी यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. “पहिल्या प्रकरणात त्यांच्यावर विविध मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी जीप खरेदी करणे, सेठींसह इतर ५ जणांबरोबर गुन्हेगारी कट रचणे, आपल्या अधिकृत पदाचा दुरुपयोग करणे, असे आरोप करण्यात आले होते. तर दुसरे प्रकरण हे ONGC आणि फ्रेंच तेल कंपनी CFP यांच्यात झालेल्या कराराशी संबंधित होते. ज्यामध्ये ‘मुंबई हाय फील्ड’ या समुद्रातील ड्रिलिंग ऑपरेशन्सच्या तिसऱ्या टप्प्यासाठी CFP कडून सल्लागार सेवा मिळवण्याचा करार केला गेला होता, असे वृत्त त्यावेळी इंडियन एक्स्प्रेसने दिले होते.
हेही वाचा : काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता? काय घडलं होतं तेव्हा?
इंदिरा गांधींनी तुरुंगात काढली होती रात्र
इंदिरा गांधी यांना अटक करून एक रात्र तुरुंगात ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्यांना अतिरिक्त महानगर दंडाधिकारी आर. दयाल यांच्यासमोर हजर केले. यावेळी दंडाधिकाऱ्यांनी तात्काळ इंदिरा गांधी यांच्या सुटकेचे आदेश दिले. सुनावणीवेळी दंडाधिकारी म्हणाले होते की, “आरोप खरे आहेत यावर विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही.” दरम्यान, तुरुंगात रात्र काढल्यानंतर इंदिरा गांधी बाहेर आल्या. परंतु, लवकरच त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. १९७८ मध्ये इंदिरा गांधी चिकमंगळूर लोकसभा मतदासंघातून निवडून आल्या होत्या. १९७४ मध्ये पंतप्रधान असताना त्यांचे पुत्र संजय गांधी यांच्यावर मारुती कारखान्याच्या तपासात अडथळा आणल्याचा आरोप झाला. यावरून विरोधकांनी त्यांच्याविरोधात लोकसभेत विशेषाधिकार प्रस्ताव आणला. यामुळे इंदिरा गांधी यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच एका आठवड्यासाठी पुन्हा तुरुंगात जावे लागले. यामुळे त्या आणखी लोकप्रिय झाल्या.
इंदिरा गांधींनी चरणसिंह सरकारला दिला होता पाठिंबा
दरम्यान, जनता पार्टीमध्ये दिवसेंदिवस अंतर्गत कलह वाढत चालला होता. त्यातच अनेक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे मोरारजी देसाई यांच्या सरकारचे बहुमत कमी झाले. त्यानंतर झालेल्या गोंधळात इंदिरा गांधी यांनी चौधरी चरणसिंह यांच्या गटाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. २८ जुलै १९७९ रोजी चरणसिंह यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र, ते कधीही संसदेला सामोरे गेले नाहीत. कारण, इंदिरा गांधींनी अवघ्या २३ दिवसांतच पाठिंबा काढून घेतल्याने चरणसिंह यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला.
त्यावेळी चौधरी चरणसिंह यांनी एका निवेदनात असे म्हटले होते की, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्याविरोधात अनेक खटले दाखल करण्यात आले होते. यातील काही खटले मागे घेण्याची विनंती करत त्यांनी आमच्या सरकारला पाठिंबा दिला. मात्र, आम्ही फक्त सत्तेत राहण्यासाठी आणीबाणीला जबाबदार असलेल्या व्यक्तींवरील खटले मागे घेतले असते, तर देशाने आम्हाला माफ केले नसते.”