History of chess in India: अलीकडेच ग्रँडमास्टर गुकेश दोम्माराजूने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करत बुद्धीबळातील जगज्जेतेपद खेचून आणले. हा केवळ त्याचा विजय नाही तर त्या निमित्ताने पुन्हा एकदा बुद्धिबळाच्या जन्मभूमीकडे जगज्जेतेपद परतले आहे. जागतिक पातळीवर बुद्धिबळाचे जन्मस्थान भारत असे मानले जरी जात असले तरी चीनकडून मात्र या खेळाचे जन्मस्थान चीनमध्येच असल्याचा दावा अनेकदा करण्यात आला आहे, त्याच पार्श्वभूमीवर या खेळाची नक्की जन्मभूमी कोणती? याचा घेतलेला हा आढावा! नशिबावरही मात करता येऊ शकते, हे शिकवणारा एकमेव खेळ म्हणजे बुद्धिबळ. केवळ बुद्धी आणि तंत्रकौशल्याच्या बळावर या खेळात यश मिळवता येते. म्हणूनच अगदी प्राचीन कालखंडापासून या खेळाचे बाळकडू देण्याची परंपरा भारतात होती. चतुरंग म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या खेळाने पर्शिया (इराण), अरेबिया, युरोप असा दीर्घ प्रवास करत आजचे आधुनिक स्वरूप प्राप्त केले आहे. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’चे अध्यक्ष सर विल्यम जोन्स, ऑक्सफर्डचे टॉमस हाइड तसेच मरी, स्टॉन्टन इ. अनेक संशोधकांनी बुद्धिबळाचा उगम भारतातच झाल्याचे त्यांच्या संशोधनातून दाखवून दिले आहे. डॅनियल किंग यांनी त्यांच्या सुलतान खान या पुस्तकात १९२९ च्या ब्रिटिश चेस मॅगझिनचा संदर्भ दिला आहे. ब्रिटिश चेस मॅगझिनच्या अहवालातही भारताला बुद्धिबळाची भूमी असे संबोधले आहे. त्यामुळेच भारतातील बुद्धिबळाचे प्राचीन पुरावे काय सांगतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा