प्रवाहाच्या विरोधात जाण्याची आणि धाडसी निर्णय घेण्याची वृत्ती पाच वेळच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला इतर बुद्धिबळपटूंपेक्षा वेगळा बनवते. मात्र, त्याची हीच वृत्ती काही वेळा त्याचेच नुकसान करते. सध्या सुरू असलेल्या जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत हेच पाहायला मिळाले. या स्पर्धेसाठी विशिष्ट ड्रेसकोड (पेहरावसंहिता) लागू करण्यात आला होता. मात्र, कार्लसनकडून त्याचे पालन करण्यात आले नाही. त्यानंतर स्पर्धेच्या आर्बिटरकडून (पंच) कार्लसनला पेहराव बदलून येण्याची सूचना करण्यात आली. मात्र, त्याने तसे न करता थेट स्पर्धेतून बाहेर पडणे पसंत केले.

बुद्धिबळ स्पर्धांत ड्रेसकोड काय?

जागतिक बुद्धिबळ महासंघ अर्थात ‘फिडे’कडून प्रत्येक स्पर्धेसाठी कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावेत याबाबत बुद्धिबळपटूंना आधीच सूचना दिल्या जातात. या ड्रेसकोडचे कोणी उल्लंघन केल्याचे स्पर्धेच्या आर्बिटरला आढळून आल्यास प्रथम त्या खेळाडूला ताकीद देऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यानंतर त्याला योग्य ते कपडे परिधान करून पुन्हा खेळण्याची परवानगी दिली जाते. सामान्यतः मोठ्या, प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ स्पर्धांत सूट आणि फॉर्मल शूज असा ड्रेसकोड असतो. मैत्रीपूर्ण लढती किंवा खुल्या स्पर्धांमध्ये सहसा हवे ते कपडे परिधान करण्याची मुभा दिली जाते.

Ranji Trophy 2025 Virat kohli eats Chilli Paneer in lunch during Delhi vs Railways match at Arun Jaitley Stadium Canteen vbm 97
Ranji Trophy 2025 : विराटने लंचब्रेकमध्ये छोले-भटूरे नव्हे तर ‘या’ पदार्थावर मारला ताव, कोणता होता तो? जाणून घ्या
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ranji Trophy 2025 fan entered at Arun Jaitley Stadium ground to meet Virat Kohli during Delhi vs Railway match
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहत्याने भेदला सुरक्षा रक्षकांचा घेरा, VIDEO होतोय व्हायरल
Ranji Trophy 2025 Virat Kohli Declines Team Managers offer during Ranji Trophy Camp wins gearts for his simplicity vbm 97
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीने रणजी सामन्यापूर्वी ‘या’ कृतीने जिंकली सर्वांची मनं, सर्वत्र होतय कौतुक
Dispute between chess player Magnus Carlsen and the International Chess Federation FIDE
‘फिडे’ आणि कार्लसनमध्ये पुन्हा वादाची ठिणगी… काय आहे ‘फ्रीस्टाइल’ बुद्धिबळ? आनंद, गुकेशही वादाच्या केंद्रस्थानी?
Magnus Carlsen Accepts D Gukesh World Chess Championship Challenge
“ही माझी शेवटची स्पर्धा…”, मॅग्नस कार्लसनने डी गुकेशचं जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचं आव्हान स्वीकारलं, खोचक वक्तव्य करत काय म्हणाला?
Uzbekistan Chess Player refuses to shake hands with Vaishali on religious grounds Later Apologizes
धार्मिक कारणांमुळे वैशालीशी हात मिळवला नाही; उझबेकिस्तानच्या ग्रँड मास्टरचा खुलासा
Who is Umar Nazir He Makes Rohit to Struggle for Every Single Run in Mumbai vs Jammu Kashmir
Ranji Trophy: रोहित शर्माला एकेका धावेसाठी झगडायला लावणारा उमर नझीर आहे तरी कोण? ‘पुलवामा एक्सप्रेस’ने मुंबई संघाची उडवली दाणादाण

आणखी वाचा-‘या’ देशातील पंतप्रधान निवासस्थान आहे पछाडलेले? ‘Haunted House’चे रहस्य काय?

कार्लसनकडून नियमभंग…

जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी फॉर्मल कपडे अर्थात सूट आणि शूज असा ड्रेसकोड आहे. जीन्स, शॉर्ट पॅन्ट, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज किंवा टोपी घालण्यास सक्त मज्जाव आहे. असे असले तरी जलद प्रकारातील स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कार्लसन जीन्स परिधान करून खेळायला आला. मुख्य आर्बिटर यांच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कार्लसनला २०० डॉलरचा दंड ठोठावला आणि नियमानुसार कपडे परिधान करून येण्यास सांगितले. मात्र, त्याने तसे करण्यास नकार दिला. त्यामुळे जलद प्रकारच्या नवव्या फेरीत त्याला कोणताही प्रतिस्पर्धी देण्यात आला नाही. त्यानंतर रागावलेल्या कार्लसनने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला या स्पर्धेतील आपले जेतेपद राखता येणार नाही.

‘फिडे’कडून काय सांगण्यात आले?

जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी काही नियम लागू करण्यात आले असून ड्रेसकोड याचाच एक भाग आहे. सर्व सहभागी खेळाडूंसाठी व्यावसायिकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करणे हा त्यामागचा हेतू आहे, असे ‘फिडे’कडून सांगण्यात आले. तसेच सर्व खेळाडूंसाठी नियम समान असल्याचे सांगताना ‘फिडे’ने इयन नेपोम्नियाशीचे उदाहरण दिले. स्पोर्ट्स शूज घातल्याने नेपोम्नियाशीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि त्यालाही शूज बदलण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्याने या सूचनांचे पालन केले. तो शूज बदलून पुढे खेळला. कार्लसनने मात्र जीन्स बदलण्यास नकार दिला, असे ‘फिडे’कडून स्पष्ट करण्यात आले.

आणखी वाचा-दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि कोकण परिसरात किती मालमत्ता… जप्तीनंतर त्यांचे काय होते?

कार्लसनचा आडमुठेपणा

मी आता ‘फिडे’च्या नियमांना कंटाळलो आहे. मला आता त्यांच्याशी निगडित कोणतीही गोष्ट करायची नाही. हे सगळे मूर्खपणाचे आहे, अशी टिपप्णी कार्लसनने स्पर्धेबाहेर झाल्यानंतर केली. आर्बिटरने सांगितल्यानंतरही कार्लसनने जीन्स बदलण्यास नकार दिला. आपण उद्या योग्य ते कपडे परिधान करू, पण आज परिधान केलेले कपडे बदलणार नाही, अशी भूमिका कार्लसन घेतली, असे माजी जगज्जेत्या सुझान पोल्गरकडून सांगण्यात आले.

याआधीही ‘फिडे’विरोधी भूमिका…

‘फिडे’च्या विरोधात भूमिका घेणे हे कार्लसनसाठी नवे नाही. विशेषतः जागतिक अजिंक्यपद लढतीच्या स्वरूपावरून त्याने ‘फिडे’वर बरेचदा टीका केली आहे. आपला प्रतिस्पर्धी निवडण्याची जगज्जेत्याला मुभा असली पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. मात्र, ‘फिडे’ने त्यासाठी स्पष्ट नकार दिल्यानंतर त्याने जगज्जेतेपद बहाल केले होते. तसेच २०२२ मध्ये कार्लसनने अचानक एका स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याने सुरुवातीला कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते. नंतर मात्र त्याने अमेरिकेचा ग्रँडमास्टर हान्स निमनवर फसवणूक (चिटींग) करून सामने जिंकत असल्याचा आरोप केला होता. या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत निमनकडून कार्लसनला पराभव पत्करावा लागला होता. कार्लसनच्या आरोपांनंतर ‘फिडे’ला मध्यस्थी करावी लागली. मात्र, त्यांना निमनविरोधात काहीही सापडले नाही. त्यामुळे कार्लसनचा ‘फिडे’वरील राग वाढत गेल्याचे म्हटले जात आहे. आता यात आणखी भर पडणार आहे.

Story img Loader